आतापर्यंत घराला नाना दोषारोप करणारी मी, अचानकच ‘छान शांतता होती, नाही इथे? आणि हिरवळ तरी किती, मुंबईत आहोत असं वाटायचंच नाही. बेडरूमच्या खिडकीतून दिसणाऱ्या झाडांनी किती विविध पक्ष्यांशी ओळख करून दिली आपली. जानेवारीत तर पंखादेखील लागत नव्हता इतकं छान वारं. शिवाय दोन बाल्कनी. हल्लीच्या घरांना तर बाल्कनी नसतेच. दांडिया, गणपती कसलाही आवाज पोहोचला नाही कधी आपल्यापर्यंत,’ असे नाना कॉम्प्लिमेंट्स घराला द्यायला लागले.
चार वर्ष चाललेलं चर्चेचं गुऱ्हाळ अखेर थांबलं आणि आमची बिल्डिंग पुनर्विकासासाठी सिद्ध झाली. रिकामी करण्यासाठी आम्हाला बिल्डरकडून दोन महिन्यांची मुदत देण्यात आली.
आतापर्यंत ‘किती खराब झालंय घर, इतक्या क्रॅक्समुळे मुंग्याही खूप झाल्यात. किचनचं छत तर कधीही पडेल,’ असं वाटतं. कोणाला बोलवावंसंही वाटत नाही. इतक्या अनारोग्यकारक वातावरणात जेवावंसंही वाटणार नाही कोणाला’ असे नाना दोषारोप करणारी मी अचानकच, छान शांतता होती, नाही इथे? आणि हिरवळ तरी किती, मुंबईत आहोत असं वाटायचंच नाही. बेडरूमच्या खिडकीतून दिसणाऱ्या झाडांनी किती विविध पक्ष्यांशी ओळख करून दिली आपली. जानेवारीत तर पंखादेखील लागत नव्हता इतकं छान वारं. शिवाय दोन बाल्कनी. हल्लीच्या घरांना तर बाल्कनी नसतेच. दांडिया, गणपती कसलाही आवाज पोहोचला नाही कधी आपल्यापर्यंत, असे नाना ूेस्र्’्रेील्ल३२ घराला द्यायला लागले. मेल्या म्हशीला मणभर दूध या प्रमाणे २९ वर्ष राहिलेल्या या घराबद्दल माझ्या मनात अचानक ममत्व उफाळून आलं. खरंच या घरांनी आम्हाला खूप चांगले दिवस दाखवले. नवऱ्यानी उत्तरोत्तर प्रगती केली, मुलगा शिष्यवृत्ती मिळवून परदेशी शिकायला गेला, मी भरपूर प्रवास केले, वगैरे वगैरे. पण.. या दिवसाचीही आम्ही चातुरतेने वाट पहात होतो, हेही तितकंच खरं.
घराला रंग देणं आणि घर बदलणं यातला महत्त्वाचा कॉमन प्लस पॉइंट म्हणजे घरातल्या नको त्या सामानाला बाहेरची वाट दाखवणं. पण आता तात्पुरतं का होईना, नवं घर शोधायचं होतं, ते कसं केवढं असेल, आपलं किती सामान सामावून घेईल ही चिंता होती.
सगळ्यात आधी अर्थात माळ्यावरचं सामान खाली काढायचं ठरलं. तिथे मी काय ठेवलंय हेच मी विसरलेली असल्यामुळे ते सगळं नक्कीच नकोसं असणार या भ्रमात मी होते. पण ते खाली आलं आणि माझा भ्रमनिरास झाला. सगळ्यात आधी धुळींनी माखलेली ती सूटकेस उघडली आणि मला जणू खजिनाच गवसला. बाकी सामान विल्हेवाटीची वाट बघत मुकाट बसून राहील.
सूटकेसमध्ये सर्वात वर होत्या ध्वनिमुद्रिका. रेकॉर्ड प्लेयर कधीच गेला आला होता, पण सत्तरच्या दशकात गाजलेल्या या ध्वनिमुद्रिका मला माझं नवीन लग्न झालं होतं त्या काळात घेऊन गेल्या. ूं’’ ऋ ५ं’’ी८ ची एल. पी., ‘शोले’च्या संवादांची एल. पी., भीमसेन जोशीचं शास्त्रीय संगीत, त्या शिवाय खामोशी, अमर प्रेम, प्रेम पर्बत या त्या काळी गाजलेल्या सिनेमांच्या छोटय़ा रेकॉर्ड्सनी माझ्या अनेक स्मृती जाग्या केल्या. ‘प्रेम पर्बत’चं ‘रात पिया के संग जागी री सखी’ हे गाणं यांनी लावलं की मी किती लाजत असे हे मला आठवलं. या रेकॉर्ड्स टाकून द्यायच्या? छे छे, किती आठवणी आहेत त्यात! नाहीतरी आम्ही दोन बेडरूमचं घर घेणारच होतो. राहतील कुठेही. आणि कुठेही कशाला आता मला सापडल्याच आहेत तर ठेवीन मी जपून माझ्या कपाटात. चोर बाजारात जाऊन एकादा रेकॉर्ड प्लेयर शोधावा का असा वेडा विचारही मनात येऊन गेला. आता आपल्याो्रल्लॠी१ ३्रस्र्२ वर सर्व तऱ्हेचं संगीत असताना त्याचं महत्त्व नॉस्टेल्जिया पुरतंच होतं. त्या खाली होती एक पिशवी आणि त्यात पत्रं. पण ही साधी-सुधी कौटुंबिक पत्रं नव्हती. मी वेळोवेळी अनेक लेखकांना त्यांचं लिखाण आवडल्याबद्दल लिहिलेल्या पत्रांची ती उत्तरं होती. पैकी गौरी देशपांडे, दीपा गोवारीकर, शकुंतला परांजपे यांना मी भेटूनही आले होते. त्यांनी छान गप्पा मारून त्या फक्त लेखिकाच चांगल्या नाही तर इन्सानही चांगल्या आहेत याचा प्रत्यय मला दिला होता.
अनेक वर्ष बनारसमध्ये राहिल्यामुळे माझा हिंदी साहित्याशीही परिचय होता. प्रथितयश लेखिका मन्नू भंडारी यांच्या कथांचा मराठीत अनुवाद करण्यासाठी परवानगी मागणाऱ्या माझ्या पत्राला त्यांनी ‘अवश्य अनुवाद करिये’ असं उत्तर दिलं होतं आणि मी सत्तरच्या दशकात केलेले हे अनुवाद त्याकाळच्या ‘अनुराधा, प्रपंच, मानिनी’ या मालिकांमध्ये छापूनही आले होते. मोहन राकेश आणि कमलेश्वर यांनी त्यांना अनुवादात रस नसल्याचे स्पष्ट आणि नम्र शब्दांत कळवले होते. अज्ञेय, शिवानी यांचीही त्रोटक पत्र यात होती. उत्तर द्यायचं सौजन्य मात्र सर्वानीच दाखवलं होतं.
पण अजून माझी म्हणावी अशी दोन पत्रं बाकीच होती. एक होतं, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचं. मी ‘वंगचित्रे’ वाचून पाठवलेल्या पत्राचं ते उत्तर होतं. बंगाली भाषा अतिशय समृद्ध असून मी ती शिकावी असं त्यांनी सुचवलं होतं.
शेवटी हाती आलं ते पत्र होतं हरिवंश राय बच्चन यांचं. अमिताभ बच्चन यांच्या लेटरहेडवर लिहिलेलं ते पत्र होतं. त्यांच्या ‘मिलन यामिनी’ या कवितेच्या काही ओळी त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून पाठवाव्या अशी विनंती मी केली असणार. मी ते पत्र त्यांच्या दिल्लीच्या वसंत विहारच्या पत्त्यावर पाठवलं होतं, पण टपाल खात्याच्या कृपेने ते रीडायरेक्ट होऊन त्यांना मुंबईत मिळालं होतं. त्यांनी लिहिलं होतं, ‘मैं अब बंबई अपने लडके के पास रहने आ गया हूँ. अधिक लिखने में मेरी उंगलियों में कष्ट होता है. मिलन यामिनी की दो पंक्तियाँ लिखकर भेज रहा हूँ.’ आणि त्या ओळीखाली त्यांची ती सुप्रसिद्ध इंग्रजीच्या ॠ िसारखी दिसणारी लपेटदार सही.
मला हर्षवायू व्हायचा शिल्लक होता. यांना दाखवल्यावर नवराच विचारू शकतो असा प्रश्न त्यांनी विचारला, ‘आता सुतावरून अमिताभचं घररूपी स्वर्ग गाठायचा विचार आहे का तुझा?’ तसा तो नव्हता.
अजून खूप काम होतं म्हणून मी पसारा आवरायला घेतला. आता जास्तीच्या कामाबद्दल माझी तक्रार नव्हती. या री डेव्हलपमेंटच्या निमित्ताने मी छान नॉस्टॅल्जिक मात्र झाले होते.