पुनर्विकासामुळे त्या पुनर्विकासांतर्गत होणाऱ्या बांधकाम आणि तत्सम बाबींचा शेजारीपाजारील लोकांना होणारा त्रास ही एक नवीन समस्या उद्भवलेली आहे

गे ल्या काही काळात झालेल्या शहरीकरण आणि नागरीकरणाने बहुतांश शहरांमधल्या मोकळ्या जागा संपुष्टात आलेल्या आहेत, तसेच गेल्या सुमारे पन्नास वर्षांत बांधलेल्या विविध इमारतींची पुनर्विकासाची वेळसुद्धा आलेली. या दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून विशेषत: शहरी भागात आता पुनर्विकासाचे युग आलेले आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.

Sustainability Crusader Award Announced to Alok Kale Founder and Managing Director of Magnus Ventures Pune news
औद्योगिक कचऱ्यातून नवव्यवसायाची निर्मिती! पुण्यातील तरुण उद्योजकाचा प्रवास
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी

पूर्वी जेव्हा हळूहळू शहरीकरण होत होते तेव्हा एकेका विभागात एकेका परिसरात बांधकाम प्रकल्प राबविले गेले तिथे वस्ती आली. मग बांधकाम पुढे सरकले असे टप्प्याटप्प्याने होत गेले. आता मात्र असे होत नाही. एकाच विभागातील किंवा परिसरातील सर्वच इमारतींचा एकत्रित आणि एकदम पुनर्विकास होणे हे जवळपास अशक्यच आहे. त्यामुळेच काही इमारतींचा पुनर्विकास होतो. मग कालांतराने पुन्हा काही इमारतींचा पुनर्विकास होतो.

अशा पुनर्विकासामुळे त्या पुनर्विकासांतर्गत होणाऱ्या बांधकाम आणि तत्सम बाबींचा शेजारीपाजारील लोकांना होणारा त्रास ही एक नवीन समस्या उद्भवलेली आहे आणि सध्याची आपली शहरांची अवस्था बघता पुढील किमान २५ / ३० वर्षे जुन्या इमारतींचा एकामागून एक पुनर्विकास होत राहणार आहे.

पुनर्विकासाचे काम सुरू झाले की जुन्या इमारतीचे तोडकाम- नवीन इमारतीची पायाभरणी करण्याकरता खड्डा खणणे-नवीन इमारतींचे टप्प्याटप्प्याने होणारे बांधकाम- मग अंतर्गत सोयीसुविधांचे काम या सगळ्या कामांकरता अवजड वाहने आणि यंत्रसामुग्रीची ये-जा, काम करताना होणारे कर्णकर्कर्श आवाज आणि बांधकाम पूर्ण झाल्यावर नवीन लोकांचे घरातील फर्निचरचे वगैरे काम आणि त्याचा आवाज या सगळ्यामुळे शेजारच्या लोकांना ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, उडणारी धूळ, रस्त्यावरती येणारा चिखल, रस्त्यावर येणारे बांधकाम साहित्य आणि राडारोडा या सगळ्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. परिणामी काही वेळेस शेजारपाजारच्या लोकांच्या आरोग्यास धोकासुद्धा निर्माण होतो. अवजड वाहनांची बेशिस्तपणे ये-जा झाल्याने वाहतुकीस अडथळा होतो आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित वाहने आणि मदत पटकन पोचत नाही.

बरं त्यातही एकेका भागात किंवा गल्लीत ज्या काही इमारती असतात त्यांचा एकत्रित एकाचवेळेस पुनर्विकास होणे जवळपास अशक्यच असल्याने दर काही वर्षांनी हा सगळा त्रास पुन्हा नव्याने आणि सुरुवातीपासून सहन करावा लागतो. पुढच्या सुमारे २५-३० वर्षांच्या पुनर्विकासाच्या युगाचा विचार करता, शेजारील लोकांना पुनर्विकास कार्याचा दर काही कालावधीने त्रास सहन करायला लागणे हे काहीसे अन्याय्य आहे. साहजिकच पुनर्विकास तर व्हावा पण वर्षानुवर्षे असलेल्या शेजाऱ्यांना त्रास होऊ नये असा काहीतरी सुवर्णमध्य निघणे आवश्यक आहे. वास्तविक समझोत्याने आणि समजुतीने या गोष्टी होऊ शकतात, मात्र पुनर्विकास करणारा विकासक हा लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण करणे आणि जास्तीतजास्त नफा कमविणे यावर लक्ष केंद्रित करत असल्याने शेजारपाजाऱ्यांना होणाऱ्या त्रासाची तो दखल घेईल याची काही खात्री नाही, किंबहुना त्याला त्याच्याशी काही देणे-घेणे नसतेच. सद्या:स्थितीत विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामध्येसुद्धा याबाबतीत सुसूत्रता दिसून येत नाही. बांधकाम किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत करावे? बांधकामाचे साहित्य कुठे उतरवावे? बांधकामामुळे उडणारी धूळ कशी नियंत्रित करावी? बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची मर्यादा काय असावी? याबाबत सार्वत्रिक ठोस निकष आहेत का? याबाबत काहीही निश्चित माहिती सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे उपलब्ध नाहीये.

या सगळ्याचा विचार करता पुनर्विकास करताना त्याचा शेजाऱ्यांना होणारा संभाव्य त्रास लक्षात घेऊन बांधकाम किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत करावे, बांधकामाचे साहित्य कुठे उतरवावे, बांधकामामुळे उडणारी धूळ कशी नियंत्रित करावी, बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची मर्यादा काय असावी या, अवजड वाहनांची ये-जा कशी आणि केव्हा करावी, या आणि अशा सगळ्याकरता ठोस निष्कर्ष निश्चित करणे आणि त्याची कठोर आणि परिणामकारक अंमलबजावणी करणे हे शहरी लोकांच्या आरोग्याकरता अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा जेव्हा पुनर्विकास प्रकल्पाला परवानगी दिली जाते तेव्हा त्या परवानगीमध्येच शेजारपाजाऱ्यांना त्रास न होण्याकरता आवश्यक त्या अटींचा सामावेश केलेला असावा, जेणेकरून सर्वांना त्या अटी व शर्तींची माहिती सहज उपलब्ध होईल. थोडक्यात काय तर, एकाचा पुनर्विकास हा दुसऱ्याचा त्रास ठरणार नाही याकरता आवश्यक त्या नियमांची आखणी आणि अंमलबजावणी झाल्यास त्यात सर्वांचेच हीत आहे.

● tanmayketkar@gmail.com

Story img Loader