माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. त्यानिमित्तानेपाच गणेश मंदिरांच्या वास्तूवैभवांविषयी..

आपल्या राज्याबरोबरच गोव्यातही अनेक ठिकाणी माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. मोरगावचा मोरेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक अशी अष्टविनायक मंदिरं, गणपतीपुळ्याचं स्वयंभू गणेश मंदिर यांबरोबरच अनेक मंदिरांमधून हा उत्सव साजरा केला जातो. विविध ठिकाणी गणेश जन्माच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात. गणेश मंदिरं म्हटली की, आपल्या डोळ्यांसमोर ही अशी नेहमीचीच महाराष्ट्रातली गणेश मंदिरं येतात. पण आपल्या देशातच नव्हे तर परदेशातही तितक्याच भक्तीभावाने पूजल्या जाणाऱ्या या दैवताची मंदिरं देशातल्या इतर राज्यांबरोबरच इतर देशांमध्येही प्रसिद्ध आहेत. माघी गणेश जयंतीनिमित्तानं यापकी आपल्या राज्यातल्या, देशातल्या इतर राज्यांमधल्या आणि इतर देशांमधल्या गणेशाचं आणि तिथल्या प्रसिद्ध  गणेशवास्तूंचं हे प्रातिनिधिक पंच गणेशवास्तू दर्शन.

wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
After Diwali municipalitys secondary division school timings changed again
माध्यमिक शाळांच्या वेळेत दिवाळी सुट्टीनंतर बदल, माध्यमिक शाळा पूर्वीप्रमाणेच सकाळी ८ ते २ या वेळेत
Aamir Khan Karisma Kapoor Raja Hindustani kiss
“तीन दिवस…”, ‘राजा हिंदुस्तानी’तील आमिर खान-करिश्मा कपूरच्या किसिंग सीनबाबत दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे

आंध्रप्रदेशमधल्या चित्तूर जिल्ह्य़ातील कनिपकम इथलं विनायक मंदिर (छायाचित्र १) हे अकराव्या शतकातलं मंदिर असून चोला राजवटीतल्या कुलोथुंगा चोला या राजाने ते बांधलंय. नंतर विजयनगरच्या राजाने १३३६ मध्ये त्याचा विस्तार केला. या मंदिरातल्या वरसिद्धिविनायकाची कथा अशी आहे- प्राचीन काळी या भागात तीन भाऊ राहात होते. जमिनीच्या छोटय़ाशा तुकडय़ावर शेती करून गुजराण करणाऱ्या या तिघांपकी एक भाऊ मुका, एक आंधळा, तर एक बहिरा होता. त्यांच्यातला एकजण शेतीला पाणी द्यायचा, तर दोघेजण विहिराला बांधलेली मोट चालवायचेत. एकदिवस ते नेहमीप्रमाणे शेताला पाणी द्यायला गेले असताना, त्यांना आढळून आलं की, विहिरीतलं पाणी पूर्णपणे आटून ती कोरडी पडली आहे. त्यामुळे त्यांच्यातला एकजण विहिरीत उतरला आणि त्याने जमीन खणायला सुरुवात केली. खणताखणता त्याची लोखंडी पहार एका दगडाला लागली आणि त्यातून रक्त वाहू लागलं. विहिरीत पाणी आलं. पण विहीर रक्ताच्या लाल रंगाच्या पाण्याने भरून गेली. हे दृश्य पाहून धक्का बसलेल्या त्या तिघांचंही व्यंग नाहीसं झालं. मुक्याला वाचा आली, बहिऱ्याला ऐकू येऊ लागलं आणि आंधळ्याला दृष्टी आली. त्यानंतर तिथे सगळे गावकरी  धावत आलेत आणि त्यांनी तिथे खणायला सुरुवात केली. पण अचानक स्वयंभू वरसिद्धिविनायकाची मूर्ती पाण्याबरोबर वर आली. मग त्यांनी ती जखम शांतवण्यासाठी अनेक नारळ फोडून देवाला वाहिले. त्या नारळांचं पाणी आजूबाजूच्या सुमारे सव्वा एकर परिसरात पसरलं अशी अख्यायिका आहे. यावरूनच ‘कनि’ म्हणजे ओली जमीन आणि ‘पकम’ म्हणजे अशा जमिनीत आलेला पाण्याचा प्रवाह यावरून या ठिकाणाला ‘कनिपकम’ हे नाव पडल्याची आख्यायिका सांगितली जाते.कर्नाटकातल्या मुलबगल जवळच्या कुर्डुमाले इथलं शाळीग्राम गणपती मंदिर हे असंच पौराणिक आख्यायिका असलेलं एक आणखी गणेश मंदिर. बारा फुटांपेक्षा जास्त उंची असलेली शाळीग्राम गणेश मूर्ती हे इथलं मुख्य आकर्षण (छायाचित्र २).

karnataka-ganapati-temple

 

 

त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांनी या गणेशाची आराधना करण्याकरता या मूर्तीची निर्मिती सत्ययुगात केल्याची आख्यायिका सांगितली जाते. सप्तऋषींमधले कौण्डिण्य ऋषी हे आजही या देवळात रोज येऊन गणपतीची आराधना करतात आाणि जवळच असलेल्या गुंफांमध्ये त्यांचा वास असतो, अशी इथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या ईशान्येला देवळाबाहेर सुंदर तलाव आहे. तसंच चबुतऱ्यावर गणरायाचं वाहन असलेल्या मूषकाची मोठी मूर्ती आहे. याच्या जवळच भव्य दीपस्तंभ आहे. या मूर्तीचं दुसरं मुख्य आकर्षण सांगितलं जातं ते, कितीही अंतरावरून पाहिलं तरी ही मूर्ती मोठीच असल्यासारखी वाटते.

