‘अरे, पण तुझा नाव हा असा काय, मोर्तु? या नावाचा मतलब काय? अरे मी जन्माला आल्यानंतर माझे वडील वारले. मी जन्मल्यावर महिनाभर खूप आजारी असायचो. या सगळ्यामुळे आई जरी प्रत्यक्षात माझं सगळं करत होती, तरी कधीकधी वैतागून, तू जन्माला आलास आणि माझं सगळं नुकसान केलंस असं म्हणते. तिची ‘मर तू’ ही भावना रागाच्या भरात तोंडून व्यक्त व्हायची. तिला कोणीतरी सुचवलं की, याचं नावच ‘मोर्तू’ असं ठेव, म्हणजे मग याच्या मागची पीडा जाईल आणि मग माझं हे नाव पडलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आज सकाळपासून नेहमीप्रमाणेच नोकरीच्या शोधात वणवण फिरून मोर्तूचे पाय दुखायला लागले होते. उन्हं माथ्यावर आली होती. पोटात अन्नाचा कण नाही. आज नोकरीसाठी मुलाखतीला गेलेल्या ठिकाणानंतर मुलाखतींची शंभरी ओलांडली गेली. बीकॉम असूनही कुठेच नोकरी मिळत नव्हती. प्रत्येक ठिकाणी ‘आधीच्या नोकरीत काय झालं?’ हाच छळणारा प्रश्न. काहीही झालं तरी खोटं बोलून नोकरी मिळवणार नाही, हे मोर्तूचं तत्त्वं आणि मग खरं बोलल्याची सजा म्हणून मिळणारी नोकरी गमावणं, या साऱ्याचा वीट आला होता. खचलेल्या मनाची पराभूत अवस्था, त्यात तळतळणारं माथ्यावरचं ऊन आणि पोटात भुकेने आतडय़ाला बसणारा पीळ. अशा अवस्थेत घरी परतण्यासाठी पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन पकडण्यासाठी कसाबसा जिना चढून आला मात्र, आता घरी जाऊनही बायकोची बोलणी ऐकायची या विचाराने तिचं ते फडाफडा बोलणं, नेहमीची काळीज चिरणारी अपमानास्पद वाक्यं मोर्तूच्या कानात घुमायला लागली आणि त्याला चक्कर यायला लागली. दुपारची वेळ असल्यामुळे रेल्वे ब्रीजवर तशी वर्दळ नव्हती. ब्रीजवरच्या लोखंडी पट्टय़ांच्या कठडय़ाला धरून तो हेलकावे खात ब्रीजवरच खाली बसला. खांद्यावरची बॅग जमिनीवर टाकून तिच्यावर डोकं ठेवून तिथेच आडवा झाला. सकाळपासून पायी फिरताना रस्त्यावरून धूळ उडवत जाणाऱ्या गाडय़ांमुळे अंगावरचे कपडे मळले होते. इन केलेला शर्ट चुरगळून अर्धवट बाहेर आला होता. पडताना पायातल्या चपला बाजूला अस्ताव्यस्त पडल्या होत्या. समोरून दोघंजणं येत होते. त्यांनी हे दृश्य पाहिलं. त्यातला एकजण दुसऱ्याला म्हणाला, ‘अरे वो देख, लगता है कोई चक्कर आके गीर रहा है। ’ त्याच्यावर दुसऱ्याने त्याला सांगितलं, ‘छोड यार, बेवडा दिखता है। दारू पी के आया होगा। ’असं म्हणून ते निघून गेले. तोपर्यंत मोर्तू शुद्ध हरपून ब्रीजवर पडला होता. येणारे-जाणारे त्याच्याकडे बघत होते. कोणी हळहळ व्यक्त करत होते, तर कोणी न बघताच निघून जात होते, तर कोणी मघाच्या त्या दोघांप्रमाणे त्याला दोष देत होते. काहीजण मात्र, दया येऊन त्याच्याजवळ पसे टाकत होते. होता होता, तीनचार तास गेलेत. त्या ब्रीजवर संध्याकाळच्या वेळी मोती चहावाला आपला चहाचा ठेला मांडायचा. संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाताना थकलेभागलेले लोक चहा घेऊन जात. त्यामुळे संध्याकाळी त्याचा धंदा चांगला चालायचा. रोजच्याप्रमाणे आजही चहाचा ठेला मांडण्यासाठी मोती त्याचं साहित्य घेऊन ब्रीजवर आला. त्याने पडलेल्या मोर्तूला पाहिलं. आपल्याजवळचं थोडं पाणी त्याने ओंजळीत घेतलं आणि मोर्तूच्या तोंडावर दोनतीन वेळा िशतोडे मारले. मोर्तू हळूहळू शुद्धीवर आला. पण पोटातल्या भुकेने त्याला अजूनही ग्लानी येत होती. तोंडून शब्द फुटत नव्हता. मोतीने विचारलं, ‘भूक लगी है क्या?’ मोर्तूने क्षीणपणे होकारार्थी मान हलवली. मोती लगेच ब्रीजवरून खाली गेला आणि खालच्या वडापावच्या गाडीवरून एक वडापाव घेऊन आला आणि मोर्तुला दिला.‘ ये ले भाई, इससे ज्यादा कुछ नहीं दे सकता। गरीबों का भोजन है ये। खा ले।’ वडापाव खाल्ल्यावर मोर्तूला थोडं बरं वाटलं. तोपर्यंत मोतीने आपला चहाचा ठेला लावून गरमगरम चहा केला आणि मोर्तुला दिला. चहा घेतल्यावर त्याला थोडी हुशारी आली. तो मोतीला म्हणाला, ‘तुमने मुझे खाना और चाय पिलाया कितना पसा हुआ? अभी तो मेरे पास पसे नहीं है, लेकिन एक-दो दिन में दे दुंगा। मोती म्हणाला रहने दो। किसी जरूरतमंद के लिए इन्सानियत के नाते कुछ किया तो उसके पसे क्या लेने के? लेकिन किसी का फुकट कुछ लेने को अच्छा नहीं लगता,’ मोर्तूने त्याला सांगितलं. मग मोतीने त्याला पन्नासची एक नोट देतादेता विचारलं, ‘कौन हो भाई, यहा कैसे आए? मेरा नाम मोर्तू मोरे है।’ मोती म्हणाला, ‘म्हणजे मराठी हाय का? मला पण थोडा थोडा मराठी येतो.’ मोर्तू म्हणाला, ‘हे कसले पसे देतोयस?’ मोतीने विचारलं, ‘तुला मला पसा द्यायचा होता ना? मला मिळाला. माझे वडापाव आणि चहाचे सोळा रुपये काढून घेतले, आणि ही तुझी कमाई तुला दिली.’ मोर्तूला काहीच कळेना.‘ माझी कमाई?’ मोती म्हणाला हो, ‘तू झोपला होता ना, तेव्हा काही लोकानला दया येऊन त्यांनी एक-दोन रुपयांचे सुटे पसे, पाचची नाणी, एक दोघांनी दहाच्या नोट तुझ्या बाजूला टाकल्या होत्या. टोटल बघ छियासठ रुपये, म्हणजे सिक्स्टी सिक्स रुपये होते. त्यातले माझे सोळा मी काढून घेतले आणि तुझे हे पचास रुपये तुला दिले.’ मोर्तू म्हणाला, ‘म्हणजे भीक? मला नको.’ मोती हसला. म्हणाला ‘म्हणजे तू तद्दन शिकलेला माणस दिसतो, आत्मसम्मान वगरे.. ’मोतीने शेरा मारला. मोर्तू सांगायला लागला, ‘अरे बाबा, मी बीकॉम होऊन एका कंपनीत ज्युनिअर अकाऊटण्ट म्हणून नोकरीला लागलो. तिथे माझा बॉस वाढवलेल्या रकमेची डुप्लिकेट खोटी बिलं तयार करायचा आणि ती कस्टमरला द्यायचा. त्याच्याकडून जास्त पसे घ्यायचा आणि मालकाला कमी रकमेची बिलं दाखवून वरचे पसे काढून घ्यायचा. या कामात त्याला माझी मदत हवी होती. मी करणार नाही असं सांगितलं. तसंच मालकाला ही गोष्ट सांगेन म्हणून सांगितलं. तेव्हा त्याने दुसऱ्या दिवशी मी जेवायला गेलो असताना गल्ल्यातली एक हजार रुपयाची रक्कम माझ्या बॅगेत घातली आणि मालकाला रक्कम मिळत नसल्याचं सांगून सर्वाच्या बॅगा तपासायला सांगितल्या. त्यात माझ्या बॅगेत एक हजार रुपये मिळाले, तेव्हा त्याने मालकाला पोलीस कम्प्लेंट करायला सांगितलं. मालक चांगला होता. त्याने एक हजार रुपयेच असल्यामुळे आणि तेही मिळाल्यामुळे तक्रार करणार नाही, असं सांगितलं. पण मला कामावरून काढून टाकलं. मी त्याला बॉसचा कट सांगायचा खूप प्रयत्न केला. पण काहीही ऐकून न घेता त्याने मला कामावरून काढून टाकलं. आता मी नोकरीसाठी शंभर ठिकाणी फिरलो. पण प्रत्येक ठिकाणी आधीची नोकरी का सोडली हे विचारल्यावर, मी खरं काय ते सांगितल्यावर कोणी मला नोकरी देत नाही. ‘अरे, मग तू सांगतो कशाला? पागल हाय का?’ मोतीने न राहवून विचारलं. मला खोटं बोलून नोकरी मिळवायची नाहीये.
‘मोर्तू. तुला खोटं बोलून नोकरी मिळवायची नाय, भीक पण मागायची नाय, मग तू जिंदगी जिणार तरी कसा? मग तू एक काम कर, तुला भीक नाय मागायची ना? मग तू सकाळी येऊन इकडे या ब्रीजवर बॅग डोक्याखाली घेऊन नुसता झोपून राहा. तू काय भीक मागणार नायस. जेला वाटेल तो देल पसा. तू काय हात पसरून किंवा शर्टात हात लपवून हात तुटल्याचा अॅिक्टग करून खोटा पसा मिळवणार नाय आणि ती भीकपण नाय. पण तरीही काहीही न करता असं नुसतं पडून राहून लोकांच्या सहानुभूतीवर तर पसे मिळवणारच ना? मग हाही एकप्रकारे फसवणुकीचाच पसा असणार,’ मोर्तूने सांगितलं.
‘अरे, पण तुझा नाव हा असा काय, मोर्तु? या नावाचा मतलब काय? अरे मी जन्माला आल्यानंतर माझे वडील वारले. मी जन्मल्यावर महिनाभर खूप आजारी असायचो. या सगळ्यामुळे आई जरी प्रत्यक्षात माझं सगळं करत होती, तरी कधीकधी वैतागून, तू जन्माला आलास आणि माझं सगळं नुकसान केलंस असं म्हणते. तिची ‘मर तू’ ही भावना रागाच्या भरात तोंडून व्यक्त व्हायची. तिला कोणीतरी सुचवलं की, याचं नावच ‘मोर्तू’ असं ठेव, म्हणजे मग याच्या मागची पीडा जाईल आणि मग माझं हे नाव पडलं.
मोती म्हणाला, ‘खूपच इंटरेिस्टग हाय तुझी जिंदगी. मग आता घरी कोणकोण असतो?’
‘मला माझ्या आईने मोलमजुरी करून शिकवला, बीकॉम केला आणि आई एका घरी कामाला जायची त्यांच्याच ओळखीतून मग ही नोकरी मिळाली होती. मग गरीबाघरची मुलगी बघून माझं लग्नही लावून दिलं. त्यामुळे ही नोकरी गेल्यावर माझ्या आईचं ते कामही गेलं. मला आईकडून पुन्हा खूप ऐकून घ्यावं लागलं. माझ्यामुळे तिचं नेहमीच आयुष्यात कसं नुकसान झालंय, मी कसा जगायला नालायक आहे, वगरे खूप ऐकवलं मला तिने. पण सचोटीने वागायचे, खरं बोलायचे संस्कार तिनेच तर माझ्यावर केलेयत. आता या माझ्या गुणांमुळे जेव्हा तिला त्रास होतोय, तेव्हा मग ती माझ्यावर का वैतागते ते मला कळतंच नाही. बायकोही बोलत राहते की, माझ्यासारख्या काही न करणाऱ्या माणसाबरोबर लग्न लावून तिला फसवलं. सगळ्यांना माझ्यापासून फायदे हवे आहेत. पण माझ्यामुळे काही त्रास होता कामा नये. हे वाल्याकोळ्यासारखंच आहे. पापात आणि दु:खात कोणाला वाटा नको. फक्त फायदे हवेत. मग आई असो वा बायको सगळी नाती माणसापासून काय फायदे मिळतात यावरच अवलंबून असतात. फार वाईट वाटतं रे. अरे बाबा सौ टक्का सचोटीवाला व्येव्हार असा या जगात काही नसतो बघ, ’मोतीने सांगितलं.
‘सोन्याचा पानी मारलेला दागिना कसा असतो, तसलीच जिंदगी असते बघ, खऱ्याचं, सज्जनपनाचं, सचोटीचं पानी मारलेली. आमी तर चल, लोअर क्लास लोग हाय. म्हणजे आमी खोटाच असनार हे ठरवलेलाच असतो. पर, हे जे समदा मिडल क्लास सज्जन म्हनवनारा लोग हाय ना, ते कधी कोनाच्या भानगडमधी पडनार नाय, कधी तुझ्यासारखा एखादा अडचणीत असला, तर तेला मदत करनार नाय, आपल्यामागे पोलीस, कोर्टचा चक्कर लागेल याची त्यानला कायम भीती असते. आपला नाव खराब नाय जाला पायजे. मग एखादा मानूस मदतीशिवाय मेला तरी चालेल, मग अगदी तेंच्या रिश्त्यामध्ये असला, तरी ते मदतीला जात नायत. म्हणूनच आता तू पडला होता, तरी तुला उठवायला कोन आला नाय. हे लोग मदत तर करतेच नाय पन वर आनखी अडचणमध्ये असलेल्या मानसालाच दोष देत राहते, तेच्यामधेच कायतरी फॉल्ट असनार म्हनून त्यालाच कोसते. हेच बघ ना काही काही लोग तुलाच बेवडा हाय म्हनालेत. बाबा, तू एक लक्षात घे. या दुनियेत राहायचा असेल ना, तर या लोकानसारखाच तुला वरून सज्जन, खरा पन आतून मात्र, पक्का डांबरट आनी सोताचा विचार करनारा असा बनून राव्हा लागेल. मग तेचासाठी खोटय़ाचा व्येव्हार केला तरी चालेल, फकस्त तुझा खोटेपणा पकडला नाय जायला पाहिजे, याची काळजी घेयची. आता तू हेच बघ, उद्या तू जर एखादा बिजनेस केला आनी तेतून पसा आणि सम्मान मिळाला की, तुझी आई, तुझी बायको तेंना तू हवाहवासा असनार. पन बिजिनेस म्हटला की, चोरी, लबाडी आलीच. फकस्त ती कोनाला कळली नाय पाहिजे आनी तू पकडला नाय जायला पाहिजे. मग तुला मोठमोठय़ा लोकांमधी पन मान मिलनार. तुला चीफ गेस्ट म्हनून बोलवून तुजा सत्कार पन करनार. अंदर बात तू और भगवान जाने. मी तुला तुझा बिजनेस सुरू करायला मदत करतो. तुला सहाशे रुपये देतो. तू थोडेथोडे करून तीन महिन्यात मला परत कर,’ मोतीने सुचवलं.
‘कसला बिझनेस,’ मोर्तूने विचारलं.
‘मोती म्हणाला, ‘उद्यापासून तू माझ्याबाजूला खारे सिंग भाजून द्यायचा ठेला लाव. एक स्टोव्ह, रॉकेल, सिंग आणि थोडी वाळू इतक्या गोष्टी घेऊन ये. ’मोर्तूने हा सल्ला ऐकला. दुसऱ्या दिवशीपासून तो आपण पदवीधर आहोत, ही गोष्ट विसरून आणि सगळी लाज बाजूला ठेवून खारे शेंगदाणे विकायला ब्रीजवर उभा राहायला लागला. तिथे उभं राहण्याबद्दलचे वेगवेगळ्या लोकांना द्यायचे हप्ते, कच्चा माल, रॉकेल याचा सगळ्याचा खर्च वजा घालून त्याचा घरखर्च भागत नव्हता. या संध्याकाळच्या व्यवसायाला काहीतरी जोड देणं आवश्यक होतं. मग त्याला मोतीने आणखी एक उपाय सुचवला. ‘उद्या तू एक काम कर सकाळी लवकर ये आठच्या सुमाराला या ब्रीजवर, आनी इकडे बस. इथे सगळे लेबर लोक जमतात. तेंना बांधकामच्या साइटवर घेऊन जातो, लेबर कंत्राटदार. तेच्यामध्ये तुला पन काम मिळेल,’ मोतीने सुचवलं.
मोर्तूने त्याचं ऐकलं. दुसऱ्या दिवशी तो सकाळीच रेल्वे ब्रीजवर येऊन बसला. घमेली उचलायचं हेल्परचं काम त्याला मिळालं. आपण पदवीधर आहोत, हे विसरून त्याने ते काम स्वीकारलं. हळूहळू त्याने विटांचं बांधकाम, ओटा घालणं, लाद्या बसवणं अशी कामं शिकून घेतलीत. या ब्रीजवर तो रोजच यायला लागला. आता तो हेल्परचा कडिया झाला होता. आता साइटवर उशीर झाला, तर संध्याकाळी शेंगदाणे विकणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे त्याने शेंगदाण्याचा व्यवसाय बंद केला. त्याला आता बांधकाम साहित्य कुठे मिळतं, ते कितीला मिळतं याचीही माहिती होती. लेबर कंत्राटदारकडे काम केल्यामुळे लेबरचे भाव, ते कसे हाताळायचे, हेही त्याला कळलं. मग हळूहळू या व्यवसायातल्या खाचाखोचाही कळायला लागल्या. मग तो स्वतंत्रपणे इंटिरिअर काँट्रक्टर म्हणून काम करायला लागला. कामगारांना पसे दिलेत, तर पसे घेऊन ते गावाला निघून जातील अशी भीती असते आणि कामावर येतच नाहीत. पसे नाही दिलेत, तर दुसऱ्यादिवशी दुसऱ्या कंत्राटदारबरोबर दुसऱ्याच साइटवर निघून जातात. त्यामुळे केलेल्या कामाचे अध्रेच पसे देऊन अध्रे शिल्लक ठेवले की, कामगार कसे दुसऱ्या दिवशीही कामाला येतील, तुम्ही पसे दिले नाहीत तर कामगार निघून जातील आणि काम बंद पडेल याचा इशारा देऊन क्लायंटकडून आधीच कसे पसे घेऊन ठेवायचे म्हणजे काम बंद पडायला नको आणि त्याच वेळी स्वत:च्या खऱ्या जमाखर्चाचा हिशोब कसा ठेवायचा याचं तिहेरी गणित मोर्तूच्या लक्षात आलं. त्याने कंत्राटदार झाल्यावर आपलं नावही बदललं, अजित मोरे हे नाव घेतलं. आता तो रेल्वे ब्रीजवर यायचा; पण इतर कामगारांना काम देण्यासाठी. हळूहळू त्याने जमलेल्या पशातून गावाकडे एक जमिनीचा तुकडा घेतला. त्यावर प्लॉट पाडून बांधकाम करायचं ठरवलं. पण मुंबई पुण्यासारख्या शहरातले लोक येऊन ही घरं विकत घेतील, तर पसे मिळणार होते. गावाकडचे लोक काही एवढे पसे देऊन त्याची घरं विकत घेणार नव्हतेत. त्यामुळे गावच्या एका नेत्याकडे त्याने बांधकामासाठी आणि जाहिरातीसाठी पसे मागितले. त्याने निवडणुकीसाठी अजित पसे देईल याचं आश्वासन घेऊन त्याला पसे देऊ केलेत. त्यातून मग घरं विकली गेलीत. अजितने कबूल केल्याप्रमाणे नफ्याचा काही भाग त्या नेत्याला आणि त्याच्या पक्षाला देऊ केला. त्यातून त्याला पक्ष सदस्य करण्यात आलं. मग वाढलेल्या राजकीय ओळखींमधून भूखंड मिळू लागले. त्यावर मग बांधकामं व्हायला लागलीत. अनेक सोशल कल्चरल इव्हेंट्समध्येही अजितच्या ए.एम. ग्रुप या कंपनीचं नाव वर्तमानपत्रांमधून आणि चॅनलवरून प्रायोजक म्हणून झळकायला लागलं. आता अजितही समाजात मान्यवर म्हणून ओळखला जाऊ लागला. अजितची आई आणि बायकोही आता खूश होते. अजितची शाळा, त्याचं कॉलेज यांमधून त्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं गेलं. त्याचा सत्कार केला गेला आणि त्याच्याकडे नव्या इमारतीसाठी देणगीचीही मागणी झाली. त्यावेळी त्याला मोतीच्या वाक्यांची आठवण झाली.
तसा तो फोनवरून मोतीच्या संपर्कात असायचा. पण प्रत्यक्ष भेट व्हायची नाही. मग वेळात वेळ काढून अजितने त्या रेल्वे ब्रीजवर जायचं ठरवलं. तिथे गेल्यावर त्याला मोती भेटला. मोती आता थोडा वयस्क दिसायला लागला होता. आता त्याचा मुलगाही चहाच्या धंद्यात आला होता. मोती स्वत: चहा करत नव्हता, नोकर ठेवले होते. मोतीचीही आता शहराच्या त्या भागात चहाची तीन दुकानं झाली होतीत. पण मोती स्वत: मात्र ब्रीजवरच्या ठेल्यावरच हजर असायचा. अजित भेटल्यावर खूप गप्पा झाल्या. अजितने मोतीला गळ घातली की, ‘माझ्याबरोबर चल. माझ्या व्यवसायात मला मदत कर. तुला पार्टनर करून घेतो.’ पण मोतीने ठाम नकार दिला. तो म्हणाला, ‘हा रेल्वे ब्रीज सोडून मी कुठेच जाणार नाही. मी इथेच राहिलो, तर तुझ्यासारख्या अजूनही काही मोर्तूना मदत करीन आणि त्याचंही आयुष्य घडलेलं पाहीन. पण तूसुद्धा अशीच कोणाला तरी मदत कर.
अजित म्हणाला, ‘खरंय, मोती. या रेल्वे ब्रीजने सगळ्यांना नकोसा असलेल्या मोर्तूला आधार दिला आणि त्या नकारात्मक मोर्तूचं सकारात्मक अजितमध्ये परिवर्तन केलं. नातीबिती सगळं झूट असतं. तुमचा उपयोग कोणाला किती होतो यावरच सगळी नाती आधारलेली असतात, अगदी रक्ताचीही नाती. बाकी सगळा दिखाऊपणा असतो. पसा आणि प्रसिद्धी आली की, तुम्ही ज्यांना नको होतात आणि जे तुम्हाला टाळत होतेत, तेच लोकं गुळाला डोंगळे चिकटावेत, तसे तुमच्या अवतीभवती फिरायला लागतात. त्याच्या लग्नाकार्यात त्यांच्या फोटोआल्बममध्ये आणि व्हिडिओमध्ये तुम्ही दिसावेत आणि हा सेलिब्रिटी आमच्या कार्याला आला होता असं लोकांना सांगून मोठेपणा मिळवता यावा यासाठी धडपडतात. त्यामुळे मला मिळणारा मान हा खरोखर मला नसून माझ्या पसा आणि प्रसिद्धीला आहे, हे माझ्या सतत लक्षात असतं. पण अर्थातच बाकीच्या खोटेपणाप्रमाणेच हेही आपल्याला कळतंय हे दाखवायचं नाही. जाऊ दे. कोळसा उगाळावा तेवढा काळाच! पण तुझा हा सल्लाही मी नेहमी आचरणात आणेन आणि खरोखर गरजू असलेल्यांना त्यांच्या आयुष्यात मदत करेन, असं वचन अजितने मोतीला दिलं. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. चक्कर येऊन पडलेल्या रेल्वे ब्रीजवरच्या त्या आपल्या जुन्या जागेवर काही काळ उभं राहून गहिवरल्या डोळ्यांनी तो रेल्वे ब्रीज डोळ्यात साठवून अजित मग परत आपल्या घरी जायला निघाला..
anaokarm@yahoo.co.in