लोकल ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनमध्ये प्रवेश करताना किंवा गाडीतून खाली उतरत असताना नागरिक अनेकदा घाई करतात आणि त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. नेहमीच रेल्वे स्थानकात प्रवाशांना काळजी घेण्याच्या सूचनाही केल्या जातात. मात्र, असे असतानाही नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वेतून खाली उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करतात. आता असाच एक प्रकार मुंबईच्या वडाळा स्टेशनवरुन समोर आला आहे. मुंबईच्या वडाळा स्टेशनवरील तिकीट कलेक्टरने आपल्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेने एका ज्येष्ठ महिलेचा जीव वाचला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.