धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोड वरील ‘स्वर्ण पॅलेस’ या सराफा पेढीवर भल्या पहाटे अज्ञात व्यक्तीने जबरी चोरी करीत तब्बल १ कोटी १० लाखांचे सोने चांदीचे दागिने आणि १० हजाराची रोख रक्कम चोरुन नेली असल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. या चोरीमुळे आग्रारोडसह शहरातील व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.