सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ याठिकाणी २० जून रोजी एकाच कुटुंबातील ९ जणांचे मृतदेह आढळले होते. पोलिसांनी सुरुवातीला सामुहिक आत्महत्येचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल केला होता. परंतु तपासात ही सामुहिक आत्महत्या नसून गुप्तधनाच्या लालसेतून झालेले हत्याकांड असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सोलापूरातील दोन भोंदूना अटक करण्यात आली आहे.