आपल्या राज्यातल्या जालना जिल्ह्यातल्या राजूर इथलं महागणपती मंदिर हेसुद्धा भाविकांचं खास आकर्षण आहे. जालना शहरापासून २५ किलोमीटरवर असलेलं हे गणेश मंदिर म्हणजे गणेशपुराणात सांगितलेल्या पीठांपकी एक पूर्णपीठ मानलं जातं. मंदिराच्या प्रवेशद्वारावर पांढऱ्या शुभ्र संगमरवरातली अष्टकोनी कमान आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यावरचा उंच उभट गोलाकार भव्य घुमट, त्यावरचा सोनेरी कळस आणि त्याबाजूला मंदिराच्या सभामंडपाचा  थोडासा लहान असलेला घुमट असे दोन पांढरेशुभ्र घुमट याकडे लक्ष जातं आणि निळ्याशार आकाशाच्या पाश्र्वभूमीवर असलेले हे दोन भव्य घुमट पाहताना, त्यांच्यापुढे असलेलं आपलं खुजेपण जाणवतं. (छायाचित्र ३)़.

jalna-ganpati-mandir

 

अशारीतीने नतमस्तक होऊन मंदिरात शिरल्यानंतर संगमरवरी खांब आणि फरसबंदी असलेल्या सभामंडपातल्या वातावरणात शांत आणि प्रसन्न वाटतं. लाल रंगाच्या स्वयंभू मूर्तीचे चमकणारे डोळे पाहिल्यावर गणरायाची ती कारुण्यरूपी मुद्रा संकटात असणाऱ्या रक्तांच्या मनाला आधार देते. देशाबाहेरच्या गणेश मंदिरांचा विचार करायचा, तर अमेरिकेतलं पारंपरिक पद्धतीचं सुरुवातीच्या काळातल्या पहिल्या काही मंदिरामधलं िहदू देवालय म्हणजे न्यूयॉर्क इथलं श्री महावल्लभ गणपती देवस्थान होय. अमेरिकेला स्थलांतरित होण्याबाबत परदेशस्थांसाठी असलेल्या नियमांमध्ये १९६५ साली शिथिलता आल्यानंतर, मोठय़ाप्रमाणावर भारतीय अमेरिकेला जाऊ लागले. त्यानंतर उत्तर अमेरिकेतल्या िहदू देवालय संस्थेची स्थापना २६ जानेवारी १९७० रोजी झाली. मग १९७७ साली या मंदिराची उभारणी पूर्ण झाली. या मंदिराच्या घुमटाची शैली ही दाक्षिणात्य मंदिरांच्या शैलीप्रमाणे गोपुरं असलेली शैली आहे (छायाचित्र ४)़.देवळाचं बांधकाम कसं करावं हे सांगणाऱ्या अगम वास्तुशास्त्र नियमांनुसार या देवळाची रचना केली आहे. या मंदिरात येणारे भक्त हे केवळ िहदूच असतात असं नाही, तर आजूबाजूच्या क्वीन्स प्रांतातले इतर धर्मीय भक्तही गणेशाच्या आराधनेसाठी मंदिरात येतात. या मंदिरात पाठशाळा, योगा आणि ध्यानाचं शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं जातं.

newyork-ganpati-temle

 

परदेशातलं दुसरं प्रसिद्ध गणेश मंदिर म्हणजे लंडनच्या नर्ऋत्य दिशेला असलेल्या आणि टेनिससाठी प्रसिद्ध असलेल्या विम्बल्डन इथलं श्रीगणपती मंदिर. १९८० साली या मंदिराची उभारणी झाली. हे मंदिर मूळ ज्या इमारतीत होतं, ती चर्च आणि समाजमंदिराची होती (छायाचित्र ५) यामुळे त्याच्या आतला भाग हा चौकोनी आकाराचा होता. त्यामुळे या मंदिराच्या पुनर्बाधणीचं काम २०१४ साली हाती घेण्यात आलं. या नव्या बांधकामात पारंपरिक दाक्षिणात्य शैलीचा वापर करण्यात आलाय. गणरायाची ही वेगवेगळी रूपं आपल्याला हेच सांगतात की, भाषा प्रदेश, देश, कोणताही असो सगळीकडचा गणराया जसा एकच आहे, तसाच माणूस आणि त्याचं माणूसपण जपणं हे आयुष्य जगताना जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी आवश्यक आहे. आयुष्य जगताना कुठेतरी श्रद्धा असणं आवश्क असतं. माणसा-माणसांमधला सद्भाव, भक्ती, श्रद्धा या गोष्टी धर्मातीत आणि देशातीत आहेत. हे लक्षात घेतलं तर जगाच्या पाठीवरचे सर्वच प्राणीमात्र ही देवाची लेकरं असल्याची शिकवण केवळ पोथीनिष्ठ न राहता आचरणात जाईल, आणि तसं झालं तर गणेशाच्या कृपेने माणसामाणसांमध्ये, प्रदेशांमध्ये आणि देशांमध्ये सौहार्दाचं वातावरण राहायला मदत होईल.

vimbalton-ganpati-tempkle

anaokarm@yahoo.co.in