Aarya Jadhao Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील सातव्य आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये झालेल्या भांडणात आर्या जाधवने निक्कीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर बिग बॉसने आर्याला आधी जेलमध्ये टाकलं आणि नंतर भाऊच्या धक्क्यावर रितेशने प्रेक्षकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर बिग बॉसने आर्याला घरातून निष्कासित केलं. यानंतर पहिल्यांदाच आर्याने इंस्टाग्राम लाईव्हमधून रोखठोक उत्तरं दिली आहेत.