अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली. परवाना असलेल्या बंदुकीतून चुकून सुटलेली गोळी अभिनेता गोविंदा याच्या पायाला लागली. जुहू येथे घडलेल्या या प्रकारानंतर गोविंदाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.याप्रकरणी कोणाचीही तक्रार नसून सध्या गोविंदा यांच्यावर क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्याजवळील बंदुक पोलिसांनी ताब्यात घेतली असून तपास सुरू आहे.