आपण आयुष्यात कितीतरी घरांना काहीना काही कारणाने भेटी देतो, पण त्यातली काही मात्र त्यांच्या वेगळेपणामुळे कायमची आपल्या आठवणीत राहतात. तशीच ही आठवणीत कायमची नोंद झालेली घरे..

व्यक्तीप्रमाणे प्रत्येक घराची एक वृत्ती असते, अशी काही घरे आपल्या पाहण्यात आली की त्या घरात राहणाऱ्या कुटुंबाची वृत्ती किंवा स्वभावधर्म कसा असावा याबद्दल आपल्याला बरीचशी कल्पना आल्याशिवाय रहात नाही. एखाद्याने भरमसाट खर्च करून आपले घर सजवलेले असते. त्या घरातील प्रत्येक वस्तू अत्यंत किमती असतेच, पण तिची निवडही फार चोखंदळपणे केलेली दिसत असते. सजावटीचा मूळ आराखडादेखील कल्पकतेने आखलेला जाणवत असतो. पण त्यात राहणाऱ्या व्यक्ती मात्र बेफिकीर आणि बेशिस्त वृत्तीच्या आहेत असे त्या घराची एकंदर अवस्था पाहून  चटकन लक्षात येते. अत्यंत महागडय़ा सोफ्यावर घातलेले कव्हर खाली एका बाजूला लोंबत असते, त्यावर वर्तमानपत्रांचे मोकळे कागद इतस्तत: उलटेपालटे होत पसरलेले असतात. कोणी नसताना पंखा गरगरत असतो. टीपॉयवर चहा-कॉफीचे रिकामे कप, बशा तशाच सुकत पडलेल्या असतात. मुलांची पुस्तके, इतर साहित्य इतस्तत: पडलेले असते. डायनिंग टेबलच्या खुर्च्याच्या पाठीवर, दुपट्टे, ओढण्या, अंग पुसलेले टॉवेल लोंबकळत पडलेले असतात. डायनिंग टेबल अनंत भांडय़ांनी आणि वस्तूंनी गजबजलेले असतेच शिवाय केळ्याचे एखाद-दुसरे सालदेखील सुकत पडलेले असते. किचनमधला पसारा तर अवर्णनीय अवस्थेत असतो. चपलांचा खास बनवून घेतलेला स्टॅण्ड दरवाजात असला तरी चपला, बूट, सांडल्स, मोज्यांचे गोळे मात्र बाहेर खाली इतस्तत: खाली विखुरलेल्या अवस्थेत असतात.. पंख्यांच्या पात्यांच्या कडावर धुळीच्या लोळ्या चिकटलेल्या असतात. छतावर असंख्य दिव्यासाठी खोबण्या तयार करून त्यात दिवे बसवलेले असतात, त्या खोबण्यात जळमट धरलेली स्पष्ट दिसतात. लहान मुलांनी काढून ठेवलेले त्यांचे कपडे फरशीवर त्याच अवस्थेतच तसेच पडून असतात. बैठकीच्या खोलीची ही अवस्था असल्यावर त्या फ्लॅटच्या इतर खोल्यांत डोकावायची आवश्यकताच रहात नाही. थोडक्यात, आपले घर सुंदर दिसावे या हेतूने केलेले सर्व प्रयत्न कुटुंबातील बेशिस्तीमुळे आणि बेफिकिरीमुळे वाया गेलेलं असतात. तेथे पाहुणा म्हणून गेलेल्या व्यक्तीची त्या कुटुंबांबद्दल काय समजूत होत असावी हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

vastu shastra bathrrom according to vastu tips
Vastu Shastra : तुमच्याही घरात बेडरूमला अटॅच्ड बाथरूम आहे का? मग वास्तुशास्त्रातील ‘हे’ नियम करा फॉलो, अन्यथा…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Athavale claim chairman of trust running Siddharth college
‘पीपल्स’च्या अध्यक्षपदावर रामदास आठवले यांचा दावा; जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी
Andheri zopu yojana, Eligibility , Disqualification ,
अंधेरीतील झोपु योजनेत मृत व्यक्तींच्या नावे पात्रता! आणखी सहा झोपडीवासीयांची पात्रता रद्द
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Sachin | M| Maharashtra Sadan free for literary conference Nagpur news aharashtra Sadan free for literary conference Nagpur news साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत (लोकसत्ता टीम)Tendulkar and Raj Thackeray
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत

त्याच्या उलट काही ठिकाणी स्वच्छता आणि टापटीप याचा इतका अतिरेक केला जातो की बाहेरून त्या घरात आलेल्या माणसाला आपण कायम कोणाच्या तरी नजरकैदेत आहोत असे वाटू लागते. अशा घरातला एखादा माणूस कायम हातात एक फडका घेऊन घरभर कायम फिरत असतो. प्रत्येक गोष्ट जागच्या जागी आहे की नाही आणि जरा जरी जागची हलली असली तरी परत ती होती तिथेच ठेवायची आणि कुठे धूळ कचरा असलाच तर हातातल्या फडक्यांनी झटकून टाकायचा. अशा एका घरात काही कारणाने मला जावे लागले तेव्हा मी आत गेल्या गेल्या बसण्यासाठी सोफ्याकडे जाऊ  लागताच त्या घरातील एका व्यक्तीने मला अडवलं आणि मला लाकडी खुर्ची बसायला दिली. पण मी बसण्यापूर्वी त्यांनी ती स्वच्छ पुसून ठेवली. मी दरवाजातून चालत ज्या ठिकाणाहून आलो होतो तेवढा भाग लगेच ओल्या फडक्याने पुसून घेतला. एका ट्रेमध्ये पाण्याचा ग्लास घेऊन एक व्यक्ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली. मी ग्लास उचलून तोंडाला लावला, रिकामा ग्लास मी कुठेही ठेवू नये याची दक्षता म्हणून मला पाणी देणारी व्यक्ती माझ्यासमोर उभीच होती. माझे पाणी पिऊन होताच रिकामा ग्लास लगेच त्या व्यक्तीने हातात घेतला आणि ती निघून गेली. त्या कुटुंबातील ज्या व्यक्तीशी माझे काम होते व ती व्यक्ती माझ्यासमोर बसून अगदी मोजक्या शब्दात बोलत होती, परंतु बोलता बोलता तिची नजर घरभर कायम भिरभिरत होती आणि कुठे काही दिसताच लगेच घरातील नोकराला त्याकडे लक्ष देण्यासाठी हाका मारून सांगत होती. मी काम आटोपून बाहेर पडलो, मात्र दरवाजा धाडकन लागला आणि त्याच्या पाठीमागून आलेला जरब बसेल असा आवाज मी स्पष्टपणे ऐकला. शांता, खुर्ची पुसून जागेवर जाऊ दे आणि पायपुसणे लगेच झटकून टाक. लादीवर ओला फडका फिरव. अशा घरात बाहेरून येणाऱ्याच्या मनावर एक कायमचे दडपण असते, त्याला सारखे वाटत असते, माझ्या नुसत्या एखाद्या लहानसहान हालचालीमुळे यांच्या घराची कडक इस्त्री मोडेल की काय? अशा घरातून बाहेर पडताच माणूस सुटकेचा अक्षरश: नि:श्वास टाकतो. अशी घरे तुमच्याही पाहण्यात आत्तापर्यंत बरेच वेळा आली असतील, पण मी मात्र एका घराचा तेथे एक रात्र आणि दुसरी सकाळ राहून घेतलेला अनुभव तुम्हाला सांगणार आहे. तो म्हणजे नोंदी ठेवणारे घर. त्या घरात प्रत्येक गोष्टीची न चुकता नोंद ठेवली जात असे.

काही ठिकाणी स्वच्छता आणि टापटीप याचा इतका अतिरेक केला जातो की बाहेरून त्या घरात आलेल्या माणसाला आपण कायम कोणाच्या तरी नजरकैदेत आहोत असे वाटू लागते. अशा घरातला एखादा माणूस कायम हातात एक फडका घेऊन घरभर कायम फिरत असतो. प्रत्येक गोष्ट जागच्या जागी आहे की नाही आणि जरा जरी जागची हलली असली तरी परत ती होती तिथेच ठेवायची आणि कुठे धूळ कचरा असलाच तर हातातल्या फडक्यांनी झटकून टाकायचा.

