Pune: काश्मीरमधील ‘गणपतीयार ट्रस्ट’मध्ये प्रथमच होणार गणेशोत्सव साजरा; पुण्यातील गणेशमंडळांचा पुढाकार
जम्मू काश्मीरमधील ‘गणपतीयार ट्रस्ट’मध्ये गणेशोत्सव साजरा व्हावा, याकरिता पुण्यातील सात मंडळे एकत्र येऊन मूर्ती प्रदान सोहळा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये यंदा प्रथमच दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे.