गौरी प्रधान
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा’ खरेच आहे, नाही? अगदी श्रावण महिना सुरू झाला की विविध सणांची आरास सुरू होते आणि दिवाळी ही जणू काही त्या सगळय़ा सण-उत्सवांचा महाअंतिम सोहळाच. या महाअंतिम सोहळय़ाची तयारीदेखील तशीच मोठ्ठी करावी लागते. नवे दागदागिने, कपडेलत्ते आणि मिठाया ही सगळी तयारी तर असतेच, पण या सगळय़ांपेक्षा महत्त्वाचे जर काही आपण करत असू तर ती असते घराची साफसफाई आणि त्यापाठोपाठ रंगरंगोटी.
अगदी गरिबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंतदेखील दिवाळीच्या आधी घराची रंगरंगोटी करून घेतल्याखेरीज राहत नाही.हल्ली आपण इन्स्टंट हा शब्द सगळीकडेच ऐकत असतो, अगदी इन्स्टंट फूड, इन्स्टंट मेकओव्हर आणि बरंच काही इन्स्टंट.. तर सांगायचा मुद्दा हा की, ही जी घराची साफसफाई आणि रंगरंगोटी आपण पूर्वापार करत आलोय ना, तेही घराचे इन्स्टंट मेकओव्हरच बरं का! पण तरीही घरात रंग लावायला काढला की सगळय़ा फर्निचरची झाकपाक करा, पुढचे काही दिवस तो रंगांचा नकोसा वास सहन करा, या सगळय़ा गोष्टी आल्याच. शिवाय या सगळय़ाला अगदीच काही कमी वेळ लागत नाही. पण मग याला काही पर्याय आहे का? तर आहे, नक्कीच आहे. वॉलपेपर हा तो पर्याय. अगदी जादूची कांडी फिरवावी तसा हा वॉलपेपर आपल्या घराचे रूपडे अवघ्या काही तासांत, तेही कुठल्याही धूळ, कचऱ्याशिवाय बदलून देऊ शकतो.
तशी वॉलपेपर लावण्याची पद्धत काही फार नवी नाही. अगदी तीस-चाळीस वर्षांपूर्वीदेखील लोक वॉलपेपरने भिंती सजवत होतेच, फक्त त्याला सर्वमान्य व्हायला थोडा वेळ लागला. वॉलपेपरने भिंती सजवण्यामागे त्याचे काम पटकन आणि पसाऱ्याविना होते हा एक भाग तर झालाच; पण त्याचबरोबर त्यात मिळणाऱ्या रंगछटा आणि डिझाइन्स हादेखील भाग येतो. सर्वसाधारणपणे भिंतींना रंग लावायचा तर ठरावीक रंगछटांमधून निवड करावी लागते, मग त्यातदेखील काही वेगळेपण आणायचे म्हटले तर टेक्शचर पेंट हा पर्याय आपण वापरू शकतो, पण त्यातदेखील निवड करण्यावर मर्यादा ही असतेच की! पण वॉलपेपरचे मात्र तसे नाही. खेळात जसे अष्टपैलू खेळाडू असतात न अगदी तसाच वॉलपेपरचा पर्याय असतो. वॉलपेपरची निवड करताना आपल्याला फक्त रंगांचेच नाही तर टेक्शचर निवडीचेदेखील स्वातंत्र्य मिळते. चकमक चमकणाऱ्या भिंतींपासून ते नाजूक, तर कधी ठसठशीत नक्षीकाम भिंतींवर करणे केवळ आणि केवळ वॉलपेपरच्याच माध्यमातून शक्य आहे. शिवाय काही वॉलपेपर तर त्रिमितीय आभासदेखील निर्माण करतात, जे केवळ रंग कामाने मुळीच शक्य नाही. मग इतकी वैशिष्टय़े असणारा वॉलपेपर महागदेखील निश्चित असणार नाही का? तर तसे मुळीच नाही बरं का, वॉलपेपरमध्ये अगदी प्रत्येकाच्या खिशाला परवडतील असे पर्याय सहज उपलब्ध आहेत. कोरिया, जर्मनी इथले वॉलपेपर तुलनेने महाग असतात, पण त्याचबरोबर इतरही अनेक देशांतून आपल्याकडे वॉलपेपर आयात केला जातो, जो तुलनेने स्वस्त असला तरीही चांगल्या गुणवत्तेचा असतो.
वॉलपेपर घेताना लोकांना काही सामान्य शंका असतात, त्यातील काही सर्वसामान्य शंका म्हणजे, वॉलपेपर किती काळ टिकतो? आमच्या भिंतीला ओल आहे, मग वॉलपेपरने ती लपून जाईल का? वॉलपेपर स्वच्छ कसा करतात? या प्रश्नांकडे येताना आधी आपल्याला माहीत हवे की वॉलपेपर हा रंग कामाला फक्त सोपे करणे आणि भरपूर रंगछटा एवढय़ा पुरताच पर्याय आहे. एरवी रंगाला येणाऱ्या सगळय़ा मर्यादा वॉलपेपरलादेखील लागू होतात. चांगल्या प्रतीचा रंग जितका काळ टिकतो तेवढाच काळ वॉलपेपरदेखील टिकतो. म्हणजे चांगल्या प्रतीचा आणि उत्तम कारागिराने लावलेला वॉलपेपर साधारणपणे सहा ते आठ वर्षे सहज टिकतो. जर भिंतीला ओल असेल तर मात्र वॉलपेपर न लावणेच उत्तम आणि स्वच्छता म्हणाल तर बहुसंख्य इम्पोर्टेड वॉलपेपर आपण ओल्या फडक्याने किंवा स्पंजने स्वच्छ पुसून घेऊ शकतो ( पाणी ओतून धुऊ शकत नाही). ज्या भिंतींवर वॉलपेपर लावायचा त्या भिंतीला आधीचा ऑइल बेस पेंट असल्यास त्यावर थेट वॉलपेपर लावू शकतो, अन्यथा ऑइल पेंट प्रायमर लावून मग त्यावर वॉलपेपर लावल्यास वॉलपेपरचे आयुष्य वाढते. वॉलपेपर घेताना तो रोलच्या स्वरूपात येतो. एका रोलमध्ये साधारणपणे सत्तेचाळीस ते पन्नास चौ. फूट काम होते. विकत घेताना मात्र आपल्याला एक संपूर्ण रोल विकत घ्यावा लागतो. बरेचदा वॉलपेपर लावण्याची किंमत ही त्याच्या किमतीत अंतर्भूत केलेली असते.
.. तर असा हा अष्टपैलू वॉलपेपर अगदी एका दिवसातदेखील आपल्या घराचे रूपडे पालटू शकतो.
(लेखिका इंटिरियर डिझायनर आहेत.)