‘ते’अमेरिकेत घुसल्याची बातमी मधे वाचली होती, पण ठिकाण माझ्या घरापासून खूप लांब होतं. त्यामुळे बातमीमधला इंटरेस्ट मावळायला वेळ नाही लागला. आज सकाळी पेपर वाचताना डोळ्यांवर विश्वास बसणं कठीण झालं. तुमची उत्सुकता शिगेला वगैरे पोचण्याची वाट न बघता सांगते- हे नको असलेले घुसखोर- ज्यांना अमेरिकेचा व्हिजा लागत नाही, ते आहेत- ढेकूण.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
फ्लॉरिडाची- विशेषकरून साउथ फ्लॉरिडाची हवा बरीच दमट आहे. जवळजवळ सगळ्या उत्तर अमेरिकेत जेव्हा थंडीचा कडाका असतो, तेव्हाही आम्ही बीचवर जाऊन समुद्रस्नान करू शकतो. थंडीतलं कमीतकमी तापमान ४० डिग्री फॅरेनहाइट (साधारण ४ डिग्री-सेल्सियस) असं असतं. घरं, ऑफिसेस, शाळा, कॉलेजेस्, मॉल्स, बाकी दुकानं आणि सगळ्या इमारती एअरकंडिशन्ड- (तापमान कमी किंवा जास्ती करता येणाऱ्या) असल्याने फ्लॉरिडामध्ये स्नोबड्सची (हिवाळ्याच्या ४ महिन्यांमध्ये कॅनडा, उत्तर अमेरिकेतली राज्ये अशा ठिकाणांहून मुक्कामाला येणारे प्रवासी) गर्दी राज्याला चांगला बिझिनेस देते. नको असलेल्या पाहुण्यांच्या रूपात आलेले ढेकूण फ्लॉरिडाच्या टूरिझमला सुरुंग लावायची ताकद बाळगतात. नवल म्हणजे न्यूयॉर्क सॅनफ्रॅन्सिस्को ज्या यादीत टॉपवर आहेत, अशा ५० शहरांची ढेकणांच्या जास्तीतजास्त प्रादुर्भावांची यादी आहे, त्यात फ्लॉरिडा नाही. बहुतेक शहरं अमेरिकेच्या उत्तर, पूर्व आणि पश्चिमेतल्या राज्यांमधली आहेत. त्यातसुद्धा उत्तरेकडची जास्ती. ह्यचं एक कारण असं असावं की, ह्य शहरांमधून बाहेर प्रवासाला जाणाऱ्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रवास करत ह्य शहरांमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. प्रवाशांच्या सामानातून अंगावरच्या कपडय़ांमधून ढेकूण फुकट प्रवास करतात; पण प्रवाशांची संख्या अलीकडे जास्ती झाली असली, तरी ती काही अचानक वाढलेली नाही. इतकी वर्षे जे झाले, ते मागच्या ७-८ वर्षांपूर्वी कसे झाले नाही?
ह्यचं एक उत्तर आहे- डी.डी.टी.चा शोध आणि उपयोग. असं म्हणतात की अमेरिकेत ‘मे फ्लॉवर’ ह्य बोटीमधून जे पहिले प्रवासी ‘न्यू वल्र्ड्’च्या शोधात अमेरिकेला आले, त्यांच्याबरोबर ढेकूणही आले. अमेरिकेत राहणाऱ्या स्थानिक भाारतीयांना ढेकूण माहीत नव्हते. १९४० आणि १९५० च्या मधे केव्हातरी ढेकणांचा नायनाट करायला डी.डी.टी.चा उपयोग केला जाऊ लगला. हा उपाय रामबाण ठरला. आज वय वर्षे ५०, ५५ असलेल्या बऱ्याच लोकांनी अगदी अलीकडेपर्यंत ढेकूण पाहिलेलाच नाही. डी.डी.टी. माणसांना, पक्ष्यांना आणि त्यांच्या अंडय़ांना अपायकारक असल्याचं लक्षात आल्यावरून अमेरिकेत त्याचा वापर करायला बंदी आली. ही बंदी १९७२ सालापासून आली.
२-३ वर्षांपूर्वी एका मोठय़ा हॉटेलमध्ये ढेकणांचा प्रादुर्भाव झाल्याची बातमी आली आणि बघता बघता ही समस्या काही मोठय़ा शहरांमध्ये डोकेदुखी होऊन बसली. नवीन नवीन कीटकनाशके बाजारात आली. ढेकणांना मारायचे सोपे उपाय सुचविले जाऊ लगले. सेडार ऑइल, केरोसीन ऑइल (रॉकेल), रबिंग अल्कॉहॉल ह्यंचे स्प्रे (हेअर ड्रायरच्या मदतीने फटींमधून आधी ढेकूण वर काढायचे आणि मग त्यांच्यावर स्प्रे मारायचे) वापरात येऊ लागले. पेस्ट-कंट्रोल करणाऱ्या कंपन्यांना फारच चांगले दिवस यायला लागले. कुठेतरी भारतातून आयात केल्या जाणाऱ्या धान्य सामानातून ढेकूण अमेरिकेत आल्याचे आरोप केलेले ऐकले. आरोप खरे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मुंबईत जेव्हा आजच्या इतकी गर्दी नव्हती, तेव्हाच्या मुंबईत माझं लहानपण गेलं. डास, मुंग्या माहीत होते, पण ढेकूण खूप उशिरा बघितलेला आठवतो आहे. मुंबईच्या जवळ असलेल्या एका मोठय़ा शहराची प्रसिद्धी चांगल्या गोष्टींकरता होती, तशी ढेकणांकरताही होती. मुंबईत ढेकूण थोडा काळ आले, पण नंतर गेलेही. डी.डी.टी.चा उपयोग केला गेला की काय ते कळले नाही. ढेकूण मारायचा घरगुती उपाय म्हणून फ्लीट्च्या पंपात रॉकेल घालून वापरायला सांगत, ते आठवतं. मुंबईला बरेच वेळा जाणे होते, डासांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो, पण ढेकणांची काही बातमी कानावर येत नाही.
ढेकणांचा उपद्रव डासांपेक्षा कमी धोक्याचा आहे, एवढे मात्र खरे. डासांमुळे होणारे मलेरिया, डेंग्यू असले रोग काही ढेकूण चावून होत नाहीत. ७७ ए.डी.मध्ये प्लिनी नावाच्या एका रोमन तत्त्ववेत्त्याने असं लिहिलं आहे की, ढेकूण सर्पदंश आणि कानाचं इन्फेक्शन, हिस्टेरिआ अशा दुखण्यांवर गुणकारी आहेत. आपल्याला अजूनपर्यंत तरी त्यांचा उपद्रवच माहीत आहे. इंग्रजी भाषेत ह्यला बेडबग म्हणतात. हे रक्तपिपासू कीटक माणसांच्या अंगातली उष्णता आणि उछ्वासावाटे सोडलेला कार्बन डायॉक्साइड ह्यंच्यामुळे आपलं सावज बरोबर शोधतात. त्यांची रक्तपिपासू वृत्ती जास्ती करून रात्री उफाळून येते. दिवसा पलंगांच्या खाली असलेल्या लाकडी फ्रेमच्या बारीक फटींमध्ये ते लपून बसतात. माणसांचं रक्त (थोडंफार कुत्रे आणि मांजरांचंही) रक्त हा त्यांचा एकमेव आहार. तीन-चार महिने ढेकूण काही न खाता (पिता) जगू शकतात. त्यांचं आयुष्यमान जरी फार नसलं तरी त्यांची प्रजा खूप झपाटय़ाने वाढते.
अमेरिकेत ढेकणांना नेस्तनाबूत करण्याचा बराच प्रयत्न चाललेला दिसतो. सार्वजनिक इमारतींमध्ये ढेकूण हुंगणारे कुत्रे बोलावले जातात, कधी कधी टेंटिंग करून कीटकनाशक धूर किंवा गॅसचा वापर केला जातो. सामान्य घर मालकांना किंवा भाडेकरूंना घर-विशेषत: बेडरूम्स आणि बेड्स स्वच्छ ठेवणं, शक्यतो दर दोन महिन्यांनी पेस्ट कंट्रोल करून घेणं, निदान महिन्यातून दोन वेळा सगळं बेडिंग धुणं, गादी खालीवर करणं आणि ढेकूण झाल्याची शंका जरी आली, तरी फार्मसीमध्ये मिळणारी कीटकनाशके (ही प्रत्येक कीटकाकरता वेगवेगळी असतात) वापरणे असे उपाय सुचविले जातात.
इंटरनेटच्या जमान्यात चपखल बसेल अशी बेडबग्सची रजिस्ट्रीही तयार झाली आहे. काही खर्च न करता तुम्हाला एखाद्या जागेत ढेकूण आहेत किंवा काय ते रजिस्ट्रीत बघता येते. तुम्हाला ढेकूण असलेल्या एखाद्या जागेचा रिपोर्ट पैसे न खर्च करता रजिस्ट्रीत लिहिताही येतो. नवीन जागा रेंट करताना ही माहिती खूपच उपयोगी पडते. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात ना, त्याचा प्रत्यय काही भाडेकरूंना आल्याचे ऐकले. घर मालकाच्या शब्दावर विश्वास ठेवून ढेकूण असलेली जागा घेऊन राहायला गेल्यावर जागेत ढेकूण असल्याचे भाडेकरूच्या लक्षात आले. घर मालकाकडे तक्रार केल्यावर मालकाने भाडेकरूवरच उलट आरोप केला की ‘ढेकूण तुमच्या सामानातून आले आहेत, तेव्हा आधी स्वत:च्या खर्चाने पेस्ट कंट्रोल करून घ्या.’ सिनेमाची थिएटर्स ही बहुतेक वेळा मॉलच्या मालकीची असतात. काही थिएटर्समधला खुच्र्या जुन्या असल्या, तर तिथे ढेकूण असण्याची शक्यता नाकारता नाही येत. थिएटरमधून आलात, की कपडे बदलून टाका. बदललेले कपडे धुऊन ड्रायरमध्ये उच्च तापमानावर सुकवून मगच वापरा, अशा तऱ्हेचे (फुकटचे, पण योग्य) सल्ले बऱ्याच वेळा मिळतात.
अमेरिकेतली ग्रंथालये ह्य सगळ्या सार्वजनिक असतात. आठवडय़ाचे सातही दिवस उघडय़ा असतात. कोणीही यावं, बसावं, वाचावं, कम्प्युटरवर काम करावं, पुस्तकं चाळावीत, घरी वाचायला न्यावीत, सगळ्यांचंच तिथे स्वागत असतं. आणि प्रॉब्लेमही तिथेच येऊ शकतो. वेगवेगळ्या घरांतून पुस्तकांच्या नेण्या-आणण्यातून, घरून पुस्तकं घालून आणलेल्या पिशव्यांमधून, येणाऱ्यांच्या कपडय़ांमधून ढेकूण लायब्ररीत प्रवेश करतात. कम्प्युटर लॅबमध्ये जर खुच्र्या कापडाच्या असल्या, तर ढेकणांना वाढायला वातावरण चांगलंच पोषक होतं. फ्लॉरिडामधल्या नुकतीच ढेकणांची लागण झालेल्या लायब्ररीमध्ये कम्प्युटर लॅबमध्ये बसणाऱ्या वाचकांनी ढेकूण चावत असल्याची तक्रार केली आणि तिथे ढेकणांचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात आले आहे. पेस्ट कंट्रोल करणाऱ्या कंपनीने सगळी लायब्ररी बंद केली. सगळी इमारत झाकून कीटकनाशकाचे फवारे मारले व ५-६ दिवसांनी लायब्ररी लोकांना उघडली गेली. तेव्हा कम्प्युटर विभागातल्या कापडी सीट्स असलेल्या सगळ्या खुच्र्याची जागा सिंथेटिक सीट कव्हरं असलेल्या खुच्र्यानी घेतलेली असेल.
शशिकला लेले – naupada@yahoo.com