मागील लेखात आपण बैठक व्यवस्थेची आखणी कशा प्रकारे करावी याबद्दल माहिती घेतली. आजच्या लेखात आपण सीटिंग अर्थात बैठक व्यवस्थेचे प्रकार याबद्दल माहिती घेणार आहोत. घराची सजावट करताना लिव्हिंग रूम डिझाइनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बैठक व्यवस्था केली जाते. बैठक व्यवस्थेशिवाय लिव्हिंग रूम पूर्ण होऊ शकत नाही. लिव्हिंग रूमच्या इतर कोणत्याही फर्निचरपेक्षा बैठक व्यवस्था सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. कारण लिव्हिंग रूममध्ये बसणे हाच सर्वात महत्त्वाचा भाग असतो. यामध्ये  फॉर्मल सीटिंग, सेमी फॉर्मल सीटिंग, इनफॉर्मल सीटिंग, कॅज्युअल सीटिंग, युटिलिटी सीटिंग व थीम बेस्ड सीटिंगअसे काही प्रकार आहेत. फॉर्मल सीटिंग म्हणजेच सर्वत्र दिसणारा सोफा. पूर्णपणे अपहोलस्ट्रीने झाकलेला हा सोफा पाश्चिमात्य पद्धतीने तयार केला आहे. हा सोफा बनवताना सर्वप्रथम लाकडाची चौकट म्हणजेच सोफ्याचा सांगाडा बनवला जातो. त्यावर गरजेनुसार विशिष्ट जाडीचा फोम चढवला जातो व सगळ्यात शेवटी अपहोलस्ट्रीने सजवण्याचे काम केले जाते. अपहोलस्ट्रीमध्ये लेदर, रेग्झिन व कापड मुख्यत्वे वापरले जाते. या प्रत्येक प्रकारात खूप प्रकार उपलब्ध आहेत. आधी हा सोफा शोरूममध्ये तयार स्वरूपात मिळायचा, पण गेल्या काही वर्षांपासून आपल्या गरजेनुसार सोफा बनवून मिळतो. घरी सोफा बनवून घेण्याचा फायदा असा की, वापरल्या जाणाऱ्या मटेरियलच्या दर्जाची खात्री देता येते. कारखान्यातून बनवून आणलेला सोपा बादर्शनी दिसायला जरी सुंदर दिसत असला तरीही आत सुमार दर्जाचे मटेरियल वापरले जाण्याची शक्यता असते. या कारणास्तव खात्रीच्या शोरूममधूनच सोफा खरेदी करावा. काही शोरूम्स विशिष्ट कालावधीची हमीही देतात. या कालावधीत सोफ्यास काही झाल्यास तो विनामूल्य दुरुस्त करून दिला जातो. अर्थात सोफा खराब होण्यात ग्राहकाची चूक नसावी. शोरूममधून सोफा घेण्याचा आणखी एक फायदा म्हणजे घरी सोफा बनवण्याच्या काळात होणाऱ्या त्रासामुळे सुटका होते.

फॉर्मल सोफा पूर्णपणे अपहोलस्टर्ड असल्याने थोडा बोजड भासण्याची शक्यता असते. म्हणूनच सोफ्याचे डिझाइन काळजीपूर्वक निवडावे. लहान आकाराच्या लिव्हिंग रूममध्ये फॉर्मल सोफा वापरणे कटाक्षाने टाळावे, अन्यथा आधीच लहान असलेली लिव्हिंग रूम आणखीनच लहान वाटायला लागेल. फॉर्मल सीटिंग या प्रकारात अनेक डिझाइन्स उपलब्ध आहेत. सुताराकडे असलेल्या डिझाइन्स कॅटलॉगमधून आपण आपल्या इंटिरिअरला शोभेल असे डिझाइन निवडावे.

poor sleep make your brain age faster
कमी झोपेमुळे मेंदू वेळेआधी वृद्ध होतो? नवीन अभ्यास काय सांगतो?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
zee marathi laxmi niwas new promo
‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत झळकणार ‘ही’ जोडी! ‘त्या’ दोघांना तुम्ही ओळखलंत का? नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
beneficiary consumers ignoring to purchase home from affordable housing scheme
विश्लेषण : परवडणाऱ्या घरांचे गणित का बिघडले? लाभार्थी ग्राहक योजनांकडे पाठ का फिरवत आहेत?
easy kandil making at home for diwali how to make akashkandil at home easy steps video diwali lantern
Kandil making at home: स्वस्तात मस्त! घरच्या घरी बनवा आकर्षक कंदील, या दिवाळीत वापरा ‘ही’ सोपी पद्धत आणि वाचवा पैसे
aishwarya narkar bought new home
Video : ऐश्वर्या नारकरांनी घेतलं नवीन घर! पहिल्यांदाच दाखवली झलक, दिवाळीच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी
Standing Desks Is Good For Health Or Not
Standing Desks Not Good For Health : तुम्हीसुद्धा उभं राहून काम करता का? मग थांबा! तुम्हालाही होऊ शकतात या आरोग्य समस्या
Pune growing urbanization, PMPL, Pune metro,
सावध ऐका पुढल्या हाका…

सेमी फॉर्मल सीटिंग-

सेमी फॉर्मल सीटिंग हे फॉर्मल बैठकीपेक्षा थोडे वेगळे असते. या प्रकारात फॉर्मल सोफ्यासारखे पूर्णपणे अपहोलस्ट्रीने झाकले जात नाही. यात सोफ्याची लाकडी फ्रेम मुद्दाम दाखवली जाते. ती सुंदर दिसण्यासाठी खास पॉलीश करून घेतली जाते. आर्मरेस्ट म्हणजेच सोफ्यावर बसल्यावर हात ठेवण्याच्या जागेवरही अपहोलस्ट्री लावली जात नाही. तसेच सोफ्याचे लाकडी पायही दाखवले जातात. त्यामुळे सीटच्या खाली मोकळी जागा राहते. यामुळेच हा सोफा बोजड वाटत नाही. लहान आकाराच्या लिव्हिंग रूममध्ये या प्रकारचे सेमी फॉर्मल सीटिंग वापरल्याने रूम फार भरल्यासारखी वाटत नाही. सुटसुटीत वाटते. या सोफ्याची फ्रेम दिसत असल्याने ती मजबूत व शोभिवंत लाकडापासून बनवली जाते. यात केवळ बसण्यासाठी असलेल्या सीटसाठी व पाठ टेकवण्यासाठी असलेल्या बॅकरेस्टसाठी कुशन्स बनवली जातात. या प्रकारात कुशन्ससाठी झिप  असलेली वेगळी कव्हर्सही शिवता येतात. त्यामुळे आपण हवे तेव्हा सोफ्याचा लुक बदलू शकतो. या प्रकारच्या सोफा सेट्समध्ये खूप प्रकारची डिझाइन्स उपलब्ध आहेत. लाकडाच्या चौकटीचे सोफा सेट्स वीस वर्षांपूर्वी खूप प्रमाणात वापरले जात. हाच ट्रेंड हल्ली परत आला असून खूप लोकप्रिय होत आहे. सगळ्या शोरूममध्ये व ऑनलाइनही या प्रकारचे सोफा सेट्स मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. पूर्णपणे फॉर्मल नसलेले असे हे सेमी फॉर्मल बैठकीचे सोफे लोकप्रिय आहेत.

इनफॉर्मल सीटिंग-

अजिबात फॉर्मल नसलेली सीटिंगअशी या इनफॉर्मल सीटिंगची व्याख्या करता येईल. वेगवेगळ्या आकाराचे, डिझाइनचे, रंगाचे सीटिंग जे आपल्याला कॅफे, लाऊंज अशा ठिकाणी पाहावयास मिळते, ते सीटिंगही या इनफॉर्मल प्रकारात मोडते. यात तऱ्हेतऱ्हेची मटेरियल्स वापरली जातात. जसे की मेटल, स्टोन, रॉट आयर्न, केन (बांबू). या मटेरियल्सपैकी रॉट आयर्न व केनने बनवलेल्या सीटिंगचा वापर होम इंटिरियरमध्ये जास्त होतो.

कॅज्युअल सीटिंग –

कमी सिल हाइट असलेल्या खिडक्यांखाली जे ग्रॅनाइटचे सीटिंग बनवले जाते ते या कॅज्युअल सीटिंग प्रकारात मोडते. सिल हाइट म्हणजे खिडकी व जमीन यातील अंतर, खुच्र्याचे सीटिंगही कॅज्युअल सीटिंग म्हणता येईल. गाद्या रचून बनवलेली बैठकही याच प्रकारातील मानली जाते.

युटिलिटी सीटिंग –

युटिलिटी सीटिंग म्हणजे असे सीटिंग ज्या सीटिंगचा वापर केवळ बसण्यासाठी न होता इतरही एखाद्या अ‍ॅक्टिव्हिटीसाठी करता येतो. जसे की, सोफा कम बेड, पूल आऊट दिवाण, बॉक्स टाइप दिवाण किंवा सेटी. सोफा कम बेड व पूल आऊट दिवाण यांचा वापर वेळप्रसंगी झोपण्यासाठी करता येतो व बॉक्स टाईप व सेटी स्टोरेजसाठीही वापरता येतात. असे हे युटिलिटी सीटिंग आजकालच्या मॅचबॉक्स अपार्टमेंटसाठी खूपच उपयुक्त आहे.

थीम बेस्ड सीटिंग-

आपण जर आपल्या लिव्हिंग रूमचे इंटिरिअर डिझाइन करताना जर एखादी विशिष्ट थीम वापरली असेल तर त्या थीमच्या अनुषंगाने वापरण्यात येणाऱ्या सीटिंगला थीम बेस्ड सीटिंग असे म्हणतात. यात ट्रॅडिशनल इंडियन म्हणजे वुड कावर्ि्हग असलेले सीटिंग, नॉर्थ ईस्ट इंडियन म्हणजेच मोठय़ा बांबूने बनवलेले सीटिंग, राजस्थानी प्रकारचे सीटिंग, साऊथ इंडियन स्टाइलचे सीटिंग, गोवन अर्थात थोडा पोर्तुगीज बाज असलेले सीटिंग तसेच युरोपिअन, मॉडर्न, अल्ट्रा मॉडर्न, अ‍ॅबस्ट्रॅक्ट अशा वेगवेगळ्या प्रकारचे सीटिंग वापरले जाते.

आपण आपल्या बजेट, गरज व इंटिरिअरला साजेल असे सीटिंग निवडताना केवळ लुक पाहून निवडू नये. ते सुंदर दिसलेच पाहिजे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते बसण्यासाठी आरामदायी असलेच पाहिजे. मजबूत असले पाहिजे. आपल्या लिव्हिंग रूमच्या लेआऊटचा अभ्यास करूनच सीटिंग निवडावे व सीटिंगबरोबरच त्याला सूट होणारे सेंटर टेबल व साइड टेबलही तितकेच महत्त्वाचे आहे. या सगळ्याची योग्य सांगड घातली गेली तरच आपले सीटिंग परिपूर्ण दिसेल.

इंटिरिअर डिझाइनर

ajitsawantdesigns@gmail.com

समाप्त