माझ्या आगमनाने प्रत्येक घरात वेगळं वातावरण निर्माण झालं. वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. माझ्याकडे बघण्याचा प्रत्येक घराचा दृष्टिकोन वेगळा होता. माझ्याकडून वेगळ्या अपेक्षा होत्या. मी प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी वेगळा होतो. जसं शेताला घातलेलं पाणी एकच असतं, पण उसाच्या शेतात ते गोड होतं, कार्ल्यात कडू होतं, आवळ्यात तुरट होतं, तसं माझं अस्तित्व प्रत्येकासाठी वेगळं होतं.

ता निरोपाची घटिका अगदी जवळ येऊन ठेपली आहे. ३६५ दिवसांचाच व्हिसा मिळाला होता. ३१ डिसेंबरचे रात्रीचे बाराचे परतीचे तिकीटही काढलेले आहे. २०२४ म्हणून आता पुन्हा येणे नाही. खरं तर ‘माठिया जेऊ ते नेले, तेऊ ते निवांतचि गेले। पाणिया ऐसे केले हो आवेजी।’ या माऊलींच्या ओवीतल्या वहात्या पाण्याप्रमाणे अदृश्य काळाच्या रूपाने मी सतत पुढे पुढे चाललेलोच आहे. तुम्ही ‘वर्षासाठी’ चिमटीत धरलं आणि तिथी, वार तारखांच्या दृश्यरुपाने तुमच्या जीवनात, घरांत मी डोकावलो इतकंच.

balcony for relaxing place near the balcony flats with balcony
बाल्कनीजवळची जागा…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Kamal Haasan said Sarika would be upset if he offered her money
“मला ती आवडली होती, पण..”, कमल हासन यांनी सारिकाबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिला खूप अपमानास्पद…”
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Chhagan Bhujbal plea dispute with BJP for release from ED Mumbai print news
भुजबळ यांच्या दाव्याने नवे वादळ; ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर; ओबीसी असल्याने कारवाई’
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
importance of Public notice given in the newspaper
वृत्तपत्रात दिलेली जाहीर नोटीस आणि तिचे महत्त्व
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

करोनाचा बागुलबुवा थोडा कमी झाला होता, पण गेला नव्हता. तरीही ३१ डिसेंबर २०२३ ला रात्री १२ वाजता माफक फटाके वाजवून माझ्या आगमनाचं किती छान स्वागत केलंत. सगळे उत्साहाने जागे होतात. मी मोहरून गेलो. भिंतीवरच्या नव्या कोऱ्या कालनिर्णयाची पानं फडफडली. त्याच्या रुपाने जणू माझ्या येण्यावर मोहोर उमटली. बारा महिन्यांच्या रूपातलं माझं अस्तित्व भिंतीवर स्थानापन्न झालं. माझी ही ओळख प्रत्येक घरांत, नव्हे या पृथ्वीच्या पाठीवर सारखीच होती. अनेकातील एकत्व दाखवत होती. पण माझ्या आगमनाने प्रत्येक घरात वेगळं वातावरण निर्माण झालं. वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. माझ्याकडे बघण्याचा प्रत्येक घराचा दृष्टिकोन वेगळा होता. माझ्याकडून वेगळ्या अपेक्षा होत्या. मी प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी वेगळा होतो. जसं शेताला घातलेलं पाणी एकच असतं, पण उसाच्या शेतात ते गोड होतं, कार्ल्यात कडू होतं, आवळ्यात तुरट होतं, तसं माझं अस्तित्व प्रत्येकासाठी वेगळं होतं.

माझा पहिला दिवस कोडकौतुकात गेला. सगळीकडे आनंदाचा, उत्साहाचा माहोल पसरलेला होता. भेटताक्षणी जरा बिचकतच परस्परांचे हात हातात गुंफले जात होते. माझी आठवण काढत शुभेच्छा दिल्या जात होत्या. मोबाइलला तर जराही विश्रांती नव्हती. रिंगटोन किणकिणत होते. आपण काहीतरी वेगळ्या स्वरूपात शुभचिंतन करावं यासाठी प्रत्येकजण धडपडत होता. प्रत्येकजण ‘ती’ गौष्ट करत होता, ‘जी’ वर्षभर घडावी असं त्याच्या मनात होतं. कार्यालयांमधून नवीन कपड्यांची सळसळ जाणवत होती. माझी अजून ओळख झाली नसल्यामुळे अनवधानाने कागदोपत्री माझा उल्लेख करताना चुका होत होत्या. हसून टिप्पणी करत ‘त्या’ लगेच दुरुस्तही केल्या जात होत्या. अर्थात हे काही दिवसांपुरतंच होतं. मग हात सवयीने ‘माझ्यात’ स्थिरावले.

हेही वाचा >>> वृत्तपत्रात दिलेली जाहीर नोटीस आणि तिचे महत्त्व

एक सेकंदभरही न रेंगाळता मिनिटांचं, तासांचं, गणित अचूक सोडवत महिन्यांच्या मांडवाखालून रात्रंदिवस मी पुढे जात राहिलो. अपवाद फक्त दोन दिवसांचा- २१ जून व २१ डिसेंबरचा. शालेय पुस्तकात मोठा दिवस व मोठी रात्र म्हणून मला झळकायचं होतं ना! मकर संक्रांतीला गोड बोलण्याचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केलं. होळीच्या निमित्ताने सगळा कचरा जाळून टाकला. वसंतोत्सवाची नांदी म्हणून गुढ्या उभारल्या. वर्षाऋतूला मनसोक्त बरसू दिलं. ‘या वर्षी पाऊस जातो जातो म्हणत मागे डोकावतो आहे, त्यामुळे उन्हाळा हिवाळा हे आपले दिवस धावतपळत शोधत आहे ऋतुमान बदलत आहे. अशा ब्रेकिंग न्यूजना खतपाणी घातलं. सृष्टीच्या मराठी पाचव्या महिन्याचे जास्त लाड केले. गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी खूपच मोकळेपणाने साजरे केले. सुवासेचि निवती प्राण। तृप्त चक्षू आणि घ्राण। कोठून आणिले गोडपण। काही कळेना।। ही समर्थ ओवी घरच्या अन्नपूर्णेला वास्तवात आणताना पाहून हरखलो. कोजागिरीच्या चांदण्याची आल्हादकता अनुभवली. थोडीफार पूर्वीसारखीच ‘माणसाळलेली’ घरे पाहून खूश झालो. ‘ऑनलाईन’च्या तावडीतून सुटून सगळे ‘थेट भेट’ घेत होते आणि मग हळूहळू घराघरांत या जगात गुंतण्याचा मोह आवरता घ्यायला लागलो.

घड्याळं बंद पडतील किंवा मागेपुढे होतील, पण माझ्या गतीत तसूभरही फरक पडत नाही. प्रत्येक घरात मी राहिलो, रुळलो, रमलो. माझ्या येण्याने काहींनी चांगले दिवस अनुभवले. त्यांच्या व्यवसायाची भरभराट झाली. मुलंबाळं उच्चविद्याविभूषित झाली. ‘मनासारखा मिळे सहचरी’ म्हणता काहींनी लग्नगाठी पक्क्या केल्या. काही घरांत चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले. त्याच्या बाललीलांची घराचे ‘गोकुळ’ बनले. काही घरांतील हातांना निर्मितीचे डोहाळे लागले. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ उमटत राहिले. काहींची अपेक्षापूर्ती झाली तर काहींना अपेक्षाभंगाचे दु:ख पचवावे लागले. काही घरांवर संकटाच्या काळ्या ढगांनी गर्दी केली. काहींना मायेच्या दाट सावलीला पारखं व्हावं लागलं. अनपेक्षित, मन हेलावून टाकणारे, गलीतगात्र करणारे शारीरीक, मानसिक आर्थिक धक्के काही घरांना पचवावे लागले. दु:खद घटनांनी घरं उद्ध्वस्त झाली. काही घरं मात्र सुख-दु:खाचा लपंडाव खेळत, ‘खेळा ऐसा प्रपंच मानावा’ असं मनाला समजावत परिस्थितीशी दोन हात करून नेटाने उभी राहिली. ठाम राहिली, सावरली. संतांची शिकवण पुन्हा पुन्हा आठवत मनाचे समाधान शोधत राहिली. फक्त स्वत:कडेच न बघता, दुसऱ्यांचाही विचार करत राहिली. त्या आनंदाची अनुभूती, आवर्तनं टिपत गेली. ‘जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरुनी जावे, पुढे पुढे चालावे’ हे गुणगुणत राहिली. रोजचं भविष्य, आठवड्याचं भविष्य, न चुकता वाचत तुम्ही ‘माझ्या पोटात काय दडलंय’ याचा अंदाज घेत राहिलात. खरं तर ‘प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयांत खोदा’ हेच फक्त ध्यानांत ठेवा कारण प्रत्येक ‘क्षण’ पाऱ्यासारखा निसटणारा आहे. ‘आज’ चा ‘काल’ केव्हा होईल हे कळणारही नाही. ‘येणारा काळच काय ते ठरवेल’ हे तुमच्याकडून ऐकताना मी माझे ‘मोठेपण’ मिरवतो. आपला ‘सह’वास जणू ३६५ दिवसांच्या पुस्तकासारखा असतो. जसं पान उलटलं की नवं काही गवसतं, तसं मी प्रत्येक क्षणी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतो. नवी आशा, दिशा, माणसं, नाती, यश, आनंद, कधी भरभरून संपूर्ण तर कधी अपूर्ण, निसटता. त्यामुळे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार होतच गेले तुमच्या जीवनांत. मी फक्त द्रष्टा, साक्षी ‘काळ’ आहे. कालचक्र फिरतच राहणार आहे. ‘क्षणस्थ’ व्हायला उसंत आहे कुठे? म्हणून मला ‘बाय’ करायला घराच्या उंबरठ्यात या, असं मी म्हणणार नाही. कारण तुम्हा सर्वांना दारी येऊ घातलेल्या पाहुण्याला, नवीन २०२५ या वर्षाला भेटायची ओढ लागली आहे. तुमचं सगळं लक्ष त्याच्याकडे आहे. उगवत्या सूर्याला नमस्कार करायची जनरीतच आहे. पुन्हा भेटण्याचा खोटा वायदा मी करणार नाही. पिकलं पान झाडावरून अलगद खाली उतरावं तसाच मी जाणार आहे- अगदी चोर पावलांनी. इतिहास लिहिला गेला तर २०२४ हे वर्षं तरी मी स्वत:ला धन्य समजेन. कवी मंगेश पाडगांवकरांच्या शब्दांत सांगतो.

‘सरणारे वर्ष मी, आता मला जाऊ द्या’

● suchitrasathe52@gmail.com

Story img Loader