parag

प्रचंड वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या ओघात नकळत आपण ओढले जातो आणि काही नवीन गोष्ट आत्मसात करून बघताना एखादी चांगली जुनी गोष्ट आपण हळूच बाजूला टाकून देतो. आणि हे सहजच घडतं. तसेच झाले आहे आपल्या ‘माती’चे. ह्य नवीन वाटचालीमध्ये आपण तिला कुठेतरी विसरलो आहोत.
घर बांधणीपासून ते मोठय़ा प्रकल्पांच्या बांधणीमध्ये आता अनेक बदल घडले आहेत. पूर्वी विटांची भिंत असायची, तर आता सिमेंटचे गट्टू किंवा ब्लॉक्सचे प्रकार असतात, तसेच काही वर्षांपूर्वी काँक्रीटचे कॉलम ओतायसाठी लाकडी फाळके वापरात येत. आता तर अखंड भिंत व छताचे साचे उपलब्ध आहेत! असे दिवसागणिक बदल घडताना आपल्याला दिसत आहेत. हे सगळे बदल येणाऱ्या नवीन प्रकारच्या मागण्या पुरवण्यासाठी आणि मुख्यत्वे वेळ आणि पैसा बचतीच्या उद्देशाने आहेत. त्यामुळे ह्य बदलांचा निसर्गावर, समाजावर होणाऱ्या परिणामाची फार उशिरा दखल घेतली जाते. ‘जमेल तेवढे जामेल तसे’असा पर्यावरण रक्षणाचा मार्ग आपण स्वीकारला आहे. ह्य आपल्या इच्छेला विधायक स्वरूप द्यायला कदचित ती आपली ‘माती’ मदत करू शकेल! माती- अगदी नैसर्गिक, सहजरीत्या मिळणारी आणि सगळ्यांना मिळणारी. ‘पर्यायी बांधकाम’ पद्धतीमध्ये मातीचा वापर खूप चांगला होऊ शकतो हे आता सिद्ध झालं आहे. मातीच्या वापराच्या काही मर्यादा आहेत. कदाचित तिचा वापर आपल्याला उंच इमारतींमध्ये करता येणार नाही, हो पण छोटय़ा इमारतींसाठी नक्की होऊ शकेल.
‘माती’चा बांधकामामधल्या वापरावर भारतात व इतरही देशांत खूप अभ्यास, संशोधन झाले आहे व अजूनही होत आहे. साधी माती, भाजकी माती, संकुचित माती, वाळू मिश्रित माती व इतर प्रकारांचा ह्यंचा वापर करून प्रायोगिक तत्त्वांवर इमारती बांधण्यात आल्या आहेत. तसे अजूनही आपल्या खेडय़ांमध्ये बांधकामासाठी परंपरागत पद्धतीने मातीचा वापर होतो, उदाहरणार्थ भूज प्रांतातील स्थानिक लोकांची घरं ‘भुंगा’ हे एक मातीच्या बांधकामचे उत्तम उदाहरण आहे. मातीच्या विविध उपयोगाची, तिच्या सुंदरतेची, तिच्या नैसार्गीग्तेची भुरळ अनेक लोकांना पडलेली आहे. अनेक आर्किटेक्ट, व्यावसायिकांनी मातीचा वापर करून प्रकल्प पूर्ण केले आहेत. हरियाणामधील सूरज कुंड येथील ‘कच्छी कोठी’ ह्य प्रकल्पात सध्या मातीच्या विटांचे बांधकाम आहे व छत म्हणून बांबू व मातीच्या लेपाचा वापर केला आहे. भूजमधील ‘हुनरशाला’ हा प्रकल्प ह्याबाबतीत अद्वितीय आहे. ह्या संस्थेचा परिसर – साधी माती, संकुचित माती, बांबूच्या ताटय़ावर सारवलेली माती, गवताचे विणलेले छत, सुंदर रंगकला, इतर कलाकुसर ह्य सगळ्यांनी सजलेलं आहे. ह्य संस्थेमध्ये कारागिरांना वेगवेगळ्या कौशल्यांचं प्रशिक्षण दिलं जातं. तसेच Development Alternatives ह्य संस्थेची मुख्यालयाची दिल्लीतील इमारत ही मातीच्या विटांनी बनलेली आहे. एका संस्थेच्या इमारत बांधणीमध्ये मातीचा उपयोग हा एक मोठा प्रयोग होता आणि तो यशस्वी झाला. त्याची सुरुवात त्यांनी त्यांच्या स्वत:च्या इमारतीतून केली आहे. ह्या इमारतीत त्यांनी Stabilized Compressed Mud Block म्हणजेच ‘संकुचित’ मातीपासून बनविलेल्या विटांचा वापर केला आहे.
मातीमध्ये ५% सिमेंट मिश्रण करून मग ती संकुचित केली जाते. सिमेंटला डिंकासारखे वापरून ह्या मिश्रणाला अधिक शक्ती आणि स्थिरता येते. ह्य तयार झालेल्या विटा कडक उन्हात वळवल्या की तयार होतो तो एक प्रदूषणविरहित, पर्यावरणस्नेही बांधकामाचा पर्याय! कोळसा, इंधन, भाजणे, धूर, प्रदूषण ह्यंचा दूर दूर संबंध नाही. मातीतल्या बांधकामाचा दुसरा पर्याय आहे तो ‘धम्मस केलेल्या भिंती.’ ह्य प्रकारात भिंतीच्या साचामध्ये ४ इंचांच्या मातीचा थर देत ‘धम्मस’ करत- म्हणजेच लाकडाच्या ओंडक्याने त्याला विशिष्ट पद्धतीने दाबायचे. असे करत एक एक थर टाकत आपणास पाहिजे त्या उंचीपर्यंत थर द्यायचे. अशा पद्धतीने भिंती पूर्ण करायच्या. नंतर छतासाठी मातीच्या तयार झालेल्या विटांचा वापर करून कमानीच्या आकारात रचायच्या. मग त्यावर हलक्या वजनाचे मातीचे मिश्रण टाकायचे आणि सपाट करायचे. ह्य सगळ्या बांधकामाला ठरावीक ठिकाणी कॉँक्रीटचा वापर केला तर अधिक धष्टपुष्ट, व टिकाऊ बनते.
आजच्या जीवनात लागणाऱ्या इमारती ह्यपासून बांधता येतील? उत्तर ‘हो’ आहे. फक्त ऊन वळवेल तितका वेळ, वेगवेगळ्या कामासाठी मातीचे योग्य मिश्रण व थरांचे तंत्र , आणि समर्पित कारागीर! हा त्रिवेणी संगम घडून यावा लागतो. पण हे शक्य आहे. गरज आहे फक्त इच्छेची आणि प्रयत्नांची. ह्यचा साक्षात अनुभव आला तो अहमदाबादस्थित Red Bricks School ला भेट देऊन. सुप्रसिद्ध आर्किटेक्ट अनिकेत भागवत ह्यांच्या उत्कृष्ट शैलीतले हे मातीचे लेणे आहे. पर्यायी बांधकामाचा हा एक उत्तम नमुना आहे. काँक्रीटचा योग्य ठिकाणी वापर करून तिला भक्कमपणा आणलेला आहे. मातीचा वापर – विटा, भिंती, विटांचे खांब, कमान छत, प्लास्टर, जमीन लेप – अशा विविध प्रकारे वापरून एक आधुनिक इमारत तयार झाली आहे. खिडक्यांच्या योग्य प्रयोजनामुळे भरपूर प्रकाश आला आहे. भिंती, छत मातीच्या आहेत, त्यामुळे आतमध्ये अजिबात गरम होत नाही. खोल्यांमध्ये एसी लावायची तर गरजच नाही. विचार करा, हे सगळं झालं ते त्या जागेत उपलब्ध असलेल्या ‘माती’मधून. अनिकेत सरांचे कला व नियोजनकौशल्य, तंत्र, वेळ देऊन करायची चिकाटी आणि त्यांना मिळालेलं समर्पित मनुष्यबळ हे ह्य यशाचं गमक आहे. प्रदूषण न करणारे सामानवाहू वाहनं, विजेशिवाय चालणारी अवजड उपकरणे, आहे त्या जागेतल्या खडय़ा अन् खडय़ाचा योग्य तो उपयोग, बहरणारी सृजनशीलता, समाधानी मन आणि कमी खर्चात आकारास येणारी ती इमारत. पर्यायी बांधकामाची ही दिशा आपल्याला खुणावत आहे. गरज आहे संवेदनशील होण्याची.
parag.kendrekar@gmail.com

Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट
Story img Loader