कोणतीही जाहिरात करताना ती आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी आहे का हे आधी प्रत्येकाने ठरवावे. मला बाइक्स किंवा शरीरसौष्ठवच्या प्रोडक्ट्सचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनायला अधिक आवडेल. ज्या प्रोडक्टवर तुमचा स्वतःचा विश्वास आहे त्याच्याच जाहिराती कराव्या असं मला वाटतं. माझ्यासाठी पैशांपेक्षा आजही त्या प्रोडक्टवर माझा किती विश्वास आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचे असते. पैसा हा येत जात असतो.