Ganeshotsav 2023:कोकणातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती परदेशी रवाना!; बाप्पाच्या मूर्तीला परदेशातून मागणी
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील केळंबे गावचे सुपुत्र निलेश सुवारे यांनी यावर्षी १०१ गणेशमूर्ती या अमेरिकेला पाठवल्या आहेत. तालुक्यातून अशा प्रकारे अमेरिकेला गणेशमूर्ती पाठवले जाण्याची ही पहिलीच वेळ असून निलेश सुवारे या कलाकाराच्या जिद्द आणि कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. नीलेश यांचे कलाकौशल्य पाहून अमेरिकेतून त्यांच्याकडील गणेशमूर्तींना मागणी आली आहे. त्यामुळे यावर्षी पर्यावरणपूरक १०१ गणपती मूर्ती पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नेमकी गणपती बाप्पाची मूर्ती परदेशी पोहोचली कशी? जाणून घेऊयात…