आपल्या घरी जेव्हा एखादा पाहुणा प्रथमच येतो, तेव्हा लिव्हिंगरूममध्ये बसल्याबसल्या त्याची नजर खोलीत सर्वत्र फिरत असते. या शोधक नजरेतून तो पाहुणा जणू आपल्या व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा घेत आपल्या एकंदर राहणीमानाचा आणि आपल्या घरातल्या संस्कृतीचा अंदाज घेत असतो. आपल्या आवडीनिवडी आणि सजावटीच्या वस्तू निवडताना असलेला आपला चोखंदळपणा या सगळ्याबाबत या पाहणीतून एक प्रकारे निष्कर्ष निघत असल्यामुळे लििव्हगरूम हा आपल्या घराचा आरसाच असतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये. म्हणूनच घराच्या दर्शनी भागातल्या या खोलीच्या सजावटीला विशेष महत्त्व आहे.
या खोलीच्या सजावटीतला मुख्य घटक असतो, तो म्हणजे इथली आसनव्यवस्था! या खोलीला आपल्याला कसा लुक द्यायचा आहे, ते ठरवून त्याप्रमाणे या खोलीतली आसनव्यवस्था आपल्याला करावी लागते. खोलीला जर वेस्टर्न लुक द्यायचा असेल, तर मोठय़ा आकाराचे गुबगुबीत फोमचे देशी किंवा परदेशी बनावटीचे सोफा सेट वापरता येतील. असे सोफा सेट अगदी ५० हजार रुपयांना किंवा त्यापेक्षाही अधिक किमतीला उपलब्ध असतात, पण हे सोफा सेट बरीच जागा व्यापत असल्यामुळे मोठय़ा आकाराच्या खोल्यांमध्येच ते ठेवता येतात. तसंच अशाच खोल्यांमध्ये त्यांची शोभा अधिक जाणवते. सर्वसाधारण मध्यम आकाराच्या खोल्यांमध्ये सोफा कम बेड किंवा साधे सोफे अधिक उठून दिसतात. खोली खूपच लहान असेल तर सोफ्याऐवजी लहान जागेत बसेल अशी एखादी डिझायनर बठक करून घेता येईल. आपली लििव्हगरूम भारतीय दिसावी असं वाटत असेल तर त्यातही ‘अँटिक इंडियन लुक’, ‘साधा इंडियन लुक’ की ‘मॉडर्न इंडियन लुक’ द्यायचा ते ठरवावं लागेल. जुन्या पद्धतीची डिझाईन्स आणि कोरीव नक्षीकाम असलेल्या हात आणि पायांच्या टेबल-खुच्र्याची डिझाईन्स यासाठी वापरता येतील. सोफ्याऐवजी ‘लो सीटिंग अ‍ॅरेंजमेंट’ असलेली आणि गाद्या-तक्के-लोड यांचा वापर असलेली भारतीय बठक व्यवस्था उपयोगात आणता येईल. अशी बठक व्यवस्था करताना जमिनीवर साधारण ६ इंच उंचीचा लाकडी चौथरा करून त्यावर मग गाद्या घालाव्यात. खोली जराशी मोठी असेल तर संमिश्र पद्धतीची बठक व्यवस्थाही करता येईल. खोलीच्या एका बाजूला सोफा आणि खुच्र्या व दुसऱ्या बाजूला भारतीय बठक करून घेता येईल. हा संमिश्र पद्धतीचा एक प्रकार झाला. दुसऱ्या प्रकारे संमिश्र पद्धत अमलात आणताना खुच्र्या थोडय़ा रुंदीला नेहमीपेक्षा जास्त व खुच्र्याची सीट थोडी नेहमीपेक्षा उंचीला जमिनीपासून कमी अंतरावर अशा प्रकारे केली, तर लो सीटिंग असलेल्या या खुर्चीत मांडी घालूनही बसता येईल. म्हणजेच हा भारतीय आणि वेस्टर्न पद्धतीचा संगम आहे असं म्हणता येईल. बठक व्यवस्था ही इंग्रजी ‘एल’ किंवा ‘सी’च्या आकारात करता येते. ‘सी’च्या आकारातल्या बठक व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेंटर टेबल्स ठेवता येतात. लििव्हगरूमला मॉडर्न लुक देताना सेंटर टेबलवरच्या काचेच्या टॉपचा आकार हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. असाच टेबलावरच्या टेबलक्लॉथप्रमाणे असणाऱ्या निळसर रंगातल्या काचेचा टेबलटॉप सोबतचे छायाचित्रात दाखवला आहे. अशा प्रकारे बठक व्यवस्थेमध्ये निरनिराळे आकार आणि डिझाईन्स करून नावीन्यपूर्ण, पण स्पेस एफिशियण्ट अशी आसनं तयार करता येतील. ‘एल’च्या आकारातल्या बठक व्यवस्थेमध्ये कॉर्नर टेबल ठेवलं तर ते चहा-फराळाचे जिन्नस तसंच वर्तमानपत्रं ठेवण्यासाठी उपयोगी पडतं. अशा कोपऱ्यात असलेल्या कॉर्नर टेबलच्या वर एखादी हँगिंग लँपशेड लावून त्यात पिवळा प्रकाश देणारा कमी पॉवरचा दिवा बसवला, तर संध्याकाळच्या वेळी तिथे बसून संगीत ऐकताना किंवा आराम करताना केवळ तोच दिवा लावून इतर दिवे बंद केल्यावर त्या खोलीतलं मंद शांत वातावरण मनाचा थकवा दूर करायला मदत करतं.
लििव्हगरूममधला दुसरा महत्त्वाचा घटक जो हल्ली बऱ्याच घरांमध्ये बघायला मिळतो, तो म्हणजे टीव्ही आणि शोकेस असलेलं डिस्प्ले युनिट. ही दोन प्रकारची असतात. एक बंदिस्त आणि दुसरा प्रकार म्हणजे खुली शोकेस. पारंपरिक बंदिस्त शोकेसची तयार युनिट्स बाजारात तीस ते पस्तीस हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. बंदिस्त युनिटमध्ये शोकेसमधल्या वस्तूंवर धूळ कमी बसते, पण खुल्या ग्लासच्या रॅकवर असलेल्या वस्तूंवरची धूळ रोजच्या रोज साफ करणं गरजेचं असतं, नाही तर धुळीचं प्रदर्शन होतं. हे टीव्ही किंवा डिस्प्ले युनिट डिझाईन करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. प्रदर्शनीय भागात आपण नेमकं काय डिस्प्ले करणार आहोत, त्याचे आकार किती मोठे असणार वगरे गोष्टींचं नियोजन आधी करून त्याप्रमाणे मग बंदिस्त शोकेसमधल्या रॅक्सची उंची ठरवावी लागते. एकदा का ती ठरवली की, मग त्यात बदलाला फारसा वाव नसतो; पण खुल्या शोकेसच्या बाबतीत मात्र हे स्वातंत्र्य असतं हा त्या शोकेसचा फायदा असतो. उदाहरणार्थ, भेटीदाखल अनेक शोभेच्या वस्तू वाढदिवस आणि इतर समारंभांच्या निमित्ताने आपल्याला मिळत असतात. अनेक पुरस्कार असतात. अशा वेळी त्या वस्तू बंद कपाटात पडून राहण्यापेक्षा थोडय़ाथोडय़ा दिवसांनी त्यातल्या काही काही वस्तू जर या शोकेसमध्ये ठेवल्या तर शोकेसची मांडणी नवनवीन दिसते. इथे खुल्या शोकेसचा फायदा होतो, कारण भेटी देणारी व्यक्ती ही काही आपल्या शोकेसच्या रॅक्सची उंची मोजून आपल्याला भेटी देत नाही. मग जर शोकेस खुलं असेल, तर त्यावरची वस्तूंची मांडणी फिरती ठेवणं सहज शक्य होतं. बठक व्यवस्थाही अशी मोकळी असावी की, ज्यात सोफा, खुच्र्या यांच्या जागा काही महिन्यांनी बदलता येऊ शकतील. त्यामुळे पाहुण्यांबरोबरच आपल्याही नजरेला तोचतोचपणामुळे येणारा कंटाळा टाळू शकतो.
पण याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्टही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती ही की, ही सगळी मांडणी भडक वाटता कामा नये किंवा एखाद्या हॉटेलची खोलीही वाटता कामा नये. तुमचं घर हे घरच वाटायला हवं आणि ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं हवं. अन्यथा ते हास्यास्पद दिसू शकतं. या सगळ्या शोकेसमधल्या शोभेच्या वस्तू असोत वा बठक व्यवस्था, त्यांची कलात्मक मांडणी तुम्ही कशी करता यावर घरी येणाऱ्या माणसांना तुमच्या घरात वाटणारी प्रसन्नता आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसभराच्या कामानंतर थकूनभागून घरी आल्यानंतर तुम्हालाही एक आरामदायी वातावरण मिळणं गरजेचं असतं. यासाठी तुमची लिव्हिंगरूम तुम्ही अधिकाधिक तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशी सजवतानाच जास्तीत जास्त मोकळी जागा ठेवा आणि लिव्हिंगरूमची फíनचर शोरूम होणार नाही याचीही दक्षता घ्या.
सिव्हिल इंजिनीअर
मनोज अणावकर – anaokarm@yahoo.co.in

Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
janhvhi kapoor share her paintings
जान्हवी कपूर आहे उत्कृष्ट चित्रकार, रेखाटलं सुंदर चित्र; तुम्हालाही काढायचं आहे? जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स
mhada bolinj loksatta news
वसई : बोळींज म्हाडा घरांच्या स्वस्ताईवर आधीचे खरेदीदार नाराज, फसवणूक केल्याचा आरोप
Loksatta lokrang Hindustani Classical Music Zakir Hussain Music Tabla Playing 
झाकीरभाई…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन आला तर..”, रहिवाश्यांचा संताप, वैयक्तिक वाद विकोपाला!
Cleaning workers looting passengers at Kalyan station
कल्याणमध्ये पालिकेच्या खासगी स्वच्छता कामगारांकडून रेल्वे प्रवाशांची लूट
BNHS will conduct cleanliness drive in Sanjay Gandhi National Park to promote awareness
‘बीएनएचएस’ची निसर्ग जागरुकता आणि स्वच्छता मोहीम
Story img Loader