पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथे दुर्गामाता मंदिरात दोन अज्ञात चोरट्यांनी दानपेटी पळवल्याची घटना घडली आहे. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अवघ्या तीस सेकंदात चोरट्यांनी दानपेटी पळवून काही अंतरावर ती फोडली आणि त्यातील पैसे घेऊन ते पसार झाले. सध्या पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.