‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. मात्र, अनेक ठिकाणी या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी या चित्रपटाला प्रोपगंडा चित्रपटही म्हटले आहे. यावर उत्तर देताना केरला स्टोरीचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. केरळमधील साक्षरता एवढी असताना तिथं असं कसं घडू शकतं? या प्रश्नाला उत्तर देताना ‘केरळमधील एकच भाग फक्त लोकांना माहीत आहे. दुसऱ्या भागात या दहशतवादी गोष्टी सुरू होत्या’ असं स्पष्टीकरण दिलं.