सोसायटय़ांचे व्यवस्थापन हे एक असे व्यापक, आव्हानात्मक व सतत वाढणारे क्षेत्र आहे, की त्यात महिला आपल्या उपजत गुणधर्माच्या जोरावर.. म्हणजेच कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिकपणा व चोख व्यवहार यामुळे नक्कीच चमक दाखवू शकतील, यात शंका नाही.
८ सोसायटय़ांचे व्यवस्थापन हे एक असे व्यापक, आव्हानात्मक व सतत वाढणारे क्षेत्र आहे, की त्यात महिला आपल्या उपजत गुणधर्माच्या जोरावर.. म्हणजेच कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिकपणा व चोख व्यवहार यामुळे नक्कीच चमक दाखवू शकतील, यात शंका नाही.
 मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्याकडेदेखील त्या दिवशी विविध चर्चा-सत्र व अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दर वर्षी अशा कार्यक्रमांतून, महिलांना सर्व क्षेत्रांत समान संधी व सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे म्हणून नेते मंडळींकडून विविध घोषणा केल्या जातात तसेच आश्वासने दिली जातात. पण त्यानंतर संपूर्ण वर्षभर महिलांना नवनवीन क्षेत्रांत संधी देण्यासाठी तसेच त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक पावले उचलल्याचे दिसून येत नाही.
आपल्या राज्यात ग्रामपंचायत, नगर परिषदा व स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण आहे; परंतु सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन क्षेत्रात महिलांसाठी अधिक आरक्षण ठेवण्याचा व त्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा सर्वानाच विसर पडला आहे. सोसायटय़ांचे व्यवस्थापन हे एक असे व्यापक, आव्हानात्मक व सतत वाढणारे क्षेत्र आहे की, त्यामध्ये महिला आपल्या उपजत गुणधर्माच्या जोरावर म्हणजेच, कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिकपणा व चोख व्यवहार यामुळे नक्कीच चमक दाखवू शकतील, याबाबत शंका नाही. आपल्या राज्यात अंदाजे एक लाखाहून अधिक सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत व दर वर्षी या संख्येत भर पडणार आहे. त्यामध्ये राहण्याऱ्या बहुसंख्य महिला या किमान पदवीधर आहेत, तर काही उच्चशिक्षित तसेच संगणक व माहिती-तंत्रद्यान क्षेत्राचे ज्ञान असलेल्या आहेत; परंतु काही कारणांमुळे अशा महिला ‘गृहिणी’ म्हणून आपले कौटुंबिक कर्तव्य पार पाडताना दिसतात. त्याचबरोबर, निवृत्त व स्वेच्छा-निवृत्ती पत्करलेल्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. या महिलांकडे विविध विषयांचे ज्ञान व अनुभव यांचा अफाट खजिना आहे. असा प्रचंड शक्तीचा स्रोत आपल्याकडे उपलब्ध आहे व तिचा समाजहितासाठी व देशासाठी उपयोग करून घेणे ही काळाची गरज आहे.

स्त्रीचे जीवन म्हणजे निर्माणाची प्रचंड शक्ती असलेले एक सुप्त केन्द्र आहे. एकदा का या केंद्राचा तिला शोध लागला की मग मात्र ती जीवनात मागे वळून पाहत नाही. कायम पुढेच चालत राहते आणि पर्यायाने आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीस हातभार लावते. बहुसंख्य महिला आपले घरकाम, घर-खर्च, बाजार-हाट, बँकेचे / पोस्टाचे व्यवहार, मुलांचा अभ्यास व घरातील सर्वाचे खाणे-पिणे व आवड-निवड सांभाळून तसेच नातेसंबंध सांभाळून आपले घर खंबीरपणे व सक्षमपणे चालवू शकतात. याही पुढे जाऊन काही महिला शालेय मुलांच्या शिकवण्या घेऊन घरखर्चास हातभार लावतात, तर काही बचत गटाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार व आíथक मदत उपलब्ध करून देऊन स्वत:ची प्रगती करून घेताना दिसतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राज्यात बऱ्याच ठिकाणी फक्त महिलांनी चालविलेल्या बँका उत्तम रीतीने कार्यरत आहेत.  त्यामुळे, सहकारी गृहनिर्माण संस्था नामक एकत्रित कुटुंबाचा कारभारदेखील त्या व्यवस्थितपणे सांभाळतील यात तिळमात्र शंका नाही. फक्त गरज आहे ती त्यांना योग्य प्रशिक्षण/ मार्गदर्शन करण्याची, उपविधी व नियमांच्या सखोल माहितीची आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन याअंतर्गत नवीन आदर्श उपविधीतील नियम क्रमांक ११५ मध्ये कार्यकारी समितीमध्ये महिलांच्या संख्येबाबत अस्तित्वात असलेली रचना खालीलप्रमाणे :-
तरी राज्याच्या सहकार खात्याने याबाबत गंभीर दखल घेऊन ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन क्षेत्रात महिलांसाठी अधिक आरक्षण/ संधी उपलब्ध करून व त्यांना मोफत प्रशिक्षण, मार्गदर्शन व संरक्षण देण्यासाठी योग्य अध्यादेश काढून त्याची कठोर अंमलबजावणी केल्यास सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापनात महिलांचा सहभाग वाढेल व पदाधिकारी म्हणून जबाबदारी घेण्यास महिला पुढे येतील. अशा रीतीने महिलांना सोसायटीच्या व्यवस्थापन प्रक्रियेत संधी देऊन महिला सक्षमीकरणाचा हेतू सफल होईल आणि ‘जागतिक महिला दिन’ खऱ्या अर्थाने औचित्यपूर्ण रीतीने साजरा केल्याचे समाधान मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा