Pune: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग, पुण्यात मूर्तिकाराने साकारला महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा देखावा
गणेशोत्सवाला अगदी एक दिवस शिल्लक राहिला असून गणेश मंडळं किंवा घरगुती बाप्पाच्या आगमनाची तयारी सर्वत्र पाहण्यास मिळत आहे. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यास देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात. गणेशोत्सवामध्ये अनेक सार्वजनिक मंडळं सामाजिक आणि चालू घडामोडींवर देखावे सादर करून नागरिकांमध्ये प्रबोधन करण्याचं काम करीत असतात. तर, यंदा पुण्यातील कसबा पेठ परिसरातील मूर्तिकार सतीश तारू यांच्याकडे सध्याच्या सत्तांतर या विषयावर देखावा तयार करून मागविला आहे. मागील चार वर्षाच्या काळात राज्यात घडलेल्या सत्तांतराच्या घडामोडीचा देखावा सतीश तारू यांनी साकारला आहे.