’ प्रश्न : आमच्या गृहनिर्माण संस्थेमध्ये बहुतांश काळ अॅडमिनिस्ट्रेटरचा कारभार होता. या काळात संस्थेची कोणतीही देखभाल त्यांच्याकडून झालेली नाही. नवीन कार्यकारिणीने सन २००० पासून आत्तापर्यंत महिना १०० रुपयेप्रमाणे देखभाल खर्च भरावा असे फर्मान काढले आहे. त्याला बहुसंख्य सभासदांचा विरोध आहे. परंतु ऑक्टोबर २०१५ पासून देखभाल खर्च देण्यास सर्व सभासद तयार आहेत. तसा ठरावदेखील विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. तर या ठिकाणी नवीन कमिटी पूर्वलक्षी प्रभावाने देखभाल खर्च वसूल करू शकते का?
– ज्ञानेश्वर बागुल, चेंबूर, मुंबई
उत्तर : सर्वप्रथम आपण एक गोष्ट स्पष्ट केलेली नाही, ती म्हणजे जेव्हा कार्यकारिणीने सन २०००पासून देखभाल खर्च लावताना त्याला सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली होती का? ती घेतल्यावर आपण किती दिवसांत विशेष सर्वसाधारण सभा बोलावलीत आणि वर दर्शविलेला ठराव मंजूर करून घेतलात? या सर्व गोष्टींच्या खुलाशावरच या प्रश्नाचे उत्तर देता येईल. कारण एका विषयावर एकाच वर्षांत दोन ठराव मंजूर केले आहेत की काय, हेदेखील विचारात घ्यावे लागेल. पण एक गोष्ट निश्चित, देखभाल होवो अथवा न होवो, पण देखभालीसाठी विशिष्ट रक्कम जमा करण्याचा हक्क गृहनिर्माण संस्थेला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा