अक्षय्यतृतीया हा हिंदू पंचांगातील एक अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. ‘अक्षय्य’ या शब्दाचा अर्थ आहे कधीही न संपणारा, चिरकाल टिकणारा. या दिवशी केलेले कोणतेही पुण्यकर्म, दान, किंवा गुंतवणूक अनेक पटींनी वाढते असे मानले जाते.
अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हा असा शुभ दिवस आहेत की ज्यासाठी विशेष मुहूर्त किंवा पंचांग पाहण्याची गरज नसते. या दिवशी घर खरेदी, व्यवसायाची सुरुवात किंवा इतर मोठ्या निर्णयांसाठी शुभ मानले जाते.
घर खरेदीसाठी का निवडावा अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त!
● शाश्वत समृद्धीची भावना : अक्षय्यतृतीया दीर्घकाळासाठी समृद्धी आणते असा विश्वास आहे.
● मुहूर्त न पाहता खरेदी शक्य : घर खरेदीसाठी विशेष मुहूर्त पाहण्याची गरज नाही.
सध्याच्या बाजाराचा कल
अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त रिअल इस्टेट क्षेत्रासाठी महत्त्वाचा मानला जातो. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूरमध्ये अनेक प्रकल्प याच काळात सुरू होतात आणि घरांच्या विक्रीतही वाढ होते.
विकासकांकडून दिले जाणारे सवलतीचे प्रस्ताव :
● स्टॅम्प ड्युटी किंवा नोंदणी शुल्क माफ
● बुकिंगवर सोने किंवा गिफ्ट व्हाउचर्स
● फर्निशिंग किंवा मोफत मॉड्युलर किचन
● ईएमआय हॉलिडे किंवा ‘नो प्री-ईएमआय’ योजना. परंतु एक लक्षात घ्यायला हवे की, या ऑफर्स आकर्षक असल्या तरी प्रॉपर्टीच्या कायदेशीर कागदपत्रांची तपासणी करणे अत्यावश्यक आहे.
महाराष्ट्रातील नवीन नोंदणी शुल्क आणि स्टॅम्प ड्युटी (२०२४२५)
मुख्य शहरांमध्ये लागू असलेले स्टॅम्प ड्युटी दर (मुंबई, पुणे, ठाणे, इ.)
नोंदणी शुल्क जास्तीत जास्त रु. ३०,००० इतके मर्यादित आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्ये महाराष्ट्र शासनाने काही दस्तऐवजांवरील स्टॅम्प ड्युटी वाढवली आहे. हे बदल विशेषत: कायदेशीर दस्तऐवजांसाठी लागू होतात.
ही वाढ घर खरेदीच्या नोंदणीवर थेट परिणाम करत नाही, पण अतिरिक्त दस्तऐवजांवरील खर्च वाढू शकतो.
५. अक्षय्यतृतीयेनिमित्त घर खरेदीसाठी काही उपयुक्त टिप्स
● कागदपत्रे तपासा : RERA नोंदणी, टायटल क्लीअरन्स, बांधकाम मान्यता असल्याची खात्री घ्या.
● खर्चाचा अंदाज ठेवा : बेस किंमतीव्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी, नोंदणी शुल्क, GST, मेंटेनन्स डिपॉझिट, सोसायटी शुल्क, इ. धरून बघा.
● बँकेची प्री-अप्रुव्हल घ्या : होम लोनसाठी अगोदरच मंजुरी घेतल्यास प्रक्रिया सोपी होते.
● स्वत: साइटवर भेट द्या : प्रकल्पाचा विकास, कनेक्टिव्हिटी आणि आसपासचा परिसर प्रत्यक्षात पाहणे आवश्यक आहे.
अक्षय्यतृतीया हा विश्वास आणि गुंतवणुकीची सर्वोत्तम संधी उपलब्ध करून देणारा दिवस आहे. महाराष्ट्रातील गृहखरेदीदारांसाठी हा दिवस भावनिक तसेच वित्तीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. परंतु लक्षात ठेवा की, माहितीवर आधारित निर्णयच खरी समृद्धी देतात.
दस्तऐवजाचा प्रकार पूर्वीची ड्युटी नवीन ड्युटी
प्रतिज्ञापत्र ( Affidavit) १०० ५००
सामान्य करार ( Agreement) १०० ५००
कंपनीचे लेख ( Articles) ०.२ ०.३ (कमाल ५०,०००) (कमाल १,००,०००) भागीदारी करार (५०,०००) १ १ (कमाल १५,०००) (कमाल ५०,०००)
(लेखक स्थावर मालमत्ता क्षेत्रातील विशारद आहेत.)
sdhurat@gmail. com