बंगल्यांमध्ये व प्रीमियम फ्लॅट्समध्ये एक वेगळी डायनिंग रूम असते. पण छोटय़ा फ्लॅट्समध्ये (यात २ बीएचके/ ३ बीएचकेही आले.) स्वतंत्र डायनिंग रूम बनवणे अशक्य असते. या फ्लॅट्समध्ये डायनिंग रूमचे रूपांतर डायनिंग एरियामध्ये होते. हा एरिया फ्लॅट्सच्या एकंदरीत प्रशस्तपणावर अवलंबून असतो. साधारणपणे हा एरिया ७० ते १०० चौ. फूट इतका असतो. या एरियावर आपल्या डायनिंग टेबलचा आकार ठरतो. जर एरिया थोडा मोठा असेल तर डायनिंग टेबल बरोबरच डायनिंग युनिटही बनवता येते. घरातील सगळे सदस्य एकत्र बसू शकतील इतके मोठे डायनिंग टेबल असावे, पण डायनिंग एरिया लहान असेल व घरातील सदस्यांची संख्या जास्त असेल तर अडचण निर्माण होते. डायनिंग एरिया लहान असूनही, कुटुंब मोठे आहे म्हणून मोठय़ा डायनिंग टेबलचा दूराग्रह करू नये. असे करणे घरातील सहज वावरास मारक ठरते. काही घरात वरचेवर पाहुणे जेवावयास असतात. अशा वेळेस मोठे डायनिंग टेबल गरजेचे आहे; पण काही घरात अट्टहासाने मोठे डायनिंग टेबल घेतले जाते. कारण कधी कधी पाहुणे येतात. वर्षांतून एखाद दोन वेळा जर पाहुणे येणार असतील तर त्या पाच दिवसांकरता वर्षांचे उर्वरित ३६० दिवस मोठय़ा डायनिंग टेबलमुळे होणारी गैरसोय सहन करण्यात काहीच अर्थ नाही. अशा वेळेस कन्व्हर्टेबल डायनिंग टेबलचा पर्याय योग्य ठरतो. कन्व्हर्टेबल डायनिंग टेबल म्हणजे अशा प्रकारचे टेबल- जे गरज भासल्यास २ / ४ आसनी किंवा ४ आसनांचे ६/८ आसने करता येतात. अशा प्रकारची डिझाइन्स आपल्याला चांगल्या फर्निचर शोरुम्समध्ये पाहता येतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा