रंगचक्रावर सर्वात पहिल्या असलेल्या प्राथमिक रंगाच्या श्रेणीतल्या तांबडय़ा रंगानंतर येणारा दुसरा प्राथमिक रंग म्हणजे पिवळा रंग. एप्रिल-मे महिना म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर येतं ते सोन्यासारखं पिवळं ऊन, पण तशा रणरणत्या उन्हातही निसर्गावर एक नजर टाकली, तर सकाळी लग्नात नेसतात तशी नवरीची हळदीची पिवळी साडी नेसली आहे, असा भास व्हावा, असे पिवळ्या जर्द फुलांनी बहरलेले बहाव्याचे वृक्ष, (छायाचित्र १) आणि याच काळात येणारा फळांचा राजा पिवळा आंबा.. वसंताच्या आगमनामुळे हिरव्या झालेल्या निसर्गावर हा पिवळा रंग अधिकच खुलून दिसतो.

सप्तरंगांमध्ये सर्वात तेजस्वी असलेला रंग म्हणजे पिवळा रंग. चित्र काढताना अनेकदा निसर्गचित्रांमध्ये सूर्य रंगवण्यासाठी या रंगाचा किंवा या रंगाच्या कुटुंबातल्या एखाद्या रंगछटेचा वापर केला जातो. सूर्यफुलाचा पिवळा, आंब्याचा पिवळसर केशरी, लिंबाचा पिवळा, हळदीचा पिवळा, अंडय़ाच्या बलकातला पिवळा अशा पिवळ्या रंगाच्या अनेक छटांची उधळण निसर्ग करतो. पूर्ण उमललेलं पिवळं सूर्यफूल किंवा पिवळं गुलाब, पूर्ण पिकलेला पिवळसर केशरी आंबा, पिवळं धमक लिंबू किंवा पिवळी जर्द हळद असे शब्द जरी उच्चारलेत, तरी त्यांच्या रूपाने निसर्गात ओसंडून वाहणारं चतन्य, आनंद किंवा प्रसन्नताच प्रथम आपल्या नजरेसमोर येते. तर असा हा पिवळा रंग, मनाला चतन्य आणि आनंद देत असल्यामुळे प्रसन्नतेचं प्रतीकच मानला गेला आहे. अर्थातच बठकीची खोली, स्टडीरूम, स्वयंपाकघर अशा खोल्यांसाठी हा रंग अधिक उपयुक्त आहे. कारण तो विचारांना चालना देतो. मन अधिक सजग करतो. त्यामुळे एकाग्रता वाढायला मदत होते आणि स्मरणशक्तीही अधिक तल्लखपणे काम करते. त्यामुळे स्टडीरूमसाठी हा रंग अतिशय उपयोगी आहे. पिवळा रंग मनाची एकात्मता साधायलाही मदत करतो. त्यामुळेच बठकीच्या खोलीत जिथे सर्व कुटुंब एकत्र बसतं किंवा पाहुण्यांची ऊठबस असते, गप्पागोष्टी रंगतात, अशा ठिकाणीही हा रंग असेल, तर सर्वाची चित्तं प्रफुल्लित राहिल्यामुळे त्या खोलीतलं वातावरण खेळीमेळीचं राहायला मदत होते. अशीच एक खोली सोबतच्या छायाचित्रात (छायाचित्र-१ मध्ये) दाखवली आहे. त्यात भिंती आंब्याच्यासारख्या पिवळ्या रंगात रंगवल्या आहेत. त्यावर लावलेल्या पेंटिंगमध्येही पिवळ्या रंगछटेचाच प्रामुख्याने वापर केला आहे. पेंटिंगखालच्या शोकेसवर ठेवलेली फळंही त्याच रंगछटेतली आहेत. बठकव्यवस्थेच्या मध्यभागी ठेवलेलं टीपॉयही पिवळ्या रंगातलं असून त्याच्या शेजारी रंगचक्रावरचं शेजारी असलेल्या हिरव्या रंगातलं टीपॉय अधिकच खुलून दिसतंय. तसंच त्यावर ठेवलेल्या पिवळ्या रंगाच्या फुलदाणीतली तांबडी फुलं रंगसंगतीला एकूणच उठाव आणत आहेत. सोफ्यावर ठेवलेल्या उशा किंवा तक्केही पिवळ्या रंगाचेच आहेत. पण पिवळा रंग हा तसा पटकन डोळ्यांत शिरणारा, फ्लोरोसण्ट, म्हणजेच दृष्टी प्रदीप्त करणारा रंग आहे. म्हणूनच त्याची प्रदीप्तता कमी करण्यासाठी सोफ्याची कव्हर्स आणि जमिनीवरचं कारपेट तसंच फ्लोअिरगच्या टाइल्स यांच्यासाठी मंद पेस्टल रंगांचा वापर केलेला दिसतो. यामुळे संतुलन साधायला मदत होते आहे. खोलीतला नसíगक प्रकाश खूप कमी असेल, तर अशा खोलीत अंडय़ाच्या बलकाच्या रंगाची जी पिवळी छटा असते, तिचा वापर केला, तर प्रकाशात वाढ व्हायला मदत होऊ शकेल. मात्र जिथे नैसर्गिक प्रकाश फार कमी नाही, अशा ठिकाणी फार गडद छटा असेल, तर खोलीतल्या भिंती अंगावर आल्यासारखं वाटतं. त्यामुळे अशा ठिकाणी फिक्कट पिवळ्या रंगाची छटा वापरली तर खोलीचा आकार थोडा मोठा झाल्यासारखा वाटतो.

463rd Sanjeev Samadhi ceremony of Shri Morya Gosavi Maharaj concluded
पिंपरी : पुष्पवृष्टी, नगरप्रदक्षिणा, कीर्तन, महापूजा आणि महाप्रसादाने महोत्सवाची सांगता
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Dapoli Mango Cashew Production, Dapoli Mango,
थंडीने रत्नागिरी जिल्हा गारठला; आंबा काजू उत्पादनात वाढ होण्याची व्यावसायिकांना आशा
Mumbaikars are suffering from afternoon heat despite cool mornings for past few days
उकाड्याने मुंबईकर हैराण
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”
diy Tulsi plant maintain Tips hacks
हिवाळ्यात तुळशीची पानं पिवळी पडून सुकतायत? फॉलो करा फक्त चार टिप्स, तुळस पुन्हा होईल हिरवीगार
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!

जिथे निवांतपणा हवा, विचारचक्र थांबून मनाला आणि शरीराला विश्रांती हवी, अशा बेडरूममध्ये मात्र, तेजस्वी पिवळ्या रंगाचा वापर टाळावा. पिवळा रंग जर या खोलीसाठी वापरायचा झालाच, तर अत्यंत फिक्कट रंगछटांचा वापर करावा (छायाचित्र-२.) जेवताना मन प्रसन्न असावं. त्यामुळे पाचक रस पाझरतात. हे आपल्याला माहीत आहेच. तसंच मन चतन्यदायी ठेवण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करता येतो, हेही आपण पाहिलं आहे. त्यामुळेच जर डायिनग टेबलच्या टेबलक्लॉथसाठी पिवळ्या रंगाचा वापर केला, तर अशा टेबलावर जेवायला बसताना आपल्याला प्रसन्न वाटेल. पिवळ्या रंगाचं संतुलन साधण्यासाठी काळ्या रंगाचा वापर करता येईल. काळ्या रंगाबरोबर पिवळा रंग

छायाचित्र २ – पिवळ्या रंगातल्या भिंती, पेंटिंग, टीपॉय आणि उशांची कव्हर्स ही खोलीत येणाऱ्या सोनसळी उन्हाने न्हाऊन निघाल्यावर बैठकीची खोली अधिकच प्रसन्न वाटते.

vs-12धिक खुलूनही दिसतो. अशीच एक डायिनग एरियासोबतच्या छायाचित्रात (छायाचित्र-३ मध्ये) दाखवली आहे. त्यात पिवळ्या टेबलक्लॉथचा वापर केलेला दिसतो आहे. त्याबरोबर असलेल्या लाकडी खुच्र्यासाठी काळपट रंगाचं पॉलिश वापरलं आहे, तर लोखंडी खुच्र्या काळ्या रंगात रंगवल्या आहेत. हिरवा आणि पिवळा अशी रंगांची जोडीही खुलून दिसते. याच छायचित्रातल्या टेबलवर ठेवलेली पिवळी फुलं आणि सभोवतालची हिरवी पानं अधिकच खुलून दिसत आहेत. निळा आणि पिवळा, तसंच जांभळा आणि पिवळा या जोडय़ाही तितक्याच प्रभावी दिसतात.

दिवसभराच्या कामानंतर आपण थकूनभागून घरी येतो, तेव्हा आपल्यातलं चतन्य हरपलेलं असतं. कारण आपलं शरीरच नव्हे, तर मनही थकलेलं असतं. तेव्हा हे चतन्य आणि प्रसन् नता पुन्हा आपल्याला बहाल करून शरीर आणि मन ताजं टवटवीत करण्याचं काम बठकीच्या खोलीत किंवा किचन आणि डायिनगरूममध्ये असलेला पिवळा रंग करू शकतो.

(इंटिरियर डिझायनर)

मनोज अणावकर

Story img Loader