दिवसेंदिवस विस्तारीत असलेल्या महामुंबईच्या परिघाचा नवा केंद्रबिंदू अशी ओळख असलेल्या बदलापूरची गेल्या दहा-बारा वर्षांतील वाटचाल स्तिमित करणारी आहे. कारण दशकभरापूर्वी एक छोटे गाववजा शहर अशी ओळख असलेले बदलापूर आता मध्य रेल्वे मार्गावरील नवे महानगर म्हणून उदयास येत आहे. मुंबई-ठाण्यातील घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यानंतर कनिष्ठ आणि मध्यमवर्गीयांना किफायतशीर घरांसाठी अंबरनाथ, बदलापूरशिवाय अन्य फारसे पर्याय उरलेले नाहीत. एककाळ असा होता की, घरांच्या बाजारात बदलापूरचा पर्यायअगदी शेवटी होता. मात्र अवघ्या गेल्या १५ वर्षांत परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. आता मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरातील घराच्या शोधात असलेली ७० टक्के कुटुंबे सर्वात आधी बदलापूरचे पर्याय पाहतात. त्यामुळेच गृहनिर्माण क्षेत्रात मंदी असो वा तेजी बदलापूरमधील घरांना कायम मागणी असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा