डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. ग्लोब स्टेट नावाच्या इमारतीत साफसफाई करणारे दोन ते तीन कर्मचारी इमारतीच्या तिसरा मजल्यावर मस्ती करत होते. यादरम्यान बंटी टाक या सफाई कर्मचाऱ्याचा आपल्या सोबत काम करणाऱ्या नगिना देवी हिला हात लागला. नगिना देवी ही एका कठड्यावर बसली होती. जोरात हात लागल्याने नागिना देवी ही खाली पडली. त्यासोबत बंटी टाक याचा देखील तोल गेला मात्र बंटी टाक थोडक्यात बचावला आहे. परंतु नगिना देवी ही तिसऱ्या मजल्यावरून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी बंटी टाक विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत.