अभिनेता रणवीर सिंग याने शुक्रवारी मुंबईत पुरूषांच्या कपड्यांचा आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड असेलल्या ‘जॅक अँड जोन्स’च्या प्रसिध्दी कार्यक्रमात तरूणांना ‘शांत बसू नका!’ असा संदेश दिला. एक अनोखे रॅप गाणे गाऊन त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. हे रॅप गाणे रणवीर सिंगने स्वत: लिहिले असून गायलेसुध्दा आहे.