नवी दिल्लीतील प्रगती मैदान बोगद्याजवळ शनिवारी (२४ जून) लुटीची एक धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी बंदुकीच्या धाकाने एका डिलिव्हरी एजंटला आणि त्याच्या साथीदाराला लुटलं आहे. चोरट्यांनी अवघ्या १२ सेकंदात पैशांनी भरलेली बॅग लंपास केली. या बॅगेत दोन लाख रुपये होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात केलेली नाही. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.