वास्तविक टेराकोटाचा वापर मोहेंजोदडोमध्ये केला जात होता हे उत्खननाद्वारे समोर आल्याचंही म्हटलं जातं. आपण मात्र आजही इंटिरिअर करताना फॅशन म्हणून ट्रेंड म्हणून टेराकोटाचा सर्रास वापर करतो.
या दिवसांमध्ये आपल्याला जागोजागी पिण्याचं पाणी साठवायचे माठ, पूर्वी रांजण, वापरण्याचं प्रमाण जास्त होतं. कुंडय़ा, शोभेच्या वस्तू,
‘फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार’ असं म्हणत काही पॉट्स फिरत्या चाकावर बनवले जातात, तर काही टेबलटॉप अथवा हातावर बनवता येतात. टेराकोटा पॉट्सचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा की कोठेही, कसेही कोणत्याही आकारांचे, कितीही व कशाही प्रकारे ठेवले तरी आकर्षकच दिसतात. एखाद्या खेडय़ातल्या वाडय़ात, शहरातल्या फ्लॅटमध्ये किंवा उच्चभ्रूंच्या बंगल्यात तसेच राजेशाही थाट असलेल्या एखाद्या पॅलेसमध्ये कोठेही जरी हे टेराकोटा पॉट्स ठेवले तरी सुंदरच दिसतात. शिवाय, या प्रत्येक ठिकाणी त्या पॉट्सचं सौंदर्य हेदेखील निरनिराळय़ा प्रकारे खुलून येतं. एक वेळ बाकी वस्तूंकडे पाहिलं जाणार नाही, पण हे टेराकोटाचे पॉट्स मात्र आपलं लक्षं वेधून घेतात. त्यांना काही वेळा सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
ज्या ठिकाणी रूममध्ये ते ठेवण्यात येतात त्या रूमचा तसेच त्या रूममध्ये येणाऱ्या प्रत्येकाचा मूडच हे टेराकोटा पॉट्स बदलत असतात. एक वेगळंच वातावरण निर्माण करत असतात. विशेषत: प्रवेशद्वाराजवळचा मोकळा पॅसेज, रिकामे राहणारे रूम्समधले कोपरे, टेरेस, बाल्कनीज अशा अनेक ठिकाणी उपलब्ध जागा, त्या जागेचं आकारमान लक्षात घेऊन त्याला अनुसरून असे काही पॉट्स निवडून ठेवू शकतो. काही वेळा काही रिकामे कॉर्नर्स अगदीच निर्जीव वाटायला लागतात. त्यांच्यात जिवंतपणा आणण्याचं कामही या टेराकोटा
केवळ मातीपासून, क्लेपासून आपल्याला हव्या त्या आकाराच्या आणि हव्या त्या डिझाइनच्या वस्तूंना सर्वप्रथम उन्हामध्ये सुकवून नंतर भट्टीमध्ये सुमारे १००० अंश तापमानाला त्या वस्तू तापवण्यासाठी, भाजण्यासाठी ठेवल्या जातात. यामुळे बनविलेल्या वस्तूंचा ठिसूळपणा कमी होतो आणि त्यामुळे सहजासहजी यातून पाणी फार मोठय़ा प्रमाणात पाझरू शकत नाही. शिवाय पूर्णपणे भाजलेल्या टेराकोटाच्या वस्तूंच्या बाहय़ांगास एक प्रकारचा चकचकीतपणा येतो, त्यामुळे काही प्रमाणात या वस्तू वॉटरप्रूफ होतात.
कुंभाराच्या चाकावर न बनविल्या जाणाऱ्या, पण इंटिरिअर डिझाइनिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू या हस्तकलेचेच नमुने म्हणता येतील. लहानात लहान म्हणजे अगदी तांदळाएवढी टेराकोटामध्ये बनविलेली वस्तू पाहायला मिळते, तर मोठमोठय़ा स्कल्चर्सची निर्मितीदेखील टेराकोटामध्ये केली जाते.
या वस्तूंचा विशेषत: घरातील अथवा घराबाहेरील बागकामासाठी अधिक चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो. घरातील अथवा बाहेरील जमिनीवरच्या कुंडय़ा, हँगिंग पॉट्स, पॉट्स वीथ कॉर्नर स्टँड अशा विविध पॉट्सचा वापर इनडोअर, आऊटडोअर लँडस्केपसाठी करता येतो.
इंटिरिअरच्या दृष्टिकोनातून वॉल माऊंटेड फ्रेम्स, म्युरल्स, स्कल्पचर्स, डेकोरेटिव्ह अँटिक पिसेस, शो-पिसेस, पॉट्स व पॉटरी अशा वस्तूंची आपल्याला हव्या त्या आकारांत, रंगांत, रूपांत, निरनिराळय़ा डिझाइनमध्ये निर्मिती करता येऊ शकते. टेराकोटा वापरून तयार केलेल्या वस्तूंच्या किमती
एकाच डिझाइनच्या, आकाराच्या अनेक वस्तू एकप्रकारेच मोठय़ा संख्येत बनविण्यासाठी त्याप्रमाणे एखादा साचा तयार करून त्या साच्याप्रमाणे एकसारख्या सर्व वस्तू बनवता येऊ शकतील. तयार होणाऱ्या टेराकोटाच्या वस्तूंवर हवातसा रंग चढवता येऊ शकतो. नैसर्गिक रंग, ऑइलपेंट्स, अॅक्रेलिक बेस पेंट्स, गेरू इत्यादी कापडाच्या बोळय़ांनी, ब्रशनी अथवा स्प्रे गन वापरूनदेखील रंगवता येतात.
हस्तकलेच्या माध्यमातून या वस्तूंवर बाहेरून निरनिराळी डिझाइन्स बनवता येऊ शकतात. त्यावर सुंदर नक्षीकाम, कोरीव काम करता येतं. निरनिराळे नक्षीकाम व कोरीवकाम केलेले असे तऱ्हेतऱ्हेचे दिवे डब्या-बरणीसारखे आतमध्ये दिवा लावून झाकण लावून बंद करता येण्यासारखे विशेषत: दिवाळीच्या सुमारास बघायला मिळतात.
टेराकोटाच्या माध्यमातून लहान आकाराचे हस्तशिल्प हस्तकलेतील उत्कृष्ट नमुने बनविले जातात. छोटय़ा खेळण्यांबरोबर लहान लहान पणत्या, दिवे, आकाशकंदील, जमिनीवर ठेवण्यासाठी फुलझाडांसाठी कुंडय़ा, काही लोंबकळणाऱ्या कुंडय़ा, लहानमोठय़ा आकारांचे पॉट्स, असे असंख्य वस्तूंचे प्रकार या टेराकोटामध्ये बनविले जातात. या वस्तूंसारखा स्वस्त व मस्त असा इंटिरिअर करण्यास उपयुक्त तसेच योग्य वस्तूचा प्रकार दुसरा कोणताही नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
या टेराकोटामध्ये अगदी कागदाच्या जाडीइतकाच जाड असणारा पॉट्स व डेकोरेटिव्ह वस्तूंचा प्रकार खास करून कच्छ, कानपूर तसेच अल्वर या ठिकाणी बनविला जातो. अल्वर हे खरंतर यामुळेच अधिक प्रसिद्ध झाले. तिथे तयार होणाऱ्या पॉट्सना ‘कागजी’ या नावानं ओळखलं जातं. याचं वैशिष्टय़ असं, की हे पॉट्स नुसते पेपरथीन असतात असं नाहीतर त्यांचं बाहय़रूप हे फारसं चकचकीत नसतं. वास्तविक भारतात अगदी पुरातत्त्व काळापासून तयार केले जाणारे टेराकोटा पॉट्स हे मुख्य म्हणजे त्याच्या बाहय़ांगाच्या चकचकीतपणामुळे प्रसिद्ध आहेत.
प्रत्येक प्रदेशात, हरएक प्रांतात या टेराकोटाचा उपयोग केलेला दिसतो. पण प्रत्येक ठिकाणची टेराकोटाचे पॉट्स बनविण्याची आणि अर्थातच ते वापरण्याची पद्धत वेगवेगळी आहे. महाराष्ट्रात कानपूर, गुजरातमध्ये कच्छ, हरयाणात जहज्जर, उत्तर प्रदेशमध्ये हरपूर तसेच मेरठ, राजस्थानात पोखरण, हिमाचल प्रदेशात अंद्रेता व कांगरा या व अशा भारतातील अनेक ठिकाणी विविध तऱ्हेचे निरनिराळय़ा डिझाइनचे, वैविध्यपूर्ण स्टाईलचे पॉट्स बनविले जातात.
गुजरातमधील कच्छमध्ये तयार होणाऱ्या टेराकोटाच्या वस्तूंमध्ये पॉट्स, टेराकोटाचे घोडे, हत्ती तसेच अनेक जंगली प्राणी अशा शोभिवंत वस्तू फारच सुंदररीत्या बनविल्या जातात. यापैकी निरनिराळय़ा रंगीबेरंगी तसेच कोरीवकाम व इतर नक्षीकाम असणारी आणि शाही थाटाला शोभतील अशा पॉट्सची निर्मिती विवाहकार्यात फारच मानाचं स्थान मिळविते.
उत्तर प्रदेशातील निझामाबाद येथे तयार होणारी टेराकोटा पॉटरी विशेषकरून काळय़ा रंगात तयार होते व त्यावर चंदेरी रंगामध्ये विविधतेने नटलेले हे पॉट्स आपलं एक वेगळंच वैशिष्टय़ दाखवतात. याचप्रकारे आंध्रमधील बिदरमध्ये तयार होणारी ही टेराकोटा पॉटरी चंदेरी रंगाच्या ऑक्सिडाईज्ड
भारतातील अनेक भागांमध्ये अरेबियन डिझाइनचा वापर करून ग्लेज्ड पॉटरी बनवल्या जातात. दिल्ली, अमृतसर, रामपूर तसेच जयपूर, अशा ठिकाणी तयार होणाऱ्या पॉटरीमध्ये विशेषत: पॉट्सच्या पांढऱ्या रंगावर निळय़ा तसेच हिरव्या रंगाच्या विविध कलात्मक रचनातून अरेबियन पॉटरी तयार केली जाते. याचे वैशिष्टय़ म्हणजे ही तयार होणारी पॉटरी अगदी शंभर टक्के वॉटरप्रूफ असते, त्यामुळे कोणताही द्रवपदार्थ ठेवण्यासाठी वापरली जाते.
अलीकडे नावारूपाला आलेली ‘गो-ग्रीन’ ही संकल्पना या टेराकोटाच्या वापरामुळे इंटिरिअर डिझाइनिंगच्या माध्यमातून साकारली जाऊ शकते. निसर्गनिर्मित उपलब्ध साधनांचा उपयोग, वापर करून तसेच निसर्गाची जोपासना करून जे काही इंटिरिअर करण्यासाठी आवर्जून वापरावे, असं ठरवणं शक्य होईल ते ते सर्वकाही वापरावं.
इंटिरिअर करताना काही ठिकाणी एखादी मोठी व संपूर्ण भिंतसुद्धा टेराकोटाच्या वापरातून म्युरल अथवा भिंतीवर टेराकोटाच्या वैविध्यपूर्ण डेकोरेटेड पॅनेल्स लावून सजवता, खुलवता येऊ शकते. विशेषत: मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्या आल्या असं एखादं सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन तयार केलेलं असेल तर ते इंटिरिअर निश्चितच परिपूर्ण वाटेल. मुख्य म्हणजे याचा बनविण्याचा तसेच देखभालीचा खर्च फारच कमी असतो. पण तयार होणारं दृश्य मात्र विलोभनीय असतं.
चैत्री पाडव्याच्या दिवसाने सुरू होणाऱ्या नवीन वर्षांची सुरुवात आणि नवीन वर्षांचं स्वागत मनमोहक, मनवेधक, मनपसंत अशा टेराकोटाच्या साहय़ानं आपलं तन, मन आणि धन लावून करूयात आणि जुन्याच टेराकोटाच्या नव्यानं स्वीकार करून, त्याचा नवनवीन प्रकारे वापर करून नववर्षांची नवीन गुढी उभी करूयात!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा