कागद, लाकूड याचा नाश करणाऱ्या वाळवीचे नि:शब्द सामर्थ्य भयप्रद असते. दप्तरखाने, खासगी कारभाराच्या कागद वह्यंचा संग्रह, ग्रंथ संग्रह यांच्या संबंधातील झाडलोटीकडे जास्त दुर्लक्ष घडले की त्यावर वाळवीची स्वारी झालीच म्हणून समजावे. या स्वारीने होणाऱ्या विध्वंसातही काही चमत्कार आढळतात. एखाद्या पुस्तकातील साऱ्या पानांचा वाळवीच्या प्रतापाने फडशा उडालेला असतो, पण त्याचे मागचे- पुढचे पुठ्ठे अगदी जसेच्या तसे  असतात. पुस्तक धड असल्याच्या कल्पनेने ते हाती घ्यावे, तर पुठ्ठय़ातला ऐवज साफ झालेला दिसतो व पुस्तक बहुमोल किंवा दुर्मिळ असेल तर हळहळत बसावे लागते.

जगाच्या पाठीवर वाळवीच्या जवळपास १०० जाती ज्ञात आहेत. भारतात त्यापैकी वाळवीच्या पुढील चार मुख्य जाती आढळतात.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल

१)     हैटरोमर्टस इन्डिकोला (Hetero termes Indicola)

२)     कॉपटोटर्मस हेमी (Coptotermes Heimi)

३)     कॉपटोटर्मस पर्वुलस (Coptoemes Parvulus)

४)     ऑडोन्टोटर्मस फीया (Odontotermes Feae)

वाळवी (Termites) व्हाईट अ‍ॅन्ट या नावानेही ओळखली जाते. वाळवी लहान मुंगीच्या आकाराचा एक कीडा असून त्यांना अंडाकृती चार पंख असतात. या पंखाचा उपयोग त्यांना झुंडीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपले खाद्य शोधण्यासाठी उड्डाण करण्याकरिता होतो. या सामूहिक गटागटाने राहतात. त्यांच्या ‘राणी’ सोडून बाकीच्या मुंग्यांचे दोन वर्ग असतात.

१) मजूर आणि

२) शिपाई, शिपाई मुंग्या राणीचे आणि त्यांच्या कॉलनीचे रक्षण करतात.

वाळवीचे मुख्य अन्न अशुद्ध स्थितीत असलेले सेल्युलोज हे होय. पुष्कळ वाळवी मुंग्या कागद, लाकूड प्रत्यक्ष खातात. तर काही लाकूड संपूर्णपणे कुजण्याची (रॉट) वाट पाहतात. काही वनस्पति तंतूवर (Plant Tissues) आपली उपजीविका करतात. तर काही जमिनीच्या आतील कुजक्या वनस्पतींवर. काही वाळवींना रखरखीत जबडा असतो; त्यामुळे त्या लाकडाचे तंतू कुरतडून त्यांचे पीठ करतात. तर काहींच्या डोक्यात निसर्गाने विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी निर्माण केलेल्या असतात. या ग्रंथीद्वारे वाळवींनी गिळंकृत केलेल्या मातीस अथवा लाकडास एक प्रकारच्या पातळ प्रवाहामुळे नरम करण्यात मदत होते. वाळवी आकाराने लहान असून त्या लाखोंच्या थव्याने आपल्या खाद्यावर ताव मारतात आणि पाहता पाहता कागद- लाकडाचा नाश साध्या नजरेस सहजपणे पडू शकेल असा करतात.

लाकडाचा नाश करणाऱ्या वाळवींचे त्यांच्या जीवन क्रमानुसार मुख्य दोन भाग केलेले आहेत.

१) सुके लाकूड खाणारी वाळवी (Dry wood Termites)

२) अर्धवट कच्चे- पक्के लाकूड खाणारी वाळवी. (Sub-terranean Termites) सुके लाकूड खाणारी वाळवी कॉरोटर माइटाइंड या जातीची असून ही जात जगातील वाळवीच्या जातीच्या १५ टक्के प्रमाणात अस्तित्वात आहे. ही लाकडात पृष्ठभागाच्या खाली राहत असून लाकडाच्या तंतूतील गॅलरीचा घरासारखा राहण्यासाठी उपयोग करते आणि लाकडाचा भुसा करून त्यावर आपली उपजीविका करते.

दुसऱ्या प्रकारची म्हणजे शीर वाळवी (Sub-terranean Termites) आपले अन्न मृत झाडांच्या मुळांतून, मृत खोडातून, जिवंत झाडाच्या खोडातून-फांद्यांतून, न सुकलेल्या (वल्ल-२ीं२ल्ली)ि लाकडातून अथवा लाकडी वस्तू- फळ्या, फर्निचरमधून घेत असते.

सुके लाकूड खाणारी वाळवी लाकडाचे तंतू खाऊन आपली उपजीविका करते. लाकूड आतून पोखरून त्यात ‘राणी’ आपल्या संरक्षक मुंग्यांसह राहते. दीर्घ काळानंतर लाकूड पोकळ बनून कमकुवत बनते व वाळवीने केलेला नाश लाकडावर स्पष्टपणे दिसतो.

कधीकधी ही वाळवी लाकडाला बारीक बारीक छिद्रे करते. त्यामुळे उड्डाण करतेवेळी आतील मुंग्यांना बाहेर निघणे सोईचे जाते. सुके लाकूड खाणाऱ्या वाळवीची संख्या प्रत्येक गटामागे १०० ते २०० असून त्यांची लाकूड नाश करण्याची शक्ती कमी प्रमाणात आणि हळू असते.

शीर वाळवी (sub-terranean Termites) मात्र लाकडाचा नाश करण्यात जलद आणि पटाईत असते. या आपल्या भोवती चावून चोथा झालेल्या लाकडाचा भुसा आणि माती यांचा बोगदा करून त्यातून आपला मार्ग काढीत असतात. या संरक्षित बोगद्यामुळे त्यांना आपल्या खांद्यावर येथेच्छ आणि सावकाश ताव मारावयास मिळतो. जर लाकूड जमिनीवर पडले असेल तर या मुंग्या जमिनीतून लाकडात आरपार असे बोगदे तयार करतात आणि हे कार्य करीत असतानाच लाकडाचा खाऊन नाशही करतात. कधी कधी लाकडाचे असे झालेले नुकसान वरून दिसून येत नाही. घरांचे राफटर्स, खांब, फर्निचर ज्या ज्या लाकडी बांधणीच्या म्हणून वस्तू असतील तेथे यांचा हमखास प्रवेश असतो. वाळवी जरी उष्ण प्रदेशातील लाकूड नाशक कीड असली तरी तिचा उपद्रव पृथ्वीवरील प्रत्येक देशात थोडय़ाफार प्रमाणात होतच असतो. एवढेच नव्हे तर त्यांचे वस्ती स्थान वाळवंटी प्रदेशात तसेच मिठागरातसुद्धा आढळून आलेले आहे.

एकदा वाळवीने नाश झालेल्या लाकडी वस्तूंवर उपाय केले तरी झालेले नुकसान भरून निघत नाही. म्हणून प्रतिबंधक उपाययोजनाच उत्तम. याकरिता लाकूड कामासाठी अशाच लाकडाची निवड करणे योग्य की ज्याला वाळवी लागत नाही. किंवा जे वाळवीरोधक (Termite resistant) आहेत. शिसवी, तसेच सागवान (Tectona grandis) व मोहोगनी (Switenia Macrophylla) या जातीच्या लाकडांना वाळवी लागत नाही. पण सर्वच फर्निचर किंवा घराची बांधणी अथवा अन्य लाकडी कामासाठी लागणारे लाकूड याच जातीचे मिळणे अथवा वापरणे प्रत्यक्षात शक्य नसते. शिवाय या जातीचे वापरात येणारे लाकूड सुकलेले (Seasoned) आणि कच्चेपणा (Sap) विरहित असणे आवश्यक आहे. अन्यथा लाकडाच्या याही जातींना वाळवी लागण्याची शक्यता असतेच.

वाळवीपासून लाकडांचे संरक्षण करण्याचा हमखास उपाय म्हणजे लाकडास प्रथमच संरक्षक रसायनाने संरक्षित करणे (wood preservation) हा होय. हा थोडा खर्चाचा असला तरी दूरदृष्टय़ा फायदेशीर ठरतो. ही रसायने वापरण्याच्या तीन पद्धती आहेत.

१) ब्रशने लावणे अथवा स्प्रे करून फवारा उडविणे.

२) रसायनांच्या टाक्यात (Tanks) लाकूड बुडवून अथवा काही काळ भिजत ठेवून लाकूड संरक्षित करणे.

३) मोठमोठय़ा गोल सिलेंडर्समध्ये विशिष्ट दाबाखाली रसायनाने लाकूड संरक्षित करणे.

