ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांच्या घराविषयी..

‘सोनेरी क्षणांचे सोबती’ ही ओळ वाचताना आपण ती आपल्याच आवाजात वाचतो का? जरा पुन्हा वाचून बघा. ही ओळ वाचताना तुमच्याही नकळत तुमच्या कानात एक भारदस्त आवाज घुमला असेल. हा आवाज आपल्या खूप परिचयातला आहे. जंगल बुक कार्टून मधल्या ‘बघीरा’चा आवाज असाच होता का? ‘गूगल नॅव्हिगेशन्स’वर मराठी सूचना ऐकताना हाच आवाज ऐकू येतो का? कुणाचा आहे बरं हा आवाज? ‘आभाळमाया’मधल्या ‘मन्ना’चा किंवा ‘माझे पती सौभाग्यवती’मधल्या दत्ताभाऊंचा आवाजही असाच वाटतो ना? वाटणारच! कारण या सगळ्या कॅरेक्टर्समागचा आवाज एकच आहे- उदय सबनीस यांचा! अभिनेता आणि डबिंग आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या उदय सबनीसांना आज ‘रेशमी घरटे’मध्ये भेटू या.

thieves broke into a locked house at Karad and stole gold ornaments from the house
घरफोडीत तब्बल ११० तोळे सोन्याचे दागिने, दीड लाखांची रोकडही लांबवली
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
amruta khanvilkar gave unique name to new home
आलिशान घर खरेदी केल्यावर अमृता खानविलकरची पहिली प्रतिक्रिया! घराचं नाव ठेवलंय खूपच खास; म्हणाली, “मेहनतीने अन्…”
Gold and silver prices fell, Lakshmi Pujan, Gold price,
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर
Chahatt Khanna New Home
दोन प्रेमविवाह, दोन्ही वेळा घटस्फोट; आता अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, दिवाळीनिमित्त दाखवली घराची झलक
rahul gandhi 10 janpath house
“माझ्या वडिलांचं इथेच निधन झालं, त्यामुळे या घराचा…”, राहुल गांधींनी १०, जनपथबाबत केलं विधान!
amruta khanvilkar bought new house in mumbai
२२ व्या मजल्यावर ३ BHK घर! दिवाळीच्या मुहूर्तावर अमृता खानविलकरचं गृहस्वप्न साकार; दाखवली नव्या घराची पहिली झलक
Pimpri, Mantri Awas Yojana Rawet, Rawet latest news,
पिंपरी : रावेतमधील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरांसाठी आणखी प्रतीक्षा; वाचा काय आहे कारण?

उत्तम कलाकार आणि तितकेच चांगले वाचक असणाऱ्या उदय सबनीसांचं घर कसं असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता मनात होतीच. उदयसर, त्यांची पत्नी स्निग्धा आणि मुलगी समीहा यांचं ठाण्याच्या ‘शिवाई नगर’मध्ये १बीएचकेचं घर आहे. स्निग्धाताई अभिनेत्री आहेत. ‘फ्रेशर्स’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ अशा मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय. समीहा सेंट झेवियर्स कॉलेजमधून नुकतीच बारावी उत्तीर्ण झाली आहे. शिवाय ती कथ्थक शिकते. ती आणि उदयसर दोघे नकुल घाणेकरकडे साल्सा शिकतात.

स्निग्धाताई आणि उदयसर ‘रवी इस्टेट’मधल्या या घरात १९९९ मध्ये राहायला आले. त्यापूर्वी ते खोपटला भाडय़ाच्या घरात रहात होते. साहजिकच स्वत:चं घर असावं ही त्यांची आणि स्निग्धाताईंची इच्छा होती. घर बुक केलं तेव्हा घराचा हप्ता कसा भरता येईल अशी चिंता त्यांना आधी वाटत होती, पण मग कामं मिळत गेली, प्रगती होत गेली आणि घराचं कर्ज कसं फिटलं ते कळलंही नाही. त्यावेळी स्टेट बँकेने केलेली मदत खूप मोलाची ठरली असं उदयसरांनी आवर्जून सांगितलं. नवीन घरात आल्यावर त्यांच्या मुलीचा- समीहाचा जन्म झाला. याच घरात आल्यानंतर उदयसरांनी पहिली गाडी घेतली. नवं घर त्यांना सर्वार्थाने लाभदायक ठरलं. एखाद्याचं घर लांब आहे की जवळ हे मुंबई आणि आसपासच्या भागांत तरी स्टेशनच्या संदर्भाने ठरत असतं. पण उदयसरांनी गाडी घेतल्यानंतर त्यांचा स्टेशनशी संपर्क राहिला नाही. त्यामुळे लांब-जवळ हा प्रश्नच उरला नाही. उलट शूटिंग/डबिंग बरचसं वेस्टर्नला होत असल्यामुळे घरी पोहोचण्याच्या दृष्टीने शिवाई नगर सोयीचं झालं.

‘रवी इस्टेट’ हे उदयसर रहात असलेलं कॉम्प्लेक्स हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी डिझाइन केलंय. त्याचं वैशिष्टय़ म्हणजे तिथल्या कुठल्याही घराच्या भिंती कॉमन नाहीत. वेगवेगळ्या बिल्डिंग्ज जोडल्यासारखी रचना आहे. मोकळी जागा, झाडं भरपूर आहेत. खिडकीतून बाहेर दिसणारी हिरवाई डोळ्यांना सुखावते. आजूबाजूला फार गर्दी, गोंगाट नाही, सुखावणारी शांतता अजूनही आहे. पावसाळ्यात तर तिथे आणखीनच छान वाटतं. उदयसरांच्या घरात पश्चिमेकडचा वारा येतो, उन्हाचा फारसा त्रास होत नाही, त्यामुळे इतक्या वर्षांत एसी लावायची त्यांना गरजच वाटली नव्हती, आत्ता अलीकडे त्यांनी एसी लावून घेतला.

त्यांच्या घराचं इंटिरियर प्रमोद मांदुस्कर या त्यांच्या मित्राने केलंय. मूळ स्ट्रक्चर तसंच ठेवून जागेचा जास्तीत जास्त वापर होईल असं इंटिरियर त्यांनी केलंय. त्यांच्याकडे हॉल आणि बेडरूममध्ये लिहिण्या-वाचण्यासाठी दोन टेबल्स आहेत. हॉलमधल्या खिडकीजवळ एक कट्टा करून घेतलाय. हा कट्टा म्हणजे उदयसरांची घरातली आवडती जागा आहे. लिहिण्याचं टेबल हीसुद्धा त्यांची आवडती जागा. त्यांच्याकडे गणपतीचे फोटो, मूर्त्यां बऱ्याच आहेत. शिवाय त्यांना मिळालेल्या पुरस्कारांच्या ट्रॉफीजही आहेत. भरपूर पुस्तकं आहेत. खिडकीजवळच्या कट्टय़ावर बसून वाचायला, हार्डडिस्कवरून मोठय़ा प्लाझ्मा टी.व्ही.वर लावलेले सिनेमे बघायला, मित्रमंडळींशी, घरातल्यांशी गप्पा मारायला त्यांना खूप आवडतं. दिवसाला एक सिनेमा तरी ते बघतातच! त्यांना वाचनाची आवड आधीपासून होतीच पण आता वाचनासाठी ते ठरवून वेळ काढतात. रोज सकाळी चार्ली चॅप्लिन वाचतात. एकूणच चरित्रात्मक पुस्तकं वाचायला त्यांना जास्त आवडतं. प्रभाकर पणशीकर, सचिन पिळगांवकर यांची आत्मचरित्रं, टॉलस्टॉय, बाबा आमटे, साधनाताई आमटे यांचं ‘समिधा’, वेगवेगळी नाटकं, प्रभात चित्रमंडळाचा ‘रूपवाणी’ हा अंक अशी अनेक पुस्तकं त्यांच्या नित्य वाचनात असतात. शिवाय गेल्या काही वर्षांत ‘लोकसत्ता’ हे त्यांचं आवडतं वर्तमानपत्र झालंय!

उदयसरांच्या घरापासून येऊर तसं जवळ असल्यामुळे त्यांना येऊर-उपवनला वॉकला जायला आवडतं. रवी जाधव, विजू माने, मंगेश देसाई अशी त्यांची मित्रमंडळी जवळपास राहतात, डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह जवळ आहे, रेस्टॉरंट्स, मार्केट वगैरे सगळ्या सोईसुविधा जवळपास आहेत, त्यामुळे आणखी मोठं घर घ्यावं, दुसरीकडे राहायला जावं असं त्यांना वाटत नाही. या घराशी-परिसराशी जुळलेलं नातं, इथली सकारात्मक ऊर्जा यांच्यामुळे हेच घर हे त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा कम्फर्ट झोन आहे!

‘रवी इस्टेट’ हे उदयसर रहात असलेलं कॉम्प्लेक्स हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी डिझाइन केलंय. त्याचं वैशिष्टय़ म्हणजे तिथल्या कुठल्याही घराच्या भिंती कॉमन नाहीत. वेगवेगळ्या बिल्डिंग्ज जोडल्यासारखी रचना आहे. मोकळी जागा, झाडं भरपूर आहेत. खिडकीतून बाहेर दिसणारी हिरवाई डोळ्यांना सुखावते. आजूबाजूला फार गर्दी, गोंगाट नाही, सुखावणारी शांतता अजूनही आहे. पावसाळ्यात तर तिथे आणखीनच छान वाटतं.

अंजली कुलकर्णी-शेवडे anjalicoolkarni@gmail.com