मुंबई महानगर प्रदेश ( MMR) आपल्या पायाभूत सुविधांमध्ये आणि रिअल इस्टेट क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल अनुभवत आहे. दळणवळणाच्या सुविधा अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची रचना केली जात आहे. एमएमआर क्षेत्र रिअल इस्टेट आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बाजावत आहे. एमएमआरडीएच्या मल्टीमोडल ट्रांझिट प्रकल्पापासून, मुख्य महामार्गांच्या विकासापर्यंत आणि वाढत असलेल्या रिअल इस्टेट मार्केटच्या बाबतीत येथे सुधारणा घडवून आणणारे घटक आहेत.
● मल्टीमोडल ट्रांझिट सिस्टम : सहज कनेक्टिव्हिटीसाठी एक दृष्टिकोन
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने एक महत्त्वाकांक्षी मल्टीमोडल ट्रांझिट सिस्टम प्रस्तावित केला आहे, जो मेट्रो, मोनोरेल, उपनगरी रेल्वे, बसेस आणि जलवाहन यांसारख्या विविध वाहतूक साधनांची एकत्रित सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देईल. या एकत्रित पद्धतीमुळे कनेक्टिव्हिटीमध्ये खूप मोठी सुधारणा होईल, जी टटफच्या वाढत्या लोकसंख्येला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी आणि दीर्घ प्रवासाच्या वेळेच्या समस्येवर उपाय देईल. या विविध वाहतूक साधनांच्या समन्वयाने, एमएमआरडीए एक व्यापक ट्रांझिट नेटवर्क तयार करणार आहे, ज्यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होईल, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल आणि विविध उपनगर आणि मुख्य व्यवसायिक केंद्रांमधील प्रवास जलद होईल. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि इतर उपनगरांमध्ये या महत्त्वपूर्ण कॉरिडॉर्सना जोडून कनेक्टिव्हिटी सुधारेल. यामुळे प्रवासाची सोय सुलभ आणि जलद होईल आणि रिअल इस्टेट मार्केटलादेखील फायदेशीर परिणाम होईल, कारण अधिक कनेक्टिव्हिटी असलेल्या क्षेत्रांमध्ये घर खरेदी करणे अधिक आकर्षक आणि सयुक्तिक होईल. त्याच बरोबर, ही यंत्रणा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील फायदेशीर ठरेल, कारण सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल. विविध वाहतूक साधनांची समाकलन करून, टटफऊअ टटफ क्षेत्राला घर खरेदी करणाऱ्यांसाठी आणि व्यवसायांसाठी अधिक आकर्षक बनवत आहे.
● आठ लेनचा अॅक्सेस कंट्रोल महामार्ग :
मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि बदलपूर क्षेत्रांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी एक मोठा टप्पा. एमएमआरमध्ये एक अन्य महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणजे आठ लेनचा अॅक्सेस कंट्रोल महामार्ग, जो मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि बदलपूर क्षेत्रांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी तयार केला जात आहे. या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि सध्याच्या मार्गांवरच्या वाहतूक कोंडीला खूप प्रमाणात कमी केले जाईल.
सध्या या क्षेत्रांमधील प्रवास जलद आणि तितकासा सुलभ नाही, कारण वाहतूक कोंडी समस्या गंभीर आहे. हा नवा महामार्ग प्रवासासाठी थोडा सुसह्य आणि व्यवसायिक, निवासी आणि औद्याोगिक क्षेत्रांसाठी फायदेशीर ठरेल. विशेषत: हा महामार्ग नवीन विकसित होणाऱ्या भागांमध्ये कनेक्टिव्हिटी सुधारेल, ज्यामुळे त्या भागांमधील रिअल इस्टेटमध्ये मागणी वाढेल. हा पायाभूत सुविधा प्रकल्प रिअल इस्टेटच्या विकासाला चालना देईल, कारण या महामार्गाच्या जवळ असलेल्या क्षेत्रांमध्ये घरांची आणि व्यावसायिक प्रकल्पांची मागणी वाढेल.
● निवासी प्रॉपर्टीची वाढती मागणी :
स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी एक सकारात्मक संकेत एमएमआरमध्ये वाढती निवासी प्रॉपर्टीची मागणी, विशेषत: परवडणाऱ्या आणि मध्यवर्गीय श्रेणीतील घरांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रासाठी एक सकारात्मक संकेत आहे. एमएमआर क्षेत्राची लोकसंख्या वाढत असल्यामुळे या श्रेणीतील घरांची मागणी लक्षणीय प्रमाणात वाढत आहे.
परवडणाऱ्या घरांची मागणी वाढत आहे, कारण घरखरेदी करणारे परवडणारी घरे शोधत आहेत, ज्यात आवश्यक सोयीसुविधाही आहेत. उदाहरणार्थ, कल्याण, डोंबिवली, पनवेल, बदलापूर या भागांमध्ये परवडणारी घरे बनवणारे प्रकल्प सुरू केले जात आहेत, जे ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार तयार केले जात आहेत. तसंच पंतप्रधान आवास योजना यांसारख्या सरकारच्या योजनांचा चांगला प्रभावदेखील आहे, ज्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना सबसिडी मिळते आणि हे घर खरेदी करणे अधिक सुलभ बनवते. या श्रेणीत मागणी वाढणे ही रिअल इस्टेट क्षेत्रासाठी एक सकारात्मक गोष्ट आहे, कारण यामुळे पुढील काही वर्षांत या क्षेत्राच्या स्थिर आणि वाढत्या विकासाची शक्यता आहे.
● वाणिज्यिक रिअल इस्टेटमधील वाढ :
निवासी रिअल इस्टेटच्या वाढीसोबतच, वाणिज्यिक रिअल इस्टेटमध्येदेखील मागणी संदर्भात एक मोठा बदल होतो आहे आणि यामध्ये आयटी आणि वित्त क्षेत्रांचा मोठा सहभाग आहे. जसे-जसे कंपन्या या क्षेत्रात कार्यालये स्थापन करत आहेत, त्याच प्रमाणात वाणिज्यिक जागेची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. घाटकोपर, ठाणे, एरोली, पेण- रायगड यांसारख्या नवीन वाणिज्यिक केंद्रांमध्ये आता अधिक मागणी आहे. यापूर्वी प्रामुख्याने उपनगर म्हणून ओळखल्या गेलेल्या या भागांमध्ये आता आयटी कंपन्या, वित्तीय संस्थांची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊ लागली आहे. कारण या भागांचे स्थान, परवडणारी रिअल इस्टेट, आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी त्यांना स्थावर मालमत्ता खरेदीसाठी एक चांगला पर्याय बनवते. मेट्रो आणि महामार्गांच्या विकासामुळे या भागांचा विकास आणखी सुलभ होईल. वाणिज्यिक रिअल इस्टेटमध्ये वाढती मागणी फक्त आयटी आणि वित्त क्षेत्रांपासूनच नाही, तर इतर उद्याोगांपासूनदेखील आहे. या क्षेत्रांमध्ये नवीन ऑफिस स्पेसचा विकास होईल, ज्यामुळे या क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी एक अधिक अनुकूल वातावरण तयार होईल.
एमएमआरक्षेत्र पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट वाढीच्या दृष्टीने मोठे बदल अनुभवत आहे. एमएमआरडीएच्या मल्टीमोडल ट्रांझिट सिस्टम आणि आठ लेनच्या महामार्गामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होईल, ज्यामुळे हे क्षेत्र गुंतवणुकीसाठी अधिक आकर्षक बनेल. परवडणाऱ्या आणि मध्यवर्गीय निवासी प्रॉपर्टीमध्ये वाढती मागणी ही स्थिरतेचा आणि सततच्या वाढीचा संकेत आहे, तर आयटी आणि वित्त क्षेत्राच्या वाढीमुळे वाणिज्यिक रिअल इस्टेटमध्ये मोठा आणि चांगला बदल होतो आहे.
sdhurat@gmail.com