‘वास्तुरंग’मधील (१० नोव्हेंबर)  ‘भावनाचं बेट’ हा लेख खरोखरच बोधप्रद आहे. मुलांची स्वतंत्र खोली ही संकल्पना सध्या रुळतेच आहे. त्यात मुलांच्या खोलीसाठी देण्यात येणाऱ्या माहितीमुळे मोठय़ांच्याही ज्ञानात भर टाकली आहे. उजळ रंगामुळे सकारात्मक कंपने निर्माण होऊन वातावरणात ऊर्जा येते, तर निळा रंग हा शांतता प्रदान करणारा रंग असून त्याने मेंदू शांत राहून झोप लागण्यास मदत होते याचा प्रत्यय आपणासही येतोच.
लता दाभोळकर यांचा ‘भिंत.. एक भावविश्व’ हा लेखही मनाला भावला. तरीही मुलांनी भिंती रंगवून खराब केलेले घर मनाला खटकते. भिंतीवरच्या चित्रांमध्ये त्यांचे भावविश्व सामावलेले असते, तो त्यांचा आवडता छंद असतो. त्यात ती रमतात हे सर्व खरे, पण मुलं दुसरीकडे कुठे गेली व त्यांनी तिथल्या घरच्या भिंती रंगविण्याचा हट्ट धरला तर त्यांच्या पालकांना हे आवडणार नाही व ज्यांच्याकडे ती पाहुणे म्हणून जातील त्या घरातल्यांनाही मुलांचा हा दुर्गुणच वाटेल. पण त्यावर लेखिकेने सुचविलेला भिंतीवर काळा, हिरव्या रंगांचा फळा योग्य वाटतो. उभ्या पृष्ठभागावर लिहिताना खांद्याच्या स्नायूवर ताण येतो आणि ते स्नायू विकसित होण्यास मदत तर होतेच, पण बालपणापासूनच त्यांना फळ्यावर लिहिण्याची सवय लागल्यामुळे अक्षरही वळणदार येते, हा मी माझ्या नातवंडांवरून घेतलेला स्वानुभव आहे. आपण जेव्हा भिंती खराब होतात म्हणून त्यावर लिहिण्यास त्यांना प्रतिबंध करतो त्याच वेळी त्यांच्या प्रगल्भ बुद्धीला वाव मिळावा, खांद्याच्या स्नायूबरोबर बोटांचे स्नायूही विकसित व्हावेत, पुढेही वरच्या वर्गात वाढता अभ्यास करताना त्यांना मोठा पृष्ठभाग असलेला फळाच अतिशय उपयुक्त ठरेल व तेच साधन त्यांना पर्यायी उपलब्ध करून देऊन कागदाचा जास्त वापर न करता खडूने फळ्यावर लिहिण्याची सवय होईल. हा लेख वाचून म्हणावेसे वाटते, ज्या घरी बालक त्या घरी असावा रंगीत फलक.’’
– शुभदा कुळकर्णी, कुर्ला.

मुलांना समजून घेण्यासाठी…
‘वस्तुरंग’ (१० नोव्हेंबर) मधील लता दाभोळकर यांचा ‘भिंत. एकभावविश्व!’ हा लेख वाचला अन् या लेखामुळे भिंतीवर लिहिण्यातून वा चित्र साकारून मुलांच्या मनात चाललेल्या भावनांच्या कल्लोळाची आजवर कधीही न झालेली जाणीव मला प्रकर्षांने झाली. तसेच सातासमुद्रापार गेलेल्या माझ्या नातवाची प्रकर्षांने आठवण झाली. डोळ्यात पाणी आले. तीन-चार वर्षांपूर्वी तो भारतात असताना घराच्या बेडरूममधील भिंतीवर त्याने वेडेवाकडे काढलेले लहानसे घर पाहून मी त्याला दटावायला सुरुवात केली, पण शिक्षिका असलेल्या माझ्या पत्नीने मात्र आपल्या नेत्रपल्लवीने खुणावत मला मध्येच थांबविले.. तरीदेखील तो रुसलाच! आज यूकेमधील हॅरो येथे शाळेत अनेक क्षेत्रांत तो आपली चमक दाखवीत आहे, अर्थात त्याचे भावविश्व समृद्ध होण्याचे श्रेय माझ्या पत्नीलाच द्यावयास हवे!
मुलांच्या भावनांकाविषयीचे अभ्यासक, बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप केळकर यांनी आपल्या मनातलं भावविश्व उलगडण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने भिंतीचा एखादा कोपरा मुलांसाठी राखीव ठेवावा, हा दिलेला सल्ला अगदी उपयुक्त आणि रास्त वाटला. आपली भिंत मुलांनी खराब केलेली पाहून रागे भरण्याऐवजी, त्या योगे आपल्या मुलांचे भावविश्व समृद्ध होऊ शकते हे मला मात्र खूपच उशिराने कळले होते. प्रत्येकानेच हा लेख वाचून त्याप्रमाणे मुलांच्या बाबतीतली आपली मते, धोरणे, ठरविणे ही काळाची गरज म्हटली पाहिजे.
-कीर्तिकुमार वर्तक, वसई.

school Annual day function viral video
‘शाळेच्या त्या सोनेरी आठवणी…’ मैदानात सराव, मेकअपसाठी एकच फाउंडेशन अन् बरंच काही; VIRAL VIDEO पाहून आठवेल शाळेतला वार्षिकोत्सव
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Nagpur Prostitution , college girls Prostitution Nagpur,
नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच

भावस्पर्शी लेख
‘वास्तुरंग’मध्ये (१० नोव्हेंबर) बालदिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध झालेले लेख खूपच आवडले. मुलांच्या खोलीबाबत विविध अंगांनी विश्लेषण करणारे लेख खूपच वैशिष्टय़पूर्ण वाटले. त्यात ‘भ्िंात..एक भावविश्व’ हा लता दाभोळकर यांचा लेख खूपच भावस्पर्शी वाटला.  मुलांचं मन, भावविश्व समजून घ्यायला िभतीवर रेखाटलेल्या रेघोटय़ा, चित्र खूपच उपयोगी पडतात. लेखिकेने एका वेगळ्या, पण महत्त्वाच्या विषयावर लिहिले त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!  हा लेख वाचता वाचता मीही भूतकाळात रमले. िभतीवर आपली कलाकृती रेखाटणार नाही असं मूल विरळाच. मला स्वत:ला तर िभत एक मोठ्ठा कॅनव्हास वाटतो. ज्यावर मुलं चांगल्या प्रकारे चित्र रेखाटू शकतात. माझी मुलंही जेव्हा िभतीवर रेघोटय़ा मारू लागली तेव्हा मी त्यांना त्या रेघोटय़ांमधून कशी सुंदर चित्रं निर्माण होतात हे दाखवू लागले आणि चक्क मीही मुलांच्या बरोबरीने चित्र काढू लागले, मग वाढदिवसानिमित्त िभतीवर केकच्या डिझाईनप्रमाणे कार्टूनविश्व तर कधी जंगलबुक आकार घेऊ लागले, त्यात माझी मत्रीण- निरंजनाही आम्हाला सामील झाली आणि ती त्यात कार्डबोर्डचे झाड किंवा झोपडी अशी काहीबाही भर टाकू लागली. काही दिवसांतच मी दोघांसाठी दोन फळे-डस्टर विकत आणले.
मुलीने लहानपणी केलेल्या फळ्याच्या वापराचा उपयोग कुठेतरी तिला एमबीएच्या प्रेझेंटेशनमध्ये नक् कीच झाला असावा, असे मला वाटते. त्यापकी एक फळा आजही घरात आहे, वेळप्रसंगी त्यावर चित्र, संदेश लिहिला जातो.
ज्योती कपिले, बांद्रा.

Story img Loader