वाहन पार्किंगच्या समस्येचे गांभीर्य दर्शवणारी एक घटना पनवेल मधील खांदेश्वर येथे घडली आहे. वाहन पार्किंगवरून सातत्याने वाद निर्माण करणाऱ्या दोघांनी त्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.