वीज बिल वाढण्याच्या कारणांपकी दोन कारणे जास्त महत्त्वाची आहेत. एक म्हणजे सर्वाच्याच घरी आता विजेवर चालणाऱ्या उपकरणांची संख्या वाढत चालली आहे व दुसरे म्हणजे वीज मंडळांकडून/ कंपन्यांकडून विजेचा प्रति युनिट दर वाढतच चालला आहे. त्यामुळे बऱ्यापकी अखंडित वीज पुरवठय़ाचा आनंद घेताना त्याची जरा जास्तच किंमत आपल्याला मोजावी लागत आहे. यावर उपाय काय? तर वीज बचत! अर्थात वीज बचत म्हणजे घरात अथवा बाहेर अंधार करून बसणे किंवा उपलब्ध असूनही विजेवर चालणाऱ्या आधुनिक उपकरणांचा वापर न करणे, हे नसून जास्तीत जास्त नसíगक ऊर्जेचा वापर करणे, तसेच वीज बचतीसाठी अन्य मार्ग अंगीकारणे हाच उपाय आहे.
यामध्ये वीज बचतीचा सर्वात सोपा, सहज, सर्वाना परवडण्याजोगा व प्रभावी उपाय म्हणजे एलईडी दिव्यांचा वापर करणे. एलईडी म्हणजे ‘लाइट इमिटिंग डायोड’. हे खरे तर नेहमीच्या दिव्यांसारखे दिवे नसून एक इलेक्ट्रॉनिक उपकरणच म्हणायला हवे. पण याचा उपयोग मात्र खूपच परिणामकारक होतो. एलईडी दिवे हे नेहमीच्या पारंपरिक दिव्यांचे म्हणजे सीएफएल, बल्ब, टय़ुब, सोडियम व्हेपर, मक्र्युरी व्हेपर, हॅलोजन अशांपेक्षा खूपच कमी प्रमाणात विजेचा वापर करतात, पण त्याचबरोबर त्या पारंपरिक दिव्यांइतकाच किंबहुना जास्तच प्रकाश देतात. म्हणजे एखादा ७ किंवा १० वॅटचा एलईडी दिवा हा त्याच्या गुणवत्तेनुसार २५ वॅट बल्ब किंवा २० वॅट सीएफएलपेक्षा जास्त प्रकाश देऊ शकतो. त्याचप्रमाणे त्याचे आयुष्यदेखील तुलनेने खूपच जास्त राहते. चांगल्या प्रतीचे एलईडी दिवे हे किमान ४० ते ५० हजार तास इतके टिकू शकतात.
एलईडी दिव्यांचा उपयोग सर्वच ठिकाणी होतो, पण त्यातूनही हॉटेल्स, शोरूम्स, दुकाने, मॉल्स अशी ठिकाणे की जिथे ग्राहक नसण्याच्या वेळेसदेखील सर्व दिवे चालू ठेवून झगमगाट करणे भाग असते, अशा ठिकाणी एलईडी दिव्यांचा खूपच उपयोग होतो. अशा ठिकाणी एलईडी दिवे बसविल्यास भरपूर प्रकाश तर मिळतोच, पण वीज बिलामध्ये बचतही होते.
त्याचप्रमाणे मोठमोठय़ा सोसायटय़ा, इमारती आदी ठिकाणी जिने, पाìकग, बाग, क्लब हाऊस, पथदिवे अशा ठिकाणी एलईडी दिव्यांचा वापर केल्यास बऱ्याच प्रमाणात वीज बचत होऊन वीज बिल कमी येऊ शकते.
याव्यतिरिक्त सर्व प्रकारची घरे, बंगले, हॉस्टेल्स, हॉस्पिटल्स, औद्योगिक संस्था, कंपन्या, व्यापारी संकुले, शाळा, कॉलेजेस, कारखाने इ. व इतर अनेक ठिकाणी, जेथे वीज प्रकाशासाठी वापरली जाते, अशा सर्वच ठिकाणी एलईडी दिव्यांचा उपयोग खूपच लाभदायी ठरतो. एलईडी दिवे हे इनडोअर व आउटडोअर अशा प्रकारांमध्ये उपलब्ध असतात. इनडोअरमध्ये खोल्यांमधील दिवे, जिन्यांतील दिवे, पाìकग, पॅसेजमधील दिवे यांचा समावेश होतो, तर आउटडोअरमध्ये पथदिवे, आवारातील दिवे, बागेतील दिवे इ.चा समावेश होतो. तसेच व्यापारी किंवा औद्योगिक वापरासाठी फ्लड लाइट्स, स्पॉट लाइट्स, फोकस लाइट्स इ.साठीदेखील एलईडी दिवे परिणामकारक ठरतात.
एखादी इमारत अथवा संकुल नव्याने बांधतानाच जर एलईडीचा वापर केला गेला तर जास्त चांगले, पण जुन्या ठिकाणचे आधीचे पारंपरिक दिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी लावता येतात. त्यासाठी आधीच्या दिव्यांचे हौसिंग अथवा फिटिंग आहे तेच ठेवून फक्त आतील दिवा काढून त्या ठिकाणी एलईडी बसविता येतो. यामुळे खर्चात बचत तर होतेच, पण इंटेरिअरलादेखील धक्का न लागता त्याचे सौंदर्य अबाधित राहते.
एकदा एलईडी दिवे बसविल्यावर अजून वीज बिलामध्ये बचत करावयाची असल्यास एक उत्तम उपाय म्हणजे ते दिवे ‘सौर ऊर्जेवर’ चालविणे! त्यामुळे एकदाच काय तो खर्च होतो, पण नंतर पुन्हा पुन्हा वीज बिलावरील खर्चाचा प्रश्न राहत नाही.
एलईडी दिव्यांच्या किमती मात्र पारंपरिक दिव्यांपेक्षा तुलनेने जास्त असतात व त्या कोणत्या ‘मेक’चे एलईडी दिवे आहेत त्यावर अवलंबून असतात. अर्थात, सुरुवातीस एकदाच गुंतवणूक केल्यावर वापराप्रमाणे साधारणत: १ ते ४ वर्षांतच पसे वसूल होतात व नंतर दीर्घ मुदतीच्या बचतीचा फायदा होतो.
shashikantmshukla@gmail.com
एलईडी वापरा, वीज बचत करा!
गेले काही महिने कदाचित दोन-तीन वष्रे आपण बऱ्यापकी ‘भारनियमन मुक्त’ दिवस (की रात्री) अनुभवत आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-11-2013 at 11:28 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use led save electricity