इमारतीच्या टेरेस तसेच पॅरापेटमधून होणारी पाणीगळती रोखण्याचा एकमेव उपाय म्हणजे गच्चीवर पत्र्याची शेड बांधणे हेच होय, हे जरी खरे असले तरी अशा शेडमुळे एफएसआय कायद्याचा भंग होतो. कारण छप्पर टाकले की गच्चीचा वापर गुदामासाठी तसेच काही कालावधीनंतर चारही बाजूंना पत्रे लावून अथवा अनधिकृतपणे भिंती बांधून गच्चीचा वापर राहण्यासाठीही करण्याची शक्यता असते, जे बेकायदेशीर आहे. जरी भिंती बांधल्या नाहीत तरी सर्व कव्हर्ड एरिया हा एफएसआयमध्ये मोजला जातो व तसा तो इमारतीच्या मूळ नकाशात दाखविला जाणे बंधनकारक असते. अथवा अॅडिशन्स/आल्टेरेशन्सच्या नकाशात दाखवून तेवढा एफएसआय सँक्शन करून (शिल्लक असल्यास) घेणे आवश्यक असते.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सची आकारणी बांधकाम केलेल्या क्षेत्रफळावर आधारित असते. त्यामुळे छप्पर टाकलेली गच्ची बांधकाम क्षेत्रात येऊन वाढीव टॅक्स देणे गरजेचे होते व वेगळे हिशेब करावे लागतात. अन्यथा टॅक्स न भरल्यास सरकारी कारवाई होऊ शकते. यामुळे महापालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय व एफएसआय (FSI) मध्ये बसत नसल्यास गच्चीवर पत्र्याची शेड टाकणे बेकायदेशीर असते.
मुंबई नगराची उभारणीच मुळी ७ बेटांना जोडून झाली असून, येथील जमिनी खाडीत/पाण्यात मातीचा भराव टाकून बनल्याने ती हळूहळू खाली खाली दबत असते. (Sinking Process) त्यामुळे गच्चीवर वाटरप्रूफिंगची केलेली कुठलीही केमिकल (Treatment) संरचना ३ ते ४ वर्षांत कुचकामी होऊन परत तडे पडण्यास सुरुवात होते व पुन्हा ही केमिकल संरचना करणे क्रमप्राप्त होऊन हा एक नित्याचा (recurring) खर्च होऊन बसतो व हे अनुभवास आल्यावर बहुतेक मध्यमवर्गीय/ कमी उत्पन्न गटाच्या सोसायटय़ा पत्र्याचा शेड बांधण्याचा निर्णय घेतात, पण त्याआधीच्या कायदेशीर बाबींकडे डोळेझाक केली जाते. बहुसंख्य उपनगरांतील जमिनीही (Suburbs and extended Suburbs) रिक्लेम्ड लॅन्ड्स आहेत, तेथे हा प्रकार मोठय़ा प्रमाणावर जाणवतो. गच्चीवर छप्पर टाकताना छपराची उंची ८ फूट किंवा जास्त झाल्यास त्याला FSI व प्रॉपर्टी टॅक्सचे नियम लागू होऊ शकतात, पण गच्चीला अगदी चिकटून पत्रे टाकल्यास या नियमातून सूट मिळू शकते. पण गच्चीचा वापर करता येत नाही व ही गैरसोईची बाब ठरते. या दृष्टीने Development Rules ¸मध्ये काही नवीन (Provision)उपाययोजना होणे आवश्यक ठरत आहे. मात्र कुठल्याही प्रकारच्या वाढीव कामास मग ती गॅरेजची शेड असो वा गच्चीची पूर्वपरवानगी ही घेतलीच पाहिजे. शिवाय पत्र्याची शेड टाकताना इमारतीवरील वाढीव वजनाचाही (Dead Load) विचार व्हायला हवा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा