‘वास्तुरंग’ मधील  ‘शृंगवेरपूर : प्राचीन जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना’ हा आसावरी (पद्मा) बापट यांचा लेख वाचला. लेख वाचून कुतूहलाने मी ‘गुगल अर्थ’कडे वळलो आणि हे ठिकाण शोधण्याचा प्रयत्न केला. आश्चर्य म्हणजे, हे ठिकाण तेथेही अगदी स्पष्टपणे दर्शविले होते. लेखिकेने  या लेखात खूप माहितीपूर्ण आणि उपयुक्त माहिती दिली आहे.
– विनित साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुन:प्रत्ययाचा आनंद
‘वास्तुरंग’मधील  ‘शब्दमहाल’ सदरातील ‘रथचक्र’ हा लेख वाचला. ‘रथचक्र’ कादंबरी मी नुकतीच वाचली होती. या लेखामुळे ही कादंबरी पुन्हा वाचल्याचे समाधान मिळाले.
– राजश्री देशपांडे

‘मुक्काम पोस्ट पंचवटी’ उत्तमच!
‘वास्तुरंग’मधील  ‘शब्दमहाल’ सदरातील ‘मुक्काम पोस्ट पंचवटी’ हा लेख वाचला. पंचवटीत गदिमांच्या स्मृती कायम आहेत हे वाचून आनंद झाला. हल्लीच माझ्या वाचनात भारत सरकारने प्रकाशित केलेली गीत रामायणाची आठवी आवृत्ती पडली. वाल्मीकीने आपल्या सौंदर्यदृष्टीने रामकथा रचली. त्याचप्रमाणे गदिमांनी स्वयंभू प्रतिभेने छप्पन गीतांमध्ये आपली सजीव आणि चलत चित्रकथा मूर्तिमंत केली. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कवी बोरकर म्हणतात, ‘एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतरदेखील यातील काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहात आणि त्याबरोबर माडगूळकरांचे नावदेखील.’
– पद्मजा वासुदेव

बायोसॅनिटायझरची उपयुक्तता
‘वास्तुरंग’  ‘शशिकांत शुक्ल’ यांचा ‘पाणी बचत आणि संवर्धन’ हा लेख वाचला. मातीची संरचना ही प्रदूषित पाण्याच्या भूजलात प्रवेश रोखते. प्रदूषित पाणी जमिनीत जिरण्याचा वेग १० मि.मी. प्रतिदिन असा आहे. परंतु हाच वेग जमिनीच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या साठय़ात बायोसॅनिटायझर टाकल्यास १००० मि.मी. प्रतिदिन इतक्या वेगाने होतो. अशा रीतीने बायोसॅनिटायझर तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ पाणी शुद्धीकरणासाठी होत नसून, प्रभावी पाऊस पाणी संचयनासाठी व पूर नियंत्रणासाठीही होऊ शकतो. पाणी ही पुनर्भरण करण्यायोग्य साधनसंपत्ती असून ती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. याकरिता पावसाच्या प्रत्येक थेंबाचे रूपांतर भूजलात करून त्याचे संवर्धन व जोपासना करणे गरजेचे आहे. बायोसॅनिटायझरचा उपयोग माफक खर्चात व सोप्या रीतीने पाणी शुद्ध करण्यासाठी, त्यास आरोग्यदायी गुणधर्म देऊन प्रदूषणाचे रूपांतर साधनसंपत्तीत करण्यासाठी होतो.
– गुणवंत पाटील

वाचकांना सजग करणारा लेख
‘वास्तुरंग’  मधील ‘चिऊचं घर’ सदरातील श्रीपाद यांचा ‘टाकाऊ ते टिकाऊ व्हाया क्रिएटिव्हिटी’ हा लेख वाचकाला उपलब्ध गोष्टींचा सजगतेने वापर करायला सुचविणारा लेख आहे. हा लेख वाचून मीसुद्धा पाणीबचतीचा प्रयत्न करणार आहे.
– शलाका सरपोतदार

मनाला भावणारा लेख
‘वास्तुरंग’ मधील साधना बहुळकर यांच्या ‘स्टुडिओ’ सदरातील शिल्पकार दिनकर थोपटे यांच्या ‘शिल्पसाधना’ या स्टुडिओविषयीचा लेख वाचनापत आला. मी थोपटेंसोबत शिल्पसाधनात सहावष्रे काम केल्याने हा लेख विशेषत्वाने भावला आणि माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. या लेखाबद्दल लेखिकेचे धन्यवाद!
– बापू झांजे, पुणे.