जिजाऊंचा पदस्पर्श ते स्वातंत्र्यसैनिकांचे आश्रयस्थान- गणेशखिंडीतील गणपती मंदिर | गोष्ट पुण्याची-९७
पुण्यात असंख्य गणपती मंदिरं आहेत पण पुणे शहराच्या वायव्य बाजूला असलेला गणेशखिंडीतील पार्वतीनंदन गणपती हा पुण्यातील सर्वात जुन्या गणपतींपैकी एक आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ‘गणेशखिंडीतला गणपती पावला’ हा परवलीचा शब्द असो किंवा या मंदिराच्या स्थापनेचा इतिहास, सगळं ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागातून जाणून घेऊयात..