पर्यावरणस्नेही रंगांमुळे डोके दुखणे, मळमळणे, श्वसनविषयक आजार, चक्कर येणे, छातीत दुखणे, फुप्फुसांत जळजळ होणे, डोळे, नाक आणि घसा जळजळणे अशा समस्यांना आळा घालण्यास मदत होते आणि आरोग्याची आपसूक काळजी घेतली जाते.
एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याला थेट हानी पोहोचवणाऱ्या घटकांपकी एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे घर सजावटीसाठी वापरले जणारे रंग. आपण जास्तीत जास्त वेळ खोलीत (घर वा ऑफिस) राहिल्या कारणाने आपल्याला आरोग्यास अतिशय हानिकारक असणाऱ्या विषारी द्रव्ये, क्षोभके, अ‍ॅलर्जीकारक घटक
आणि वायू यांचा सामना करावा लागतो. आरोग्याला पोहोचणारी हानी टाळण्याकरिता आणि घरातील आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरणाकरिता खालील गोष्टींचा अवलंब करा.
घरात उत्तम व्हेंटिलेशन असल्याची खात्री करून घ्या.
आद्र्रता आणि पावसाच्या पाण्याने होणारे घराचे नुकसान याबाबत काळजी घ्या.
विषारी द्रव्यांशी संपर्क येऊ नये यासाठी प्राथमिक खबरदारी घ्या.
 घरला सुरक्षित ठेवण्याकरिता तसेच नूतनीकरण आणि रिमॉडेिलगमध्ये आपल्या नकळत घराला पोहोचणारी हानी टाळण्याकरिता काही बदल घडवून आणणे.
घरातील ओलावा काढून टाकण्याकरिता आणि आद्र्रता कमी करण्याकरिता प्रत्येक बाथरूम आणि किचनला एक्झॉस्ट फॅन बसवणे.
घराची नियमित तपासणी करा.
घरातील प्रदूषित हवेचा दुष्परिणाम घरात जास्तवेळ घालविणारऱ्या लोकांवर सर्वाधिक होतो.
एका संशोधनातून असे निदर्शनास आले आहे की, घरातील हवा ही घराबाहेरील हवेपेक्षा २२०० पटीने प्रदूषित असते. ही हवा गर्भातील बाळाच्या बुद्धयांकावरही परिणाम करू शकते. या हवेमुळे श्वासोच्छ्वासाचा त्रास होणे,  डोळ्यांची आणि त्वचेची जळजळ होणे अशा समस्या उद्भवतात, त्यामुळे ही प्रदूषित हवा आरोग्याला हानिकारक असते.
घर साजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या बहुतेक रंगांची निर्मिती व्होलेटाइल ऑरगॅनिक कंपाऊंड्स (व्हीओसीज्) पासून केली जाते, ज्याने हवेचा दर्जा खालावतो आणि आरोग्यास धोका निर्माण होतो. या घटकांना न्यूरोटॉक्सिन्स असे म्हटले जाते आणि त्याने आरोग्यास  हानी पोहोचते. व्हीओसींमुळे बाळांमध्ये फुप्फुसाशी संबंधित आजार, अ‍ॅलर्जी, डोळ्यांतून सतत पाणी वाहणे, डोळे लाल होणे, वाहते नाक, कफ आणि घशाचा संसर्ग अशा समस्या उद्भवतात. याशिवाय, बाळांच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही विपरीत परिणाम होतो. बाळांकरिता व्हीओसी धोकादायक ठरण्याची तीन मुख्य कारणे पुढीलप्रमाणे:
बाळाची फुप्फुसे विकसित होत असतात. त्यामुळे  ती अधिक संवेदनशील असतात. विकासाच्या या टप्प्यावर फुप्फुसातील उतींना हानी पोहोचते, जी प्रौढावस्थेतही भरून निघत नाही.
बाळाची फुप्फुसे प्रौढ व्यक्तीच्या फुप्फुसाच्या एकचतुर्थाशपेक्षाही लहान असतात आणि त्यामुळे हवेमधील  विषारी द्रव्यांचा त्यांच्यावर अधिक परिणाम होतो.
 फुप्फुसाच्या कमी क्षमतेमुळे बाळांना प्रौढांपेक्षा अधिक श्वास घ्यायला लागतो, त्यामुळे त्यांना घरातील वायुप्रदूषणाचा सर्वात जास्त त्रास होतो.
लहान मुले आपला बहुतेक वेळ घरात घालवतात परिणामी त्यांचा संपर्क वायुप्रदूषकांशी सातत्याने येत असतो. या हानिकारक प्रदूषकांमुळे लहान मुलांमध्ये रक्तातील शिसाचे वाढते प्रमाण, अस्थमा आणि श्वसनसंस्थेशी संबंधित इतर हानिकारक आजारांचा समावेश आहे.
काही पारंपरिक रंगांमध्ये व्हीओसींचे प्रमाण अत्युच्च असते, जे प्रौढांनाही हानिकारक ठरू शकते. त्यामुळे प्रौढांमध्ये फुप्फुसांचे किंवा हृदयविकार उद्भवण्याची किंवा फुप्फुसांचे कार्य खालावणारा क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी आजार होण्याची शक्यता असते.
हल्ली लोक आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक झाले आहेत आणि ते आरोग्यदायी आणि सुरक्षित घरांना प्राधान्य देतात. अशी घरे एअर प्युरिफायर्स, फíनचर, फिटिंग्ज आणि खास रंग यांचा वापर करून प्राप्त करता येऊ शकतात. पर्यावरणस्नेही रंगांमुळे डोके दुखणे, मळमळणे, श्वसनविषयक आजार, चक्कर येणे, छातीत दुखणे, फुप्फुसांत जळजळ होणे, डोळे, नाक आणि घसा जळजळणे अशा समस्यांना आळा घालण्यास मदत होते आणि आरोग्याची आपसूक काळजी घेतली जाते. पर्यावरणस्नेही रंगांची ओळख ग्रीन सीलवरून पटवून घेता येते. या ग्रीन सीलवरून रंगांमध्ये गरजेच्या असलेल्या पर्यावरणीय मानकांचा अवलंब करण्यात येतो. हे सील असणाऱ्या रंगांमधील व्हीओसीचे प्रमाण नॉन-फ्लॅट फिनिशकरिता १०० ग्रॅम/लि. आणि फ्लॅट फिनिशकरिता ५० ग्रॅम/लि.हून कमी असते. प्रायमर्स आणि फ्लोअर पेण्ट्सकरिता ग्रीन सील व्हीओसीचे प्रमाणही १०० ग्रॅम/लि. असते, तर रिफ्लेक्टिव्ह वॉल कोटिंग्जमधील प्रमाण ५० ग्रॅम/लि. मर्यादेच्या पुढे जाऊ नये. घरातील हवेचा दर्जा उत्तम राखल्याने घरात राहणाऱ्यांच्या उत्तम आरोग्याची आणि सुरक्षिततेची हमी मिळते.

Story img Loader