पाध्ये यांना पडलेला एकसंध शिवलिंग किंवा २० फूट लांबीच्या अजस्र नंदीच्या प्रश्नाबद्दल मला फारसे आठवत नाही. मात्र, ८१ टन वजनाचे एकसंध शिखर हे गटणेसरांनी सांगितल्याप्रमाणे खाणीतून दगड हेरून तेथेच घडविले व कोरले, त्यानंतर तेथूनच उचलत नेलेल्या दगडमातीच्या भरीव मजबूत रॅम्पवरून (RAMP) ढकलत मंदिराच्या शिखराकडे नेले. यासाठी मोठमोठय़ा सागवानी वृक्षांचे कापलेले जाड बुंधे ओंडक्यासारखे रॅम्पवर रचून असंख्य हत्ती लावून पुढून ओढणे व मागून ढकलणे हा प्रकार करत ते शिखर कळसापर्यंत पोहोचविले. यात खूपच काळ गेला. उंची २१० फूट व लांबी साडेतीन मैल असल्याने या रॅम्पचा ग्रेडियण्ट (GRADIENT) हा ०.०११६९ इतका उथळ होता. शिखर त्याच्या जागेवर बसवल्यानंतर तेथूनच
– उज्ज्वला आगासकर
बी. आर्क. (मुंबई)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा