स्वकष्टार्जित मालमत्ता व संपत्ती मृत्युपत्राने देता येते. मात्र ही मालमत्ता/ संपत्ती मृत्युपत्राद्वारे कोणाला द्यावी हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार संबंधित व्यक्तीचा आहे.
वडिलोपार्जित संपत्ती, मालमत्ता आपल्यालाच मिळावी म्हणून अनेक कुटुंबांमध्ये जीवघेणा संघर्ष चाललेला असतो. खोटीनाटी मृत्युपत्रे तयार केली जातात याची बरीच उदाहरणे सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत अनुभवास आली आहेत आणि अजूनही येत आहेत.
वडिलोपार्जित मालमत्ता आणि संपती आपल्यालाच मिळावी म्हणून आई, मुलगा, मुलगी, भाऊ-बहीण, बहिणी-बहिणी, भाऊ-भाऊ यांमध्ये होत असलेल्या संघर्षांमुळे रक्तसंबंधाला कशी तिलांजली वाहिली गेली आहे, अशी अनेक प्रकरणे विविध न्यायालयांत प्रलंबित आहेत. तर काही प्रकरणांचे निकाल लागून खोटय़ा आणि बनावट मृत्युपत्रांचा पर्दाफाश झाला आहे. यांपैकी निर्णय लागलेल्या एका प्रकरणाचा मी येथे उल्लेख करण्यापूर्वी, मृत्युपत्र करण्याचा कोणाला अधिकार आहे, हे आपण पाहू या!
वडिलोपार्जित संपत्ती किंवा मालमत्ता मृत्युपत्राने देता येत नाही. अशी मालमत्ता वारसांमध्ये कशी वितरित होते, त्याची हिंदू वारस कायद्यांत माहिती दिली आहे. मात्र स्वकष्टार्जित मालमत्ता व संपत्ती मृत्युपत्राने देता येते. मात्र ही मालमत्ता/ संपत्ती मृत्युपत्राद्वारे कोणाला द्यावी हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार संबंधित व्यक्तीचा आहे. या संबंधात काही वर्षांपूर्वी नामवंत उद्योगपती बिर्ला घराण्यात गाजलेल्या मृत्युपत्राचा संदर्भ देता येईल. या प्रकरणात बिर्ला कुटुंबातील स्वत:चे संतान नसलेल्या विधवा महिलेने आपली पाच हजार कोटींची मालमत्ता कंपनीच्या चार्टर्ड अकौंटंटच्या नावे आपल्या मृत्युपत्राने दिली होती. यावरून बिर्ला कुटुंबात फार मोठे वादळ माजले होते. हे मृत्युपत्र खोटे आहे, बनावट आहे इथपर्यंत आरोप बिर्ला कुटुंबीयांकडून होत होते. मात्र काही वर्षांनी संबंधित चार्टर्ड अकौंटंट मृत्यू पावल्यावर हे मृत्युपत्राचे वादळ शमले. परंतु ते मृत्युपत्र खरे होते की बनावट होते यासंबंधीची नेमकी माहिती नाही. थोडक्यात, मृत्युपत्रामुळे वादंग जसे सर्वसामान्यांच्या कुटुंबात होतात तसेच कोटय़धीश, अब्जाधीश यांच्याही कुटुंबांत होत असतात, ही वस्तुस्थिती आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्थेत एखादी व्यक्ती जेव्हा सहकारी गृहनिर्माण संस्थेची सभासद होते, तेव्हा तिने आपल्या निधनानंतर आपल्या मालकीची सदनिका कोणाला मिळावी म्हणून नामनिर्देशन करण्याची तरतूद उपविधी क्रमांक ३२ ते ३७ मध्ये आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्थेचा एखादा सभासद नामनिर्देशन न करताच दिवंगत झाला तर त्यांच्या मालमत्तेवर हक्क सांगणाऱ्या व्यक्तीने/ व्यक्तींनी कोणता मार्ग अवलंबावा याची सविस्तर माहिती उपविधी क्र. ३५ मध्ये देण्यात आली आहे. अर्थात नामनिर्देशित करण्याची तरतूद गृहनिर्माण संस्थेच्या उपविधीत असली तरी सभासद आपल्या मृत्युपत्राद्वारेसुद्धा आपल्या निधनानंतर आपली सदनिका कोणाकडे जावी याची नोंद मृत्युपत्रात करतो. मात्र ज्या व्यक्तीला संस्थेचे सभासदत्व नामनिर्देशनाने मिळालेले असते, अशी व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नामनिर्देशनाने संस्थेची सभासद झालेली व्यक्ती त्या सदनिकेची निर्विवाद मालक बनू शकत नाही. तर ती केवळ दिवंगत सभासदाच्या वारसदाराची/रांची विश्वस्त म्हणून राहते. त्यामुळे हे वारसदार किंवा कायदेशीर प्रतिनिधी यांच्या लेखी संमतीशिवाय तो अशी मालमत्ता स्वत:हून विकू शकत नाही, अशी तरतूद सहकार कायद्याच्या कलम ३० मध्ये आहे.
समजा एखाद्या सभासदाने आपल्या नामनिर्देशनामध्ये आणि मृत्युपत्रामध्ये एकाच व्यक्तीचे नाव नमूद केले असेल तर अशी व्यक्ती संस्थेचे सभासदत्व मिळविण्यास पात्र ठरते. मात्र जर नामनिर्देशनातील व्यक्तींची नावे भिन्न असतील तर ज्या व्यक्तीचे नाव मृत्युपत्रात असेल तीच व्यक्ती दिवंगत सभासदाची अधिकृत वारस ठरेल आणि तीच संस्थेचे सभासदत्व मिळविण्यास पात्र ठरेल, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. म्हणून ह्र’’ र४स्र्ी१ूीीि२ ठ्रेल्लं३्रल्ल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
नामनिर्देशन आणि मृत्युपत्र यांमधील महत्त्वाचा फरक कळावा म्हणूनच याबाबतीत थोडे विस्ताराने लिहिले.
आता काही व्यक्ती कशी बनावट मृत्युपत्रे करतात त्याची दोन उदाहरणे पाहू. यांपैकी पहिले प्रकरण आहे फेी अल्लूं’ी ३ ऊ’२४९ं श्/२. एॠिं१ ऌं५’ू‘ ऊ’२४९ं, 2014 (3) अ’’ टफ 183.
या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी आहे. दिवंगत व्यक्तीचा मुलगा, जो या विवादात्मक मृत्युपत्राचा लाभार्थी होता, त्याने हे मृत्युपत्र तयार करण्यात पुढाकार घेतला होता. प्रतिवादीचा मुलगा आणि मुलगी यांचे दिवंगत व्यक्तीशी सौहार्दाचे संबंध असले तरी त्यांच्या नावे दिवंगत व्यक्तीची मालमत्ता करण्यात आली नाही. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी टेस्टमॅटरी अर्ज केला. परंतु एवढय़ा विलंबाने हा अर्ज का करण्यात आला याचे त्याने कारण नमूद केले नाही. मात्र हे मृत्युपत्र आपल्या वकिलाने तयार केले, त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही, अशी अर्जदाराने भूमिका घेतली. परंतु असे असूनसुद्धा या मृत्युपत्राचे त्याने घेतलेले प्रोबेट त्याने परत केले नाही. दिवंगत व्यक्ती ही ८१ वर्षांची वृद्ध स्त्री होती आणि तिला तिच्या शरीराला लकवा आलेला असल्याने हे मृत्युपत्र बनावट असल्याचा प्रतिवादीने आरोप केला. परंतु त्या वृद्ध स्त्रीने मृत्युपत्रावर आपली स्वाक्षरी केल्यावर तिला लकवा आला, असा बचाव अर्जदाराने केला. मृत्युपत्रावर तिची स्वाक्षरी होण्यापूर्वी तिला लकवा आला नव्हता, असे अर्जदाराने नमूद केले; परंतु आपले हे म्हणणे अर्जदार न्यायालयात पुराव्यानिशी शाबीत करू शकला नाही.
या मृत्युपत्रावर ज्या दोघा साक्षीदारांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षऱ्या केल्या, त्यांपैकी एक साक्षीदार त्या वृद्ध स्त्रीच्या कुटुंबाला अपरिचित होता, तर दुसऱ्या साक्षीदाराचा पत्ता चुकीचा होता. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मृत स्त्रीच्या मृत्युपत्रावरील स्वाक्षरी तिने अन्य कागदपत्रांवर केलेल्या तिच्या स्वाक्षरीशी मिळतीजुळती नव्हती. म्हणून हे मृत्युपत्र बनावट असल्याचा न्यायालयाने निकाल दिला. एवढेच नव्हे तर अर्जदाराने बनावट मृत्युपत्र केल्याचा गुन्हा केला आहे, असाही न्यायालयाने निकाल दिला.
ठाणे येथील प्रकरण
ठाणे येथील या प्रकरणाचा उल्लेख भावाकडून बहिणीची फसवणूक असा करणे ठीक होईल. येथे नमूद केलेली माहिती दिवंगत महिलेच्या मुलीने ठाणे पोलीस आयुक्तांकडे केलेल्या अर्जावरून घेतलेली आहे.
एका दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये. या भावंडांचे वडील २००१ मध्ये तर आई २०१२ मध्ये दिवंगत झाली. मुलगा आई-वडिलांकडे राहत होता. मुलगी विवाहित असल्यामुळे दुसरीकडे राहत होती.
ही मुलगी आपल्या अर्जात म्हणते की, आईच्या मृत्यूनंतर धार्मिक सोपस्कार पार पडल्यावर झालेल्या नातेवाईकांच्या बैठकीत आपल्या भावाने जाहीर केले की, आईच्या नावे असलेले घर आणि दुकान आपण आपल्या बहिणीला देणार आहोत आणि दुसऱ्याच दिवशी आपल्या भावाने निरनिराळ्या कागदांवर माझ्या सह्य़ा घेतल्या आणि त्यावर त्याने काही मजकूर लिहिला. या सह्य़ा मी स्वखुषीने दिल्या नाहीत. त्यासाठी त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आणि मला वारंवार धमकावले. म्हणून धमकावणीखाली मी दिलेल्या माझ्या सह्य़ा रद्द झाल्या आहेत असे मी जाहीर करू इच्छिते. आपल्या आईने, माझ्या नावे मृत्युपत्र केले आहे, असेही माझा भाऊ सर्वाना सांगत होता. परंतु आईचे हे मृत्युपत्र मलाच नव्हे तर कोणालाही दाखविले नाही. माझा भाऊ माझ्या जिवाला धोका देईल अशी मला भीती वाटते. मला वडिलोपार्जित मिळकतीतील आणि संपत्तीतील माझा योग्य तो वाटा मिळावा म्हणून आपण हा अर्ज करीत आहोत, असे तिने आपल्या अर्जात म्हटले आहे. ती या अर्जात पुढे म्हणते की, कालांतराने आपल्या भावाने मला मृत्युपत्राची प्रत दिली, परंतु ते मृत्युपत्र वाचल्यावर ते बनावट असल्याचे मला आढळून आले आहे. कारण माझी आई एवढे लांबलचक लिहू शकेल इतकी सक्षम नव्हती.
तिने आपल्या अर्जात आईच्या मृत्यूबद्दलही साशंकता व्यक्त केली आहे; आणि म्हणून या मृत्यूच्या प्रकरणाची रीतसर चौकशी करण्याचीही तिने पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे.
मृत्युपत्र, सदनिका आणि कौटुंबिक संघर्ष
स्वकष्टार्जित मालमत्ता व संपत्ती मृत्युपत्राने देता येते. मात्र ही मालमत्ता/ संपत्ती मृत्युपत्राद्वारे कोणाला द्यावी हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार संबंधित व्यक्तीचा आहे.
आणखी वाचा
First published on: 19-07-2014 at 02:19 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will power flat and family conflict