पहिली पद्धत अन्य दोन पद्धतींपेक्षा कमी परिणामकारक असली तरी सोपी असल्यामुळे घरगुती फर्निचर अथवा छोटय़ा कामासाठी योग्य ठरते. घरगुती फर्निचर अथवा भिंतीवर संरक्षक रसायन (Preservative Chemical) लावण्यापूर्वी साफ करून नंतरच त्यावर रसायनांचा वापर करावा.

दुसऱ्या पद्धतीमध्ये रसायनांचे मिश्रण मोठय़ा ड्रममध्ये बनवून ते २००॰ फॅरनहाइट पर्यंत गरम करून त्यात आवश्यक असलेली लाकडे २-४ तास बुडवून ठेवावी लागतात. तर सिलेंडर्सच्या तिसऱ्या पद्धतीत विशिष्ट दाबाखाली रसायने वापरण्यासाठी सर्व सोयीयुक्त असा विशिष्ट प्रकारचा प्लँट असतो. या दोन पद्धतींमधील क्रियांसाठी रासायनिक व तांत्रिक शिक्षणाचीही आवश्यकता असते. या सगळ्या क्रिया घरगुती स्वरूपाच्या नसल्यामुळे घरातील वाळवीग्रस्त भिंतीवर अथवा फर्निचरवर ब्रश किंवा फवाऱ्याने रसायनांचा वापर करावा.

वाळवीमुळे झाडांचे देखील नुकसान होते. नियंत्रणासाठी जमिनीत हेप्टॅक्लोर मिसळावे याशिवाय झाडावर/ जमिनीत १० मि.लि. सुमिसिडीन किंवा २० मि.ली. क्लोरपायरीफॉस १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण फवारावे अथवा ओतावे.

वरील सर्व औषधी रसायने तसेच फवारा मारण्यासाठी पंप मोठय़ा शहरात हार्डवेअरच्या दुकानात तसेच बी-बियाणे, खते कीटकनाशके विकणाऱ्या दुकानात मिळतात. ही रसायने वापरायच्या सूचना डब्यावर दिलेल्या असतात. कंटाळा न करता त्यांचा वापर करून वाळवीचा बंदोबस्त करावा.

संहारक रसायने

वाळवीसाठी संहारक रसायने देशी व विदेशी बनावटीची बाजारात तयार मिळतात. खालीलपैकी कोणतेही रसायन सोईच्या पद्धतीने वापरावे.

*   क्लोरपायरीफॉस २०% इसी (Chlorpyrifos 20% E.C.) – वाळवी नाशासाठी याची खास शिफारस केली जाते. रंगहीन असल्यामुळे तसेच पाणी आणि केरोसीन दोन्हींमध्ये विद्राव्य असल्यामुळे वापरण्यास उत्तम. लाकडी फर्निचरवर वापरावयाचे असल्यास केरोसीनमध्ये व भिंतीवर वापरावयाचे असल्यास पाण्यात (२%) वापरावे. अत्यंत प्रभावशाली व परिणामकारक.

*   कोल्टार क्रिओसोट- हे तेल केरोसीनमध्ये ५०: ५० या प्रमाणात मिसळून फवारा आणि ब्रशने वापरतात. परंतु रंगाने काळसर असल्यामुळे पॉलिश करावयाच्या लाकडांसाठी याचा उपयोग करता येत नाही. हा याचा मुख्य दोष आहे.

*   सॉलिगनम (Solignum) हेसुद्धा रंगहीन असल्यामुळे पॉलिश व पेंट केलेल्या वस्तूंवर वापरता येते.

*   वोमन सॉल्ट (Wolman salt) पाण्यात मिश्रण करून ब्रश किंवा फवाऱ्याने वापरता येते.

*   आस्कू (Ascu) वाळवीनाशासाठी बाजारात तयार मिळते. अरसेनिक पेन्टॉक्साइड आणि कॉपर सल्फेटचे मिश्रण पोटॅशियम अथवा सोडियम डायक्रोमेटच्या बेसवर केलेले असते.

*    कॉपर नॉप्थीनेट (Coper Napthenate) रंगाने साधारण निळसर हिरवट असल्याने पेंट करायच्या वस्तूवर याचा वाळवी प्रतिबंधक म्हणून उपयोग करतात. पाण्यात मिश्रण करून ब्रश किंवा फवाऱ्याने वापरता येते.

विश्वास अजिंक्य vasturang@expressindia.com