वर्धा शहरातील बॅचलर रोडवर रात्री एका मद्यपीने चांगलाच धिंगाणा घातला. हा मद्यपी रस्त्याने शिवीगाळ करत चालला होता. तो एवढ्यावरच थांबला नाही तर रस्त्यावरील एका कारचे काचही त्याने फोडले. त्याच्या धिंगाण्यामुले संतापलेल्या नागरिकांनी त्याला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.