काही लोक पैशाच्या लोभापायी वाईट क्रूरकर्माने पैसे मिळविण्याचा प्रयत्न करतात व अशा लोकांकडूनच चोरी-लबाडी, घरफोडी, खून-दरोडे घातले जाऊन मानवी जिवांची व त्यांच्या मालमत्तेची सर्रास हानी व त्यातून आपली जगण्याची चैन करीत असतात. अशा चोरलोकांचा आपल्याशी ‘पल्ला’ पडू नये किंवा आपल्या घरावर त्यांची नजर पडू नये असे जर वाटत असेल तर राहणाऱ्या प्रत्येकाने आपल्या घरात ‘सावधानता’ बाळगणे गरजेचे व जरुरी आहे. पण हे तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण आपल्या घराची सुरक्षा मजबूत व भक्कम करू शकू तेव्हाच!
आपण ज्या ठिकाणी राहतो ते घर, फ्लॅट, चाळीतला रूम, कुडळाखीची झोपडी असो, त्या ठिकाणी परिवारासोबत राहत असल्याने त्या मालमत्तेचे संरक्षण करणे प्रत्येकाला आवश्यक आहे.
आजच्या काळातील फ्लॅट संस्कृतीची संकल्पना झपाटय़ाने बदलत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीतील संकल्पनाही आता बदलू लागल्या आहेत. पूर्वीच्या काळी घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून मोठे पितळी कुलूप व आतल्या बाजूने लोखंडाची लांब सळई लावत असत. त्यानंतर दरवाजांना ‘लॅच’ (Latch) वापरले जाऊ लागले, ज्यात बँकिंग सिस्टीम असून दरवाजा बंद व उघडताना चावी तीन वेळेस फिरवावी लागते, तर दरवाजाच्या आतील बाजूस सेफ्टीचेन, ताडी, टॉवरबोल्ट व आतून बाहेर दिसण्यासाठी छोटीशी दुर्बिण मध्यभागी लावली जाते त्यास ‘Eye-piece’ किंवा ‘Peeplence’ म्हणतात. यानंतर घरांच्या सुरक्षेचे पुढचे पाऊल म्हणजे- मुख्य दरवाजासमोर लावला जाणारा सुरक्षित व लोकप्रिय असा ‘Safety Door’ लाकडी किंवा लोखंडी हा सेफ्टी दरवाजा तयार केला जातो व त्याससुद्धा ‘Latch’ लावून घराची सुरक्षितता वाढविता येते. या सेफ्टी दरवाजाच्या वरील अध्र्या भागात अॅल्युमिनिअम किंवा लोखंडाचे ग्रील लावले जात असल्याने त्यातून बाहेर आलेल्या व्यक्ती दिसू शकतात, तसेच दूध, पेपर आतमध्ये घेण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
सुरक्षेच्या या पुढच्या काळात मुख्य दरवाजावर लावलेल्या कुलपाशी घरात आवाज येणाऱ्या बेल (”bell’’) बरोबर जोडली जाते. जर अशा दाराशी किंवा कुलपाशी बळजोरी केल्यास लगेचच ही बेल वाजत राहते व त्यामुळे चोरीचा प्रकार घरातल्या माणसांना समजू शकतो. त्याचप्रमाणे दरवाजाला लावले जाणारे कुलूप व लॅच असे वापरले जाऊ लागले की त्याच्या दुसऱ्या चाव्या कंपनी बनवत तर नाहीच, पण दुसरी नकली चावीसुद्धा करून घेता येत नाही. अशा प्रकारची सुरक्षा जरी महाग असली तरी आपल्या जिवापेक्षा नक्कीच ती स्वस्त आहेत.
सध्याच्या व आजच्या काळात अत्याधुनिक उपकरणे सुरक्षेसाठी वापरली जातात. त्यातील एक प्रकार म्हणजे ‘व्हिडीओ फोन कॅमेरा’ याचे कनेक्शन टी.व्ही.ला लावून घराच्या बाहेर छोटासा कोणालाही सहज न दिसणारा व्हिडीओ कॅमेरा लावू शकतो व आलेल्या व्यक्तीचे चित्र टी.व्ही.वर बघून तसेच आतून फोनद्वारे त्याच्याशी संवाद साधून व खात्री पटविल्यानंतर दरवाजा उघडू शकतो. हेच या व्हिडीओ कॅमेराचे खरे वैशिष्टय़ आहे.
घर व आपल्या सुरक्षिततेसाठी पैशाचे नियोजन करून त्याचा वापर झाल्यास महागडय़ा फ्लॅटची सुरक्षा जिवापेक्षा जास्त जपली गेल्यास सुरक्षित जगण्याचा आनंद खूप काळ घेता येईल. त्याचबरोबर सरकारी यंत्रणा, पोलीस खात्याला आपल्या परीने हातभार लागून सामाजिक कर्तव्य पार पाडता येईल. आपल्या अनमोल जिवाचे रक्षण करणाऱ्या घराच्या सुरक्षेवरच आपले जीवन अवलंबून आहे हे विसरून तर मुळीच चालणार नाही!
आजच्या काळातील फ्लॅट संस्कृतीची संकल्पना झपाटय़ाने बदलत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीतील संकल्पनाही आता बदलू लागल्या आहेत. पूर्वीच्या काळी घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून मोठे पितळी कुलूप व आतल्या बाजूने लोखंडाची लांब सळई लावत असत. त्यानंतर दरवाजांना ‘लॅच’ (Latch) वापरले जाऊ लागले. दरवाजाच्या आतील बाजूस सेफ्टीचेन, ताडी, टॉवरबोल्ट व आतून बाहेर दिसण्यासाठी छोटीशी दुर्बिण मध्यभागी लावली जाते त्यास ‘Eye-piece’ किंवा ‘Peeplence’ म्हणतात. यानंतर घरांच्या सुरक्षेचे पुढचे पाऊल म्हणजे- मुख्य दरवाजासमोर लावला जाणारा सुरक्षित व लोकप्रिय असा ‘Safety Door’ लाकडी किंवा लोखंडी हा सेफ्टी दरवाजा तयार केला जातो व त्याससुद्धा ‘Latch’ लावून घराची सुरक्षितता वाढविता येते. या सेफ्टी दरवाजाच्या वरील अध्र्या भागात अॅल्युमिनिअम किंवा लोखंडाचे ग्रील लावले जात असल्याने त्यातून बाहेर आलेल्या व्यक्ती दिसू शकतात.