एका गृहस्थांकडे अचानकच मला माझ्या एका मित्राबरोबर जाण्याची आणि एक रात्र आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतच  राहण्याची वेळ आली. तसे ते माझे कोणी नातेवाईक नाहीत फार परिचयाचेदेखील नाहीत. माझ्या मित्राचे परिचित. मी तिथे असताना मला एक गोष्ट सारखी जाणवत होती, ती म्हणजे जेथे पाहावे तेथे अगदी बारीक, पण सुवाच्य अक्षरात  काहीना काही काळ्या अक्षरात लिहिलेले आहे. काही ठिकाणी अशा एका खालोखाल दोन-तीन नोंदी, म्हणजे दिव्याची बटने, पंख्याचा रेग्युलेटर.. अशा अजून काही ठिकाणी जरा निरखून पाहिल्यावर कळले की तेथे एखाद दुसरा शब्द आणि आकडे आहेत. जरा नीट निरखून पाहिल्यावर कळले त्या तारखा आहेत. टय़ूबलाइटच्या पट्टीवर टी, एस.सी. आणि त्या अक्षरा पुढे तारखा. मग मला तेथे असेपर्यंत तेच एक वेड लागलेले, जरा कुठे असे काही बारीक अक्षर दिसेल तेथे जवळ जाऊन मी ते वाचायचा प्रयत्न करू लागलो. माझे हे डोळे किलकिल करत जेथे तेथे वाचन सुरू झाल्यावर ते गृहस्थ मला म्हणाले, उद्या सकळी चहा घेता घेता आपण यावर बोलू. त्या गृहस्थांनी जे सांगितले आणि दाखवले ते ऐकून मी चकीतच झालो. त्यांच्याकडे रोज लागणाऱ्या गोष्टीव्यतिरिक्त म्हणजे दूध, किराणा माल, बारीक सटरफटर गोष्टी सोडल्या तर या वस्तूंचे देखील त्याच्याकडे वस्तुनिष्ठ लेजर ठेवलेले होते,

प्रत्येक गोष्टीवर  ती आणल्याची तारीख न चुकता टाकली जायची. त्यासाठी त्यांनी खिडकीमध्ये

एक छोटा खोका ठेवलेला होता. या खोक्यात कपडय़ावर धोबी वापरतो ती पक्की काळी शाई, टाक, काळ्या पांढऱ्या ऑइल पेंटच्या छोटय़ा डब्या आणि अगदी लहान ब्रश आणि भांडीकुंडी विकणारे वापरतात तसे, भांडय़ांवर नाव घालायचे मशीन आणि एक अणकुचीदार खिळा, हा लाकडी वस्तूवर नोंद करण्यासाठी.. असा संच तयार ठेवलेला. अन्नधान्य सोडून, जी जी म्हणून वस्तू घरात नवीन आणली जाते, सर्वाचे सर्व तऱ्हेचे कपडे, भांडीकुंडी, लाकडी वस्तू आणि इतर.. त्यावर ती विकत घेतल्याचा दिनांक न चुकता घातला जाई. शिवाय त्या घराची ओळख म्हणून तीन अक्षरी कोडदेखील त्या दिनांकापूर्वी टाकत. रात्री  झोपण्याआधी त्या दिवशी कुठली वस्तू नवीन आणली यासंबंधी शांतपणे आठवायची आणि लगेच अजिबात चालढकल न करता त्या नवीन वस्तूवर, त्या खोक्यातील आयुधे वापरून, कोड आणि त्या दिवसाची तारीख आणि त्याचे मूल्य टाकून झाले की मगच अंथरुणावर आडवे व्हायचे. काही वस्तू वारंवार वापरल्यामुळे किंवा घासपूस केल्यामुळे त्यांच्यावरील नोंदी अस्पष्ट होतात म्हणून दर दोन-चार महिन्यांनी एखाद्या रविवारी हे गृहस्थ अशा नोंदी परत ठळक करण्यासाठी आवर्जून वेळ काढत. या त्यांच्या प्रत्येक वस्तूवर नोंदी टाकण्यामुळे नव्याने घरात आलेल्या व्यक्तीला जिकडे तिकडे काळ्या, पांढऱ्या लहान ओळी कसल्या हा माझ्यासारखाच प्रश्न पडत असे आणि त्यातले गूढ कळले की प्रत्येक वस्तूजवळ जाऊन ते वाचण्याची त्याला गंमत वाटायला लागायची. आणि तो एक थोडा नाहक चर्चेचा विषय होई. शिवाय घरभर अशा काळ्या-पांढऱ्या नोंदीमुळे घराच्या एकूण सौंदर्याला बाधा निर्माण होते. त्यांच्या घरातील इतर सदस्य, या त्यांच्या, ‘प्रत्येक वस्तू नोंद’ हट्टावर थोडे नाराज होते, पण कधी कधी या नोंदी ठेवण्याच्या कल्पनेचा त्यांना चांगला फायदा झाला आहे हेदेखील त्यांना कबूल करावे लागत असे. त्या काळात काही वस्तूंसाठी काही कंपन्या प्रसिद्ध होत्या. आता त्याला ब्रँडेड म्हणतात. अशा प्रसिद्ध कंपनीची एखादी वस्तू लवकर बिघडली तर त्या कंपनीच्या स्थानिक विक्रेत्याला हे गृहस्थ सुनावून येत. शिवाय त्या कंपनीला देखील पोष्टाने आपली तक्रार कळवत. तिचा पाठपुरावा करत. कारण त्यांच्याकडे सदर वस्तू कधी विकत घेतली त्याची पक्की खरेदी तारीख असे. शंकेला वाव नसे. अशा त्यांच्या नोंदी ठेवण्याच्या पद्धतीमुळे त्यांनी वीज कंपनीकडून अधिक वसूल केलेले पैसे परत मिळवलेले होते. त्यांनी अशा पद्धतीने काही वस्तू कंपनीकडून बदलून मिळवल्या होत्या. कपडय़ावर केलेल्या नोंदी तर फारच उपयोगी पडतात. आपली वस्तू अशा पद्धतशीर नोंद केलेली असेल तर बरीच आमंत्रित जमा झाल्या ठिकाणी राहण्याची वेळ आली तर ढिगावारी असणाऱ्या  अंतर्वस्त्रे, रुमाल आणि पादत्राणे यातून आपली वस्तू सहज ओळखून निवडता येते किंवा आजूबाजूला गेलेले लहानसहान भांडेकुंडे हक्काने परत मिळवता येते.

एखाद्या रविवारी हे गृहस्थ अशा नोंदी परत ठळक करण्यासाठी आवर्जून वेळ काढत. या त्यांच्या प्रत्येक वस्तूवर नोंदी टाकण्यामुळे नव्याने घरात आलेल्या व्यक्तीला जिकडे तिकडे काळ्या, पांढऱ्या लहान ओळी कसल्या हा माझ्यासारखाच प्रश्न पडत असे आणि त्यातले गूढ कळले की प्रत्येक वस्तूजवळ जाऊन ते वाचण्याची त्याला गंमत वाटायला लागायची. आणि तो एक थोडा नाहक चर्चेचा विषय होई.

ही कल्पना कितीही चांगली आणि अभिनव वाटली तरी हे अखेर इतर बाबतीत जसे- कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा विक्षिप्तपणात, छांदिष्टपणात मोडतो किंवा हास्यास्पद ठरतो; त्याचप्रमाणे या अशा नोंदी ठेवण्याची पद्धत, त्याचे आगळेवेगळेपण ठरत असले तरी अनुकरणीय मात्र वाटत नाही, एवढे खरे.

या माझ्या अनुभवाला कैक वर्षे उलटून गेली. ती व्यक्तीही आता हयात असेल की नाही कल्पना नाही. मुळात तेथे एक रात्र काढण्यापुरताच त्यांचा माझा संबंध आलेला होता. कारण कोणाच्या तरी ओळखीने एखादी रात्र अनोळखी व्यक्तीकडे काढणे त्याकाळी अजिबात कठीण वाटत नसे. तसा प्रघातच होता.

संगायचा मुद्दा इतकाच, आपण आयुष्यात कितीतरी घरांना काहीना काही कारणाने भेटी देतो, पण त्यातली काही मात्र त्यांच्या वेगळेपणामुळे कायमची आपल्या आठवणीत राहतात. तशीच ही आठवणीत कायमची नोंद झालेली घरे.

मोहन गद्रे gadrekaka@gmail.com

Story img Loader