कुंडीत झाडे कशी लावावीत आणि त्यांना पाणी किती व कसे घालावे याविषयी आपण मागील २ लेखांतून माहिती घेतली. आजच्या लेखातून आपण या झाडांची लागवड करताना व त्यांची काळजी घेताना लागणारी साधने (अवजारे) याविषयी जाणून घेऊया. या सर्व कामांसाठी आपल्याला मुख्यत्वे करून खालील साधनांची आवश्यकता असते- ज्यांना आपण Garden Tools  असेही म्हणू शकतो.

खुरपी, सिकॅटर, छोटे फावडे, विडिंग टूल (Weeding tool), शॉवेल (Shovel), हँड स्प्रेयर (Hand sprayer), इत्यादी.

lonar lake flamingos marathi news
Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Jewellery worth 50 tolas stolen from apartment in Salisbury Park
सॅलिसबरी पार्कमधील सदनिकेतून ५० तोळ्यांचे दागिने चोरीला
Vasai Municipal corporation action against unauthorized construction begins
अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई सुरू
garden, home, Kokedema technique, chatura
निसर्गलिप : कोकोडेमा तंत्राने घरात फुलवा बाग…
geo tagging of trees planted on metro 3 route
मेट्रो ३ मार्गिकेत लावण्यात आलेल्या २००० हून अधिक झाडांचे जिओ टॅगिंग, क्यू आर कोड स्कॅन करत झाडांची संपूर्ण माहिती मिळणार
thane municipal corporation
विश्लेषण : नरिमन पॉइंट, बीकेसी, सीप्झसारखे ग्रोथ सेंटर आता ठाण्यामध्येही… कसा आहे कळवा प्रकल्प?
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर

खुरपी : हाताच्या बोटांसारखी रचना असलेली खुरपी लहान व मोठय़ा आकारामध्ये उपलब्ध असते. आपल्याकडील कुंडय़ांच्या आकाराच्या मानाने आपण योग्य ती खुरपी निवडावी. याचा उपयोग कुंडीतील वरची एक ते दीड इंच माती सैल करण्यासाठी तसेच कुंडीत खत घातले तर ते मातीत नीट मिसळण्यासाठी होतो. आपण कुंडय़ांचे निरीक्षण केले तर आपल्या असे लक्षात येईल की कुंडीतील माती काही दिवसांनी कडक दिसायला लागते. याला compaction of soil असे म्हणतात. अशा मातीत झाडांच्या मुळांना आवश्यक असलेली हवा मिळत नाही तसेच आपण घातलेले पाणी झिरपण्यासही वेळ लागतो. त्यामुळे मुळांची वाढ खुंटू शकते व झाडाच्या वाढीवर परिणाम होऊ  शकतो. अशा कडक झालेल्या मातीला खुरपीच्या साहाय्याने सैल करून घ्यावी. त्यामुळे मातीत हवा खेळती राहते व ती मुळांना उपलब्ध होऊन मुळांची वाढ चांगली होते. त्याचबरोबर जेव्हा आपण दोन-तीन महिन्यांनी कुंडीतील झाडांना खत घालतो तेव्हा आधी माती खुरपीने सैल करून घ्यावी. मग त्यात खत घालून खुरपीने नीट मिक्स करून घ्यावे. गरजेनुसार साधारणपणे दीड ते दोन महिन्यांनी खुरपणी करावी.

सिकॅटर (Secateur) : वेगवेगळ्या आकारांचे सिकॅटर उपलब्ध असतात. त्यापैकी एक ब्लेडचा एक व टोकदार दोन ब्लेडचा एक असे २ सिकॅटर झाडांची निगा घेण्यासाठी आपल्याकडे असणे उपयुक्त ठरते. सिकॅटरचा उपयोग वाळलेल्या फांद्या कापणे तसेच झाडांना आकार देण्यासाठी आवश्यक त्या फांद्या कापण्यासाठी होतो. थोडी जाड फांदी असेल तर ती एका ब्लेडच्या सिकॅटरने कापता येते. तसेच बारीक व नाजूक फांद्या कापण्यासाठी टोकदार ब्लेडच्या सिकॅटरचा उपयोग होतो. पण सिकॅटरचे पाते खूप धारदार असल्यामुळे याचा उपयोग काळजीपूर्वक करावा.

छोटे फावडे : याचा उपयोग खत व माती एकत्र करून त्याचे मिश्रण तयार करण्यासाठी होतो.

विडिंग टूल (Weeding tool) : आपण कुंडीत लावलेल्या झाडाच्या भोवतीच्या मातीतून अनेक प्रकारची छोटी वनस्पती व गवत (याला तण असेही म्हणतात) उगवते. याची बेणणी अधूनमधून करावी लागते. छोटी वनस्पती हाताने उपटून काढता येते. पण जर ती हाताने उपटता आली नाही तर विडिंग टूलच्या साहाय्याने सहजगत्या

काढता येते. अशा प्रकारे बेणणी करून कुंडीतील झाडाभोवतीची माती स्वच्छ ठेवावी. बेणणी करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की अशा वनस्पती मुळांसह उपटूनच काढाव्यात. जर त्या तोडून काढल्या आणि त्यांचा मुळांचा भाग मातीत राहिला तर त्यातून या वनस्पती पुन्हा उगवू शकतात.

शॉवेल (Shovel / Trowel) : याचा उपयोग खत व मातीचे तयार केलेलं मिश्रण कुंडीत भरण्यासाठी होतो.

हँड स्प्रेयर (Hand sprayer) : कधी कधी आपण लावलेल्या झाडांना कीड लागते किंवा रोगाचा प्रादुर्भाव होतो. अशा वेळी सेंद्रिय कीडनाशक व रोगनाशक यांची फवारणी घ्यावी लागते. त्याचबरोबर अन्नघटकांच्या फवारणीसाठीही छोटय़ा पंपाचा उपयोग होतो. अशा फवारणीसाठी हातात धरून औषध फवारता येईल असा हा छोटा पंप आहे. साधारणपणे १ ते २ लिटर

क्षमतेचा हा पंप कुंडीतील झाडांसाठी उपयुक्त असा आहे.

झाडांची निगा घेताना..

१) झाडांना जर दिवसातले काही तास सूर्यप्रकाश मिळत असेल तर थोडय़ा थोडय़ा दिवसांनी कुंडी ९० अंशात फिरवावी. ठरावीक दिवसांनी हे करत राहावे. आधी फिरवलेल्या दिशेलाच पुढे पुढे फिरवत जावे. असे केल्यामुळे झाडाच्या सर्व बाजूला सूर्यप्रकाश मिळतो. अन्यथा ते झाड सूर्यप्रकाशाच्या दिशेने तिरके वाढण्याची शक्यता असते. अर्थात आपल्याकडील झाडांना किती प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत आहे त्याचा अभ्यास करून आपण कुंडी किती दिवसांनी व कशी फिरवायची हे ठरवावे.

२) काही वेळा खिडकीजवळ ठेवलेल्या झाडांच्या पानांवर धुळीचे कण साठलेले दिसतात. जर याचे प्रमाण खूप जास्त असेल तर ओल्या फडक्याने ही पाने अलगद पुसून घ्यावीत. धुळीच्या थरामुळे पानांना प्रकाशसंश्लेषण करण्यात अडथळा निर्माण होतो व झाडाचा टवटवीतपणा कमी होतो.

३) वाळलेली पाने  साधारणपणे काही दिवसांत नैसर्गिकरीत्या पडतात. पण जर एखाद्या झाडावर वाळलेले पान खूप दिवस तसेच राहिले तर ते हाताने काढून टाकता येते.

४) कधी कधी वाळलेली फुले झाडावर तशीच राहतात. अशी फुले काढून टाकावीत. त्यामुळे झाड छान दिसते.

५) पाम प्रकारातील झाडांचे वाळलेले पान बरेच दिवस तसेच राहते. अशा वेळी पूर्ण वाळलेले पान टोकदार सिकॅटरच्या साहाय्याने खोडाजवळ कापावे.

६) कुंडीत आपण लावलेल्या झाडाव्यतिरिक्त वाढणाऱ्या वनस्पती (तण) हे कुंडीतील जागा, माती, खत व पाणी यावर वाढत असतात व एकप्रकारे आपण लावलेल्या झाडाबरोबर स्पर्धा करत असतात. त्यामुळे वेळोवेळी या वनस्पती काढून टाकणे आवश्यक आहे.

jilpa@krishivarada.in

(((   टोकदार सिकॅटरच्या साहाय्याने असे वाळलेले पान खोडाजवळ कापावे  ))

Story img Loader