Pimpari Chinchwad: दांडके आणि पाईपने मारहाण, पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या
अज्ञात चोरट्यांनी काही लोकांना मारहाण करत १५ तोळं सोन्याची चैन लंपास केली होती. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मारहाण आणि गळ्यातील चैन चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी श्रीराम संतोष होले, प्रतिक उर्फ बंटी दत्तात्रय टाळकर आणि बबलू रमेश टोपे या तिघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे.