इमारतीच्या टेरेस तसेच पॅरापेटमधून होणारी पाणीगळती रोखण्याचा एकमेव उपाय म्हणजे गच्चीवर पत्र्याची शेड बांधणे हेच होय, हे जरी खरे असले तरी अशा शेडमुळे एफएसआय कायद्याचा भंग होतो. कारण छप्पर टाकले की गच्चीचा वापर गुदामासाठी तसेच काही कालावधीनंतर चारही बाजूंना पत्रे लावून अथवा अनधिकृतपणे भिंती बांधून गच्चीचा वापर राहण्यासाठीही करण्याची शक्यता असते, जे बेकायदेशीर आहे. जरी भिंती बांधल्या नाहीत तरी सर्व कव्हर्ड एरिया हा एफएसआयमध्ये मोजला जातो व तसा तो इमारतीच्या मूळ नकाशात दाखविला जाणे बंधनकारक असते. अथवा अ‍ॅडिशन्स/आल्टेरेशन्सच्या नकाशात दाखवून तेवढा एफएसआय सँक्शन करून (शिल्लक असल्यास) घेणे आवश्यक असते.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सची आकारणी बांधकाम केलेल्या क्षेत्रफळावर आधारित असते. त्यामुळे छप्पर टाकलेली गच्ची बांधकाम क्षेत्रात येऊन वाढीव टॅक्स देणे गरजेचे होते व वेगळे हिशेब करावे लागतात. अन्यथा टॅक्स न भरल्यास सरकारी कारवाई होऊ शकते. यामुळे महापालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय व एफएसआय (FSI) मध्ये बसत नसल्यास गच्चीवर पत्र्याची शेड टाकणे बेकायदेशीर असते.
मुंबई नगराची उभारणीच मुळी ७ बेटांना जोडून झाली असून, येथील जमिनी खाडीत/पाण्यात मातीचा भराव टाकून बनल्याने ती हळूहळू खाली खाली दबत असते. (Sinking Process) त्यामुळे गच्चीवर वाटरप्रूफिंगची केलेली कुठलीही केमिकल (Treatment) संरचना ३ ते ४ वर्षांत कुचकामी होऊन परत तडे पडण्यास सुरुवात होते व पुन्हा ही केमिकल संरचना करणे क्रमप्राप्त होऊन हा एक नित्याचा (recurring)  खर्च होऊन बसतो व हे अनुभवास आल्यावर बहुतेक मध्यमवर्गीय/ कमी उत्पन्न गटाच्या सोसायटय़ा पत्र्याचा शेड बांधण्याचा निर्णय घेतात, पण त्याआधीच्या कायदेशीर बाबींकडे डोळेझाक केली जाते. बहुसंख्य उपनगरांतील जमिनीही (Suburbs and extended Suburbs)  रिक्लेम्ड लॅन्ड्स आहेत, तेथे हा प्रकार मोठय़ा प्रमाणावर जाणवतो. गच्चीवर छप्पर टाकताना छपराची उंची ८ फूट किंवा जास्त झाल्यास त्याला FSI व प्रॉपर्टी टॅक्सचे नियम लागू होऊ शकतात, पण गच्चीला अगदी चिकटून पत्रे टाकल्यास या नियमातून सूट मिळू शकते. पण गच्चीचा वापर करता येत नाही व ही गैरसोईची बाब ठरते. या दृष्टीने Development Rules ¸मध्ये काही नवीन (Provision)उपाययोजना होणे आवश्यक ठरत आहे. मात्र कुठल्याही प्रकारच्या वाढीव कामास मग ती गॅरेजची शेड असो वा गच्चीची पूर्वपरवानगी ही घेतलीच पाहिजे. शिवाय पत्र्याची शेड टाकताना इमारतीवरील वाढीव वजनाचाही (Dead Load)  विचार व्हायला हवा.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा