१८इंच x १२ इंच किंवा १५ इंच x १० इंच या आकारात बाजारात टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये जॉइंटलेस म्हणजे विनासांधे प्रकारात टाइल्स उपलब्ध असतात. म्हणजे एका टाइलशेजारी दुसरी टाइल चिकटवून ठेवली तर त्यातले सांधे दिसत नाहीत, अशा प्रकारच्या टाइल्सना जॉइंटलेस टाइल्स असं म्हणतात. यापकी १८ इंच x १२ इंच या आकारातल्या टाइल्सच्या एका बॉक्समध्ये ६ टाइल्स येत असून, त्या ९ चौरस फूट इतकं क्षेत्रफळ व्यापतात. म्हणजे तुम्हाला जर ८ फूट लांब ओटय़ामागे ४ फूट उंचीचं टाइिलग करायचं असेल, तर या टायिलगचं एकूण क्षेत्रफळ ८ x ४ = ३२ चौरस फूट इतकं येणार. त्याकरता तुम्हाला टाइल्सचे चार बॉक्स खरेदी करावे लागतील. या टाइल्स एकूण ९ x ४ = ३६ चौरस फूट व्यापतील. म्हणजे सुमारे ४ टाइल्स बॉक्समध्ये जास्तीच्या येणार. पण तुम्हाला सुटय़ा टाइल्स मिळत नसल्यामुळे ही जास्तीची संख्या विकत घ्यावीच लागेल. अशाच प्रकारे १५ इंच x १० इंच आकाराच्या एका सहा टाइल्सच्या बॉक्समधल्या टाइल्स सुमारे सव्वासहा चौरस फूट इतकं क्षेत्रफळ व्यापतात. त्यामुळे याच ३२ चौरस फूट क्षेत्रफळासाठी या आकारातल्या टाइल्सची सहा बॉक्स खरेदी करावी लागणार. त्यात सुमारे ३७.५ चौरस फूट इतकं क्षेत्रफळ व्यापलं जाणार. अशा प्रकारे फुकट जाणाऱ्या टाइल्सचं प्रमाण हे १५ इंच x १० इंच या आकारात ३२ चौरसफुटाच्या िभतीसाठी जास्त असल्यामुळे या विशिष्ट उदाहरणात १८ इंच x १२ इंच या आकाराच्या टाइल्स या अधिक किफायतशीर ठरू शकतात. ब्रँडेड टाइल्सच्या किमती जरा महाग असतात. त्यापेक्षा ज्या टाइल्स गुजरात टाइल्स या प्रकाराने ओळखल्या जातात, त्या दर्जात थोडय़ाशा कमी असतात. पण बऱ्याच ठिकाणी त्यांच्या परवडणाऱ्या दरांमुळे त्यांचाच वापर अधिक होताना दिसतो. मुंबईत धारावी इथे असलेल्या टाइल्सच्या मार्केटमध्ये अशा प्रकारच्या टाइल्समध्ये १८ इंच x १२ इंच या आकारातल्या सहा टाइल्सचा एक बॉक्स ३०० रुपयांपासून अधिक किमतीला मिळतो तर, १५ इंच x १० या आकारातल्या टाइल्सचं तितक्याच संख्येचा एक बॉक्स हे २०० रुपयांपासून पुढे उपलब्ध आहे. एखाद्या विशिष्ट रंगातली कोणत्याही डिझाइनशिवाय असलेली किनारीसाठी वापरली जाणारी साधी बॉर्डर टाइल ही २४ इंच x ४ इंच या आकारात बाजारात उपलब्ध असून त्याची किंमत ही सुमारे ३५ रुपये रिनग फूट म्हणजे प्रति फूट इतकी असते. त्याच पट्टय़ा जर डिझाइनर असतील, तर मग त्यांचा दर प्रति फूट ६० रुपयांपर्यंत जातो. छायाचित्रं किंवा विशेष डिझाईन असलेल्या मोटिफ टाइल्स या सर्वसाधारणपणे ओटय़ामागच्या िभतीच्या लांबीच्या मध्यभागी किंवा मग संपूर्ण लांबीला ठरावीक अंतरावर बसवल्या जातात. यांची किंमत एका टाइलला चारशे रुपयांपासून अधिक इतकी असते.
या टाइल्सचे बॉक्स घरी आणल्यावर त्यातल्या टाइल्स प्रत्यक्ष वापरण्यापूर्वी किमान अर्धा ते एक तास पाण्यात बुडवून ठेवाव्यात. कारण त्या जर रेती-सिमेंटचं मॉर्टर म्हणजे मिश्रण त्यांच्या मागे लावून थेट िभतीवर बसवल्यात तर, या ओल्या मिश्रणातलं पाणी अशा सुक्या टाइल्स शोषून घेतील आणि मग टाइलमागचं हे मिश्रण सुकताना त्यातलं पाणी आवश्यक ती रासायनिक प्रक्रिया होण्यासाठी पुरेसं नसल्यामुळे, या मिश्रणाला तडे जाऊन शेवटी िभतीवरच्या टाइलला तडे जाऊ शकतात किंवा ती गळून पडू शकते. यासाठी पाण्यात पुरेसा वेळ भिजवलेल्या टाइल्स वापराव्यात. प्रत्यक्ष टाइल्स िभतीवर बसवण्याआधी िभतीच्या ज्या भागावर त्या बसवायच्या आहेत, तो पृष्ठभागही तयार करून घ्यावा लागतो. िभतीच्या या भागावरची दिवे-पंखे इत्यादीची जुनी बटणं आणि स्विचबॉक्सेस काढून घ्यावेत. िभतीत असलेले खिळे काढून त्यांची भोकं लांबी भरून बुजवून घ्यावीत. संपूर्ण पृष्ठभाग एका पातळीत आणून घ्यावा. त्यावर मग प्लॅस्टर केलं असेल किंवा लांबी भरली असेल, तर ते ओलं असताना लांबी भरायच्या पत्र्याच्या टोकाने मध्येमध्ये थोडे चरे मारून घ्यावेत. अशा प्रकारे हा पृष्ठभाग थोडा खरखरीत झाला की, त्यावर रेती-सिमेंटच्या मिश्रणाने बसवलेली टाइल घट्ट पकड घेईल. अन्यथा हा पृष्ठभाग एकदम गुळगुळीत असेल, तर त्यावर बसवलेली टाइल रेती-सिमेंटचं मिश्रण ओलं असताना घसरून खाली पडेल. हे मिश्रण तयार करताना साधारण त्यात सिमेंटचं प्रमाण जास्त ठेवून ते लोण्याप्रमाणे होईल इतकं ते मऊ असावं. टाइलच्या मागच्या भागावर मध्यभागी ते पुरेशा प्रमाणात लावून मग टाइल िभतीवर बसवून हातोडय़ाच्या मागच्या लाकडी मुठीने हलकेच ठोकून बसवावी. त्यामुळे त्यामागे लावलेलं हे मिश्रण सर्व कोपऱ्यांपर्यंत पसरेल आणि टाइलचा मागचा भाग पूर्णपणे व्यापेल. अशा पद्धतीने सर्व टाइल्स आवश्यक त्या डिझाइननुसार बसवून झाल्यावर एखाद्या कपडय़ाने त्यावर लागलेलं किंवा सांध्यांमधून जास्तीचं बाहेर आलेलं रेती-सिमेंटचं मिश्रण हलकेच पुसून घ्यावं.
अशा प्रकारे तुमचं आकर्षक किचन तुम्ही तयार करू शकता. स्वयंपाकघरात आता केवळ गृहिणीच नाही, तर घरातल्या पुरुषांचा वावारही बदलत्या काळात वाढताना दिसतोय. अशा वेळी तिथे वावरावं असं वाटणारं वातावरण असेल, तर दिवसाच्या शेवटी सगळं कुटुंब जेवणासाठी एकत्र येतं, तेव्हा प्रसन्न मनाने केलेला स्वयंपाक जेवायला बसल्यावर नक्कीच मनाला आनंद आणि प्रसन्नता जाणवेल.
सिव्हिल इंजिनीअर
anaokarm@yahoo.